तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे. दात, हिरडया, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आजुबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल. खराब झालेले दात, किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात. मुलांना देखील दातांचे अनेक आजार असतात. मागच्या पिढीच्या लोकांमध्ये दात-हिरडयांचे आजार मोठया प्रमाणात होते. अनेकांचे साठीच्या आधीच दात पडलेले असायचे. आताच्या पिढीत दात जास्त वर्षे शाबूत राहतात. याचे मुख्य कारण दातांचा ब्रश. ब्रशमुळे दात साफ राहतात, कमी आजार होतात आणि दात जास्त टिकतात.
दाताचा डॉक्टर नसल्यास काही साधी दंतवैद्यकीय तंत्रे शिकून आपण बरेच काम करू शकतो.
ही कामे अगदी महत्त्वाची आहेत. आपल्यालाही ती नक्की करता येतील, फक्त त्यासाठी थोडे प्रशिक्षण पाहिजे. या प्रकरणात या कामांसाठी लागणारी माहिती आपण बघू या.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...