অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कंडू / कंडरोग

कंडू / कंडरोग

कंडरोग म्हणजे काय ?

कंडरोग ही त्वचेची एक असंसर्गजन्य, जीर्ण स्वरुपाची समस्या आहे आणि सामान्यतः एक सौम्य स्थिती असते. त्यामुळे त्वचेवर लाल, खवलेदार चट्टे उठतात. ही जीर्ण स्वरुपाची समस्या आहे याचा अर्थ तिची लक्षणे अनेक वर्षपर्यंत टिकू शकतात. ही लक्षणे आयुष्यभरात येतात आणि जातात. हा रोग पुरुष तसंच स्त्रियांना एकसारखाच होतो.

कंडरोगाची कारणे कोणती ?

याचे नेमके कारण अज्ञात आहे.  उपलब्ध माहितीनुसार कंडरोग हा दोन मुख्य कारणांशी निगडीत आहेः

  1. एक अनुवांशिक पूर्वस्थिती
  2. एक स्वयंप्रतिकार प्रतिसाद

अनुवांशिक पूर्वस्थिती असलेल्या व्यक्तींमधे, शरीराच्या प्रतिकार यंत्रणेने पाठवलेल्या चुकीच्या संकेतांमुळे त्वचेच्या पेशींच्या वाढीच्या चक्रांना गती मिळते, अशा पेशी त्वचेच्या पृष्ठभागावर साचतात आणि शरीर त्यांना जलद गतीनं बाहेर फेकू शकत नाहीत. तथापि, कंडरोग असणा-या अनेक लोकांना या रोगाचा कौटुंबिक इतिहास नाही.

लाल खवल्याचे चट्टे का येतात ?

त्वचेच्या अतिशय वरच्या भागात त्वचापेशींची संख्या भरमसाठ वाढल्याने लाल खवलेदार चट्टे उठतात. सामान्यतः त्वचेच्या पेशी पक्व होतात आणि शरीराच्या पृष्ठभागावरुन झडून जातात. या प्रक्रियेला अंदाजे 4 आठवडे लागतात. कंडरोग झालेल्या व्यक्ती प्रत्येकी 3 ते 4 दिवसांनी त्वचेच्या पेशी टाकतात. या अतिप्रमाणातील त्वचापेशी कंडरोगाची त्वचाविकृती तयार करतात.

कंडरोग कसा ओळखायचा ?

कंडरोगाच्या लक्षणांमधे त्वचेवर लाल, खवलेदार चट्टे येतात, खाजते आणि जाडसरपणा येतो, भेगा पडतात आणि हाताचे तळवे किंवा पायाचे तळवे यांच्यावर फोड येतात. ही लक्षणे हलकी ते तीव्र असू शकतात आणि ती त्वचेचा आकार बिघडवतात, अकार्यक्षम बनवतात.

कंडरोगाचे विविध प्रकार कोणते आहेत ?

त्वचेच्या विकृतीच्या प्रकारानुसारआणि त्वचेच्या चट्ट्यांच्या ठिकाणानुसार कंडरोग हा अनेक प्रकारांमधे वर्गीकृत करता येतोः

रक्तकोशिकाकारक कंडरोग हा त्वचेला अतिशय लालपणा आणि सूज आणतो.

बुरायुक्त कंडरोग हा सर्वात सामान्य प्रकारचा कंडरोग आहे (अंदाजे 80 टक्के लोकांना याप्रकारचा कंडरोग होतो).  त्यामुळे त्वचेवर फुगीर लाल चट्टे येतात.  या लाल चट्ट्यांवर पांढरे खवले येतात.  ते सामान्यतः गुडघे, कोपरं, टाळू, कंबर आणि नखांच्या इथं येतात, तरीही ते त्वचेच्या कोणत्याही भागावर येऊ शकतात.

व्यस्त कंडरोग यामुळे त्वचेच्या घडींवर मऊ लाल चट्टे येतात.

गटेट कंडरोग यामुळे त्वचेवर लहान चट्टे येतात जे द्रवाच्या थेंबासारखे दिसतात.

पुयिकाचा कंडरोग यामधे घट्ट पांढ-या पदार्थाने भरलेले फोड होतात.
कंडरोगीय संधीशोथ संधीवातासह कंडरोग होण्याप्रमाणेच हा एक संयुक्त प्रकारचा रोग आहे.

कंडरोग होण्यास किंवा आणखी वाढविण्यास काही घटक कारणीभूत आहेत काय ?

कंडरोग असलेल्या काही लोकांमधे बुरा तयार होण्यास काही घटक कारणीभूत होऊ शकतात.  त्यामधेः त्वचेचे नुकसान (रसायनं, संक्रमणे, खरखरणे, सूर्यदाह), मद्य, संप्रेरकांमधे बदल, धूम्रपान, बीटा-ब्लॉकर्स, स्टीरॉईडरहित दाहविरोधी औषधे आणि ताण.

या रोगाचे दीर्घकाळपर्यंत कोणते परिणाम होतात ?

कंडरोगामुळे लोकांना भावनिक तसेच शारीरिक परिणाम होऊ शकतो.
संधीवात असलेल्या लोकांना होणारा कंडरोगीय संधीशोथ हा संयुक्त दाहाचा एक प्रकार, अत्यंत वेदनादायक आणि जखडून टाकणारा होऊ शकतो.

कंडरोग संक्रामक आहे काय ?

नाही, कंडरोग हा संक्रामक रोग नाही.  कोणालाही तो अन्य व्यक्तीपासून होऊ शकत नाही.

या रोगाच्या नियंत्रणासाठी काय करता येऊ शकेल ?

  • उन्हात भाजण्यासह कोणतीही जखम होणे टाळा.
  • मद्यपान आणि धूम्रपान पूर्णतः बंद करा.
  • स्थिती बिघडवतील अशी औषधे टाळा.
  • तणाव नियंत्रणात ठेवा.
  • त्वचेचा पाण्याशी संपर्क कमीतकमी ठेवा.  शॉवर आणि अंघोळ थोडक्यात करा, पोहणे मर्यादित ठेवा.
  • त्वचा खाजवू नका.
  • त्वचेशी घासणार नाहीत असे योग्य कपडे वापरा.
  • संक्रमण किंवा अन्य आजार उद्भवल्यास आपल्या डॉक्टरांना भेटा.

आहार महत्वाचा आहे काय ?

संबंधित व्यक्तीला चांगले वाटेल असा आहार ठेवणे हेच सर्वोत्तम, कारण कंडरोग झालेल्या लोकांना आरोग्यदायी जीवनशैली आणि चांगल्या आहार सवयींचा फायदाच होतो, जसा इतर कुणालाही होतो.  ठराविक अन्नामुळं एकतर त्वचेची स्थिती बिघडते किंवा सुधारते.

कंडरोग झालेल्या लोकांसाठी असा कोणताही विशिष्ट आहार नाही.  तथापि, आहाराचे अनेक प्रकार सुचवले आहेत.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate