हा वृध्दापकाळाचा आजार आहे.60 वर्ष वयापुढच्या 7%व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार लकवा म्हणूनही ओळखला जातो. वृध्दापकाळात येणारा हा आजार लगेच ओळखू येतो. हाताच्या मनगटाची आणि बोटांची न थांबणारी हालचाल (जपमाळ ओढल्यासारखी) ही याची खूण आहे. हाताने काही करायला गेले की तात्पुरती ही हालचाल थांबते पण काम संपले की लगेचच हालचाल चालू होते. हाताबरोबरच मान,डोके यांचीही हालचाल असू शकते.
थरकाप/कंप नसतो तेव्हा स्नायूंना ताठरपणा असतो. या आजारात चेहरा भावहीन मुखवटयासारखा असतो. एकूण हालचाल मंद असते. कपडे घालणे, खाणे, चालणे व इतर दैनंदिन व्यवहार खूपच सावकाश होतात. हस्ताक्षर लहान लहान होत जाते आणि ओळखू येईनासे होते. हातांच्या हालचाली परत परत त्याच त्याच क्रमाने होत राहतात. आवाज घोगरा, एकसुरी, अडखळत होतो. मात्र बोलणे नेहमीपेक्षा वेगाने चालते. घाम थोडा जास्तच येतो. चेहरा जास्त तेलकट-मेणचट दिसतो. मान-चेहरा पुढे जास्त सुकलेले असतात आणि पाठीला कुबड असल्याप्रमाणे दिसते. हातांचे कोपरे आणि मनगट नेहमी वाकलेले दिसतात.
बसल्या जागी उठताना जड जाते, यात बराच प्रयत्न करावा लागतो. चाल थोडी मंद आणि दुडकी असते आणि थोडी लंगडताना दिसते. पाय जमिनीवरून लवकर उचलत नाहीत.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...