यकृत निबर होऊन बिघडणे व जलोदर होणे याला खालीलपैकी काही कारणे असू शकतात.
6 महिने ते 3 वर्ष वयामध्ये हा आजार जास्त आढळतो. नात्यात होणारी लग्ने, आहारात खवट शेंगदाण्यातून जाणारे अफ्लाटॉक्सीन नावाचे विषारी द्रव्य, तांब्याच्या भांडयांचा स्वयंपाकात वापर व आनुवंशिकता ही त्याची महत्त्वाची कारणे सापडली आहेत.
कावीळ, जलोदर, पोटावरच्या नीला उठून दिसणे, मळमळ, उलटी, आजाराच्या शेवटच्या अवस्थेत रक्ताची उलटी वगैरे अनेक लक्षणे यात दिसून येतात.
वेळीच निदान झाले तर डीपेनिसिलीन व आरोग्यवर्धिनी या औषधांचा चांगला उपयोग होतो. एकदा सि-हॉसिस हा यकृताचा रोग जडला, की बरा होणे जवळजवळ अशक्य असते. याचे परिणाम फार दूरगामी असतात. केवळ या रोगासाठी तरी दारू टाळणे आवश्यक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 5/22/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...