অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किडणीच्या आजारांचे निदान

किडनिचे असे अनेक आजार आहेत. जे बरे होऊ शकत नाहीत. असे आजार जास्त दुर्धर झाल्यानंतर त्यावर उपचार करणे खूप महागडे . खूप गुंतागुंतीचे आणि पूर्णपणे सुरक्षितही नसते. दुर्दयवाणे  किडनीच्या अनेक गंभीर आजारामध्ये रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे जेव्हा किडनीच्या आजाराबद्दल शंका वाटू लागले तेव्हा डॉक्टरांना भेटून रोगाचे निदान आणि त्यावर उपचार केले पाहिजे.

किडणीचा तपास कोणी केला पाहिजे ? किडनीचा त्रास होण्याची शक्यता केव्हा अधिक असते ?

  1. ज्या व्यक्तीमध्ये fकडणीच्या आजाराची लक्षणे दिसतात
  2. ज्या व्यक्तीला मधुमेहाचा आजार आहे,
  3. उच्च रक्तदाब आहे.
  4. अनुवंशिक किडणीचा आजार आहे,
  5. खूप काळ वेदनाशामक औषधे घेतली असली तर,
  6. जन्मापासून मृत्रमार्ग खराब असेल तर.

किडनीच्या आजाराचे निदान करण्यासाठी पुढील तपास आवश्यक आहे.

मूत्राची तपासणी

किडनीच्या आजाराने निदान होण्यासाठी लघवीचा तपास आवश्यक आहे

  • मृत्रात पू आढळून येणे ही मूत्रमार्गात जतुसंसर्ग झाल्याची खूण आहे.
  • मृत्रात मोटीन आणि रक्तकण दिसून येणे हेही किडणीला सूज आल्याचे (ग्लोमेरूलोनेफाईटीस) लक्षण आहे .
  • मुत्राची तपासणी किडनीच्या आजाराच्या प्राथमिक निदानासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
  • किडनीच्या अनेक रोगामध्ये लाघवीद्वारे प्रथिने जाऊ लागतात .परंतु लाघवीमधून प्रथिनाचे जाणे हे किडनीची कार्यक्षमता कमी होण्यासारख्या गंभीर आजाराचे प्राथमिक लक्षण असून हे लघवी मध्ये प्रथिने दिसू लागणे हेच असते.

मायक्रोअल्ब्युमिन्युरीया

मधुमेहामुळे किडनीवर झालेल्या वाईट परिणामांचे सर्वात लवकर आणि योग्य वेळी निदान होण्यासाठी लघवीची तपासणी अत्यावश्यक आहे.

लघवीच्या इतर तपासण्या या प्रकारे आहेत

लघवीत क्षयरोगाच्या (T.B.) जीवाणूंची तपासणी (मुत्रमार्गाच्या क्षयरोगाच्या निदानासाठी )

  • २४ तासाच्या लघवीतील प्रथिनाचे प्रमाण (किडनीच्या सूज आणि त्यावरील उपचाराचा परिणाम जाणून घेण्यासाठी )
  • लघवीचे कल्चर आणि संवेदनशीलता तपासणी (लघवीत संक्रमणाला जबाबदार असणारया जिवाणूंचे निदान होण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी परिणामकारक ओषधांची माहिती होण्यासाठी )
  • लघवीच्या तपासातून किडनीच्या विविध रोगांबाबत माहिती प्राप्त होते. मात्र लघवीचा अहवाल सर्वसामान्य आला तरी किडनीला कोणताही रोग झालेला नाही, असे ठामपणे म्हणता येणार नाही.

रक्ताची तपासणी

  • रक्तातले हिमोग्लोबिनचे प्रमाण : रक्तात होमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे .ज्याला आपण रक्ताल्पता (अॅनिमिया )म्हणतो.हे किडनी पूर्ण क्षमतेने कार्य करत नसल्याची महत्वाची  खूण आहे.मात्र रक्ताची कमतरता हि इतर काही  आजारांमुळे असू शकते .त्यामुळे या चाचणीत नेहमी किडनीच्या रोगाविषयी माहिती मिळेलच असे नाही.
  • रक्तात क्रीअॅटीनीन आणि युरियाचे प्रमाण – हि चाचणी किडनीच्या कार्यक्षमतेविषयी माहिती देते .क्रिअॅटीनीन आणि युरिया हा शरीरातला अनावश्यक कचरा आहे. जो किडनीद्वारे शरीरातून बाहेर टाकला जातो .रक्तात क्रिएटीनिनचे सामान्य प्रमाण ०.६ ते १.४ मिलीग्रॅम टक्के असते आणि दोन्ही किडन्या खराब झाल्यावर यात वाढ होते .हि चाचणी किडनी निकामी झाल्याच्या निदानासाठी आणि उपचारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
  • रक्ताच्या इतर चाचण्या - किडनीच्या वेगवेगळ्या रोगाने निदान होण्यासाठी रक्ताच्या अन्य चाचण्या . ज्यात कोलेस्टॉल ,सोडियम ,पोटॅशिअम, क्लोराईड,कॅल्शियम ,फॉस्फरस, ए.एस.ओ. टाइटर ,कम्प्लीमेन्ट आदींचा समावेश आहे.

रेडीओलॉजिकल चाचण्या

  • किडनीची सोनोग्राफी - हि सोपी ,सूरक्षित आणि चटकन होणारी तपासणी आहे.यातून किडनीचा आकार,रचना,ठिकाण ,मुत्रमार्गातला अडथळा,मुतखडा किंवा गाठ होणे याबाबत महत्वाची माहिती मिळते.खास करून हळूहळू किडनी निकामी होत असलेल्या रोग्यामध्ये सोनोग्राफीत दोन्ही किडन्या आकुंचन पावलेल्या दिसून येतात .
  • पोटाचा एक्सरे - हि तपासणी विशेषतः मुतखड्याच्या निदानासाठी केली जाते. किडनीची सोनोग्राफी तपासणी किडणी रोग तज्ज्ञासाठी तिसरया नेत्रासारखी असते.
  • इन्ट्राविनस  पायलोग्राफी ( I.V.P) - या तपासणीत रोग्याला एका  विशेष प्रकारच्या आयोडिनयुक्त (रेडीओ कॉन्ट्रास्ट पदार्थ )आौषधाचे इंजेक्शन दिले जाते. इंजेक्शन दिल्यानंतर थोड्या थोड्या फरकाने पोटाचा एक्सरे काढला जातो. पोटाच्या या एक्सरेत  आौषध किडनीतून मुत्रमार्गाद्वारे मुत्राशयात जाताना दिसून येते .आय.व्ही .पी एक किडनीची कार्यक्षमता आणि मुत्रमार्गाच्या रचनेबद्दल माहिती देते. हि तपासणी खास करून किडणीतले मूतखडे. मुत्रमार्गातले अडथळे किंवा गाठ यासारख्या आजारावरील निदानासाठी केली जाते. जेव्हा किडणी खराब झाल्यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी झाली असेल, तेव्हा तपासणीचा उपयोग होत नाही.रेडीओ  कॉन्ट्रास्ट इंजेक्शन खराब किडणीचे आणखी नुकसान करू शकते, त्यामुळे हळूहळू किडणी निकामी होत असलेल्या रोग्यासाठी हि तपासणी हानिकारक ठरू शकत. आय.व्ही.पी एक एक्सरे तपासणी असल्याकारणाने गर्भावस्थेत बाळासाठी हानिकारक ठरू शकते.त्यामुळे गर्भावस्थेत हि तपासणी केली जात नाही.
  • इतर रेडियोलॉजीकल तपासण्या - काही विशेष प्रकारच्या रोगांच्या निदानासाठी किडनी डॉप्लर ,मिक्चूरेटिंग सिस्टोयुरेथोग्राफ,रेडीओ न्युक्लीअरस्टडी ,रीनल अॅन्जीयोग्राफी ,सी.टी.स्कॅन, अॅन्टीग्रेड अॅड रिट्रोग्रेड पायलोग्राफी इत्यादी खास प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.

इतर खास तपासण्या

किडनीची बायोप्सी, दुर्बिणीद्वारे मुत्रमार्गाची तपासणी आणि युरोडायनॅमिक्ससारख्या विशेष तपासण्या किडनीच्या रोगांचे योग्य निदान होण्यासाठी गरजेच्या आहेत.

किडनीची बायोप्सी

किडनीची बायोप्सी पातळ सुईद्वारा ,बेशुद्ध न करता केली जाणारी वेदनारहित तपासणी  आहे. किडनीच्या अनेक रोगांचे कारण जाणून घेण्यासाठी किडनी बायोप्सी हि अत्यंत महत्वपूर्ण तपासणी आहे.

किडनी बायोप्सी काय आहे?

किडनीच्या अनेक रोगांचे कारण जाणून घेण्यासाठी सुईच्या मदतीने किडनीतून पातळ दोरयासारखा तुकडा काढून त्याची विशिष्ठ प्रकारची हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणी करण्याला किडनी बायोप्सी म्हणतात.

किडनी बायोप्सीची गरज केव्हा पडते?

लघवीतून प्रथिने जाणे ,किडनीची कार्यक्षमता कमी होणे या सारख्या किडनीच्या अनेक रोगामध्ये काही रोग्यांच्या बाबतीत सर्व तपासण्या करूनही निश्चित निदान होत नसेल,तर अशा वेळी किडनी बायोप्सी आवश्यक आहे.

किडनी  बायोप्सी तपासणीचा फायदा कोणता ?

या तपासणीद्वारे किडनीच्या रोगांचे निश्चित कारण जाणून घेऊन योग्य उपचार करता येतात . हि तपासणी कोणत्या प्रकारचे उपचार करायला हवेत ,इलाज किती फायदेशीर ठरेल तसेच भविष्यात किडनी किती खराब होण्याची शक्यता आहे, अशी महत्वपूर्ण माहिती देते.

किडनी बायोप्सी कशा प्रकारे केली जाते?

किडनी बायोप्सिसाठी रोग्याला रुग्णालयात भरती केले जाते.

  • हि तपासणी सुरक्षितरित्या व्हावी यासाठी रक्तदाब तसेच रक्तात गुठळी बनण्याची क्रिया सामान्य असली पाहिजे.
  • रक्त पातळ करणारी अॅस्पिरीनसारखी आौषधे बायोप्सी करण्यापूर्वी दोन आठवडे पूर्ण बंद करणे गरजेचे आहे.
  • हि तपासणी रोग्याला बेशुद्ध न करता केली जाते.मात्र लहान मुलांची बायोप्सीबेशुद्ध करूनच केली जाते.
  • बायोप्सिमध्ये रोग्याला पोटावर झोपवून पोटाखाली उशी ठेवली जाते.
  • बायोप्सी करण्यासाठी सोनोग्राफीच्या पद्धतीने पाठीवर विशिष्ठ जागा निश्चित केली जाते.पाठीत खाली कमरेच्या स्नायुजवळ बायोप्सीची योग्य जागा असते.
  • या जागेला औषधाने साफ केल्यानंतर वेदनाशामक इंजेक्शन देऊन बधीर केले जाते .
  • विशेष प्रकारच्या सुईच्या (बायोप्सी नीडल )मदतीने किडनीतून पातळ धाग्यासारखे २ ते ३ तुकडे काढून ते हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीसाठी पॅथोलॉजिस्ट पाठवले जातात.
  • बायोप्सी केल्यानंतर रोग्याला पलंगावर आराम करण्याचा सल्ला दिला जातो . बहुतेक रोग्यांना दुसऱ्या दिवशी घरी जाण्याची परवानगी दिली जाते.
  • किडनी बायोप्सी केल्यानंतर रोग्याला २ ते ३ आठवडे मेहनतीचे काम न करण्याचा सल्ला दिला जातो.विशेषतः जड वस्तू न उचलण्याचा सल्ला दिला जातो.

 

स्रोत - Kidney Education Foundation

अंतिम सुधारित : 9/26/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate