অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अॅक्युट किडणी फेल्युअर

अॅक्युट किडणी फेल्युअर

अॅक्युट किडणी फेल्युअर म्हणजे काय?

संपूर्ण कार्यक्षमतेने कार्य करणाऱ्या दोन्ही किडन्या काही कारणाने अचानक नुकसान झाल्यामुळे थोड्या काळासाठी काम करणे कमी व पूर्णपणे बंद करतात. तेव्हा त्याला आपण अॅक्युट किडणी फेल्युअर म्हणतो.

अॅक्युट किडणी फेल्युअर होण्याची कारणे काय?

अॅक्युट किडनी फेल्युअर होण्याची मुख्य करणे पुढीलप्रमाणे

  1. जास्त प्रमाणात जुलाब आणि उलटी झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि रक्दाब कमी होणे
  2. शरीरातील विषारी (फॅल्सिफेरम ) मलेरिया होणे .
  3. G6PD ची कमतरता असणे.ह्या रोगात रक्तातील रक्तकण अनेक औषधे घेतल्यामुळे विघटीत होऊ लागतात ,ज्यामुळे   किडणी  अचानक निकामी होऊ शकते.
  4. मुतखड्यांमुळे मुत्रमार्गात अडथळे येणे.

याशिवाय , रक्तात गंभीर संसर्ग (Septicemia) किद्नीत गंभीर संसर्ग ,किडनीला विशिष्ट प्रकारची सूज. स्त्रियांच्या प्रसुतीच्यावेळी अतिशय उच्च रक्तदाब असणे किंवा अधिक रक्तस्त्राव होणे,औषधांचा विपरीत परिणाम होणे , साप चावणे ,स्नायूंवर पडलेल्या अधिक दाबांमुळे निर्माण झालेल्या विषारी पदार्थाचा गंभीर परिणाम किडनीवर होणे इत्यादी अॅक्युट किडणी फेल्युअरची करणे आहेत.

अॅक्युट किडणी फेल्युअरची लक्षणे

या प्रकारच्या किडणी फेल्युअरमध्ये पूर्ण क्षमतेने कार्य करणारी किडणी अचानक खराब झाल्यामुळे या रोगाची लक्षणे अधिक प्रमाणात निर्माण होतात. हि लक्षणे वेगवेगळ्या रोग्यांमध्ये कमी व जास्त प्रमाणात असू शकतात .

  1. कमी भूक लागणे , मळमळणे ,उलटी होणे, उचकी लागणे,
  2. लघवी कमी होणे व बंद होणे.
  3. चेहरा,पाय आणि शरीरावर सूज येणे, दम लागणे आणि रक्दाब वाढणे.
  4. अशक्तपणा  जाणवणे,झोप कमी होणे. स्मरणशक्ती कमी होणे, शरीर दुखणे आदि.
  5. रक्ताची उलटी होणे आणि रक्तात पोटॅशीयमचे प्रमाण वाढणे.(ज्यामुळे अचानक ह्दय बंद पडू शकते).किडनी फेल्युअरच्या या लक्षणांशिवाय , ज्या कारणांमुळे किडनी खराब झाली आहे. त्या रोगाची लक्षणेहि दिसून येतात , जसे विषारी मालेरीयात थंडी वाजून ताप येणे.

अॅक्युट किडणी फेल्युअरचे निदान

जेव्हा कुठलाही रोगामुळे किडणी खराब झाल्याची शंका असेल, तसेच रोग्यात दिसणाऱ्या लक्षणांमुळे किडणी फेल्युअरची शंका असेल, तेव्हा त्वरित रक्ताची चाचणी करून घेतली पाहिजे .रक्तातले क्रिअॅटीनीन आणि युरियाचे वाढलेले प्रमाण किडनी फेल्युअरचे संकेत असतात .

रक्त आणि लघवीच्या तपासणी , सोनोग्राफी वगैरेच्या तपासातून अॅक्युट किडणी फेल्युअरचे निदान,त्याच्या कारणांचे निदान आणि त्यामुळे शरीरावर झालेल्या अन्य विपरीत परिणामांबाबत माहिती मिळू शकते.

हा रोग झालेल्या रुग्णांनी

  • रोगाच्या सुरुवातीला पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे.
  • लघवी कमी होत असेल तर डॉक्टरांना त्याची त्वरित माहिती दिली पाहिजे आणि लघवीच्या प्रमाणातच पाणी प्यायला पाहिजे.
  • असे कुठलेही औषध घेता कामा नये,ज्यामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते (विशेष करून वेदनाशामक औषधे

अॅक्युट किडणी फेल्युअरमध्ये किडणी किती काळानंतर पुन्हा काम करू लागते?

योग्य उपचार घेतले तर केवळ एक ते चार आठवड्यात अधिकांश रोग्यांची किडनी पुन्हा पूर्णपणे झाल्यानंतर औषध घेण्याची व डायलिसीस करण्याची गरज भासत नाही.

अॅक्युट किडणी फेल्युअरवरील उपचार

या रोगावरील उपचार ,रोगाची कारणे,लक्षणांची तीव्रता आणि प्रयोगशाळेतील परीक्षण ध्यानात घेऊन वेगवेगळ्या रोग्यांमध्ये वेगवेगळे असतात. या रोगाच्या गंभीर स्वरुपात त्वरित उपचार केल्यास रोग्याला जणू पुनर्जन्मच मिळतो , मात्र उपचार न मिळाल्यास रोगी म्तृत्युमुखी पडू शकतो.

अॅक्युट किडणी फेल्युअरचे मुख्य उपचार खालीलप्रमाणे आहेत

  1. किडणी खराब व्हायला कारणीभूत झालेल्या रोगावर उपचार.
  2. खाण्यापिण्यात पथ्य बाळगणे .
  3. औषधांद्वारे उपचार.
  4. डायलिसीस

अॅक्युट किडणीला कारणीभूत असणाऱ्या रोगांवर उपचार

  • किडनी फेल्युअरची मुख्य करणे उलटी ,जुलाब किंवा फॅल्सीफेरम – मलेरिया असू शकतात. हि नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित उपचार केले पाहिजे.रक्तातील संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी त्वरित उपचार केले पाहिजेत. रक्तातील संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रतीजैवके देऊन उपचार केले जातात. रक्तकण कमी झाले असतील तर रक्त दिले जाते.
  • मुतखडा झाल्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला असेल तर दुर्बिणीद्वारे किंवा ऑपरेशनद्वारे हा अडथळा दूर केला जातो.
  • त्वरित आणि योग्य उपचारांनी खराब झालेली किडनी पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करू शकते.

खाण्यातील पथ्य

  • किडणी काम करत नसेल तर; होणाऱ्या त्रासातील गुंतागुंत कमी करण्यासाठी आहारात पथ्य पाळणे गरजेचे आहे.
  • लघवीचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी आणि अन्य द्रवपदार्थ कमी घेतले पाहिजेत, ज्यामुळे सूज आणि थाप लागण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
  • रक्तात पोटॅशीयमचे प्रमाण वाढू नये यासाठी ,फळांचा रस, नारळ पाणी , सुका मेवा खाता कामा नये , जर रक्तातले पोटॅशियमचे प्रमाण वाढले  तर त्याचा ह्दयावर जीवघेणा परिणाम होऊ शकतो
  • मिठाचे प्रमाण कमी केल्यास सूज उच्च रक्तदाब ,श्वास लागणे तसेच जास्त तहान लागणे यासारख्या समस्या नियंत्रणात ठेवता येतात .

    औषधांद्वारे उपचार

    • लघवीचे प्रमाण वाढविण्याची औषधे : लघवी कमी झाल्यामुळे शरीरावर आलेली सूज ,श्वास लागणे इत्यादी लक्षणे कमी करण्यास हि औषधे अतिशय उपयोगी ठरतात.
    • उलटी आणि अॅसीडीटीची  औषधे : किडणी फेल्युअरमुळे होणाऱ्या उलट्या ,मळमळ, उचकी लागणे इत्यादी थांबवण्यासाठी हि औषधे उपयोगी ठरू शकतात.
    • अन्य औषधे – धाप लागणे ,रक्ताची उलटी होणे , वेदना होणे यांसारख्या गंभीर वेदनांपासून आराम देतात.

    डायलिसीस

    किडणी काम करीत नसल्यामुळे शरीरात जमा होणारे अनावश्यक पदार्थ ,पाणी,क्षार आणि अम्लासारख्या रसायनांना कृत्रिम पद्धतीने दूर करून ,रक्ताचे शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियेला डायलिसीस म्हणतात.

    डायलिसिसचे दोन प्रकार आहेत : पेरीटोनियल आणि हिमोडायलिसीस

    डायलीसीसची गरज केव्हा पडते?

    अॅक्युट किडनी फेल्युअरच्या सर्व रोग्यांवर औषधे आणि खाण्यात पथ्य बाळगून उपचार केले जातात पण जेव्हा ,किडनीला अधिक नुकसान झालेले असते , तेव्हा सर्व उपचार करूनही रोगाची लक्षणे वाढत जातात , जी जीवघेणी तःरू शकतात. अशा काही रोगांसाठी डायलिसीसगरजेचे ठरते. योग्य वेळी डायलिसीसच्या उपचारांनी अशा रोग्यांना नवजीवन मिळू शकते.

    डायलिसीस किती वेळा करावे लागते?

    • जोपर्यंत रोग्याची खराब झालेली किडणी पुन्हा संतोपजनकरित्या कार्य करू लागत नाही, तोपर्यंत डायलिसीस कृत्रिम रुपात किडनीचे काम करीत रोग्याची तब्बेत ठीक ठेवण्यात मदत करते.
    • किडनित सुधारणा व्हायला सामान्यतः १ ते ४  आठवडे लागू शकतात. ह्या काळात आवश्यकतेनुसार डायलिसीस करणे गरजेचे असते.
    • एकदा डायलिसीस केल्यानंतर वारंवार डायलिसीस करावे लागते असा अनेक जनाचा गैरसमज असतो. कधीकधी ह्या भीतीमुळे रोगी उपचार करण्यात विलंब करतात , ज्यामुळे रोग बळावतो आणि त्यामुळे डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच रोगी शेवटचा श्वास घेतो.
    • सर्व रोग्यांच्या औषधांमुळे तर काही रोग्यांच्या डायलिसीसच्या योग्य उपचारांमुळे काही दिवसात व आठवड्यात दोन्ही किडन्या पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करू लागतात. नंतर रोगी पूर्ण बरे होतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची औषधे घ्यायला लागत नाहीत व पथ्यहि पाळावे लागत नाही.

     

    स्त्रोत - Kidney Education Foundation

     

अंतिम सुधारित : 11/7/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate