অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जपानी ताप / जपानी मेंदूज्वर

डुकरांमध्ये जपानी तापाचे  विषाणू मोठया प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो. हे डास डुकरांना चावतात. डुकरांना मात्र या विषाणूपासून काहीही अपाय होत नाही.

लोकांना जपानी ताप रोग कसा होतो ?

जपानी तापाच्या विषाणूंनी संसर्गग्रस्त झालेल्या डासांच्या चावण्यामुळे होतो.

प्रसारणाचे मूलभूत चक्र कसे असते ?

जपानी तापरोगाच्या विषाणूंचे संसर्ग झालेल्या पाळीव डुकरांचे आणी जंगली पक्षांचे रक्त पिऊन डास संसर्गग्रस्त होतात.  त्यानंतर त्यांच्या रक्त शोषणाच्या दरम्यान हे डास जपानी तापरोग माणसांमध्ये पसरवतात.  पाळीव डुकरे आणि जंगली पक्षी यांच्या शरीरात हा विषाणू अनेकपटीने वाढतो.

जपानी तापरोगाचा विषाणू हा एक व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे संसर्गग्रस्त होत नाही.   उदाहरणार्थ, ज्याला हा रोग झाला आहे त्याला स्पर्श करुन किंवा त्याचे चुंबन घेऊन अथवा हा रोग झालेल्या रुग्णाची सेवा करणा-या कार्यकर्त्याकडून तो आपणांस रोगग्रस्त करत नाही.

केवळ पाळीव डुकरे आणि जंगली पक्षी हेच जपानी तापरोगाचे वाहक आहेत.

जपानी तापरोगाची लक्षणे

डोकेदुखीसह तापाशिवाय सहज लक्षणांच्या शिवाय सौम्य संसर्ग होतात.  अधिक तीव्र संसर्गाची लक्षणेही चटकन दिसतात आणि डोकेदुखी, उच्च ताप, मान अखडणे, स्तब्ध होणे, भान न राहणे, बेशुध्दी, कधीतरी मळमळणे (विशेषतः लहान मुलांमधे) आणि अंगग्रही (परंतु क्वचितच शिथील) अर्धांगवायू होतो.

जपानी तापरोगाचा परिपक्वतेचा काळ किती आहे ?

डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा 9 ते 12 दिवसांनंतर माणसांमध्ये जपानी तापरोग दिसू लागतो. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीत सुध्दा या विषाणूंचा प्रसार करतात. ज्या भागात स्थलांतर करणारे बगळयासारखे पक्षी काही काळ वास्तव्य करतात , तेथेही या पक्ष्यांकडून डासांमार्फत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या रोगाचा अधिशयन काळ सामान्यतः 5 ते 15 दिवस

जपानी रोगाने मृत्यु होण्याचे प्रमाण:

हे प्रमाण 0.3 टक्के ते 60 टक्के इतके आहे.

या विषाणूच्या विरोधात भारतात काही लस उपलब्ध आहे काय ?


भारतात या रोगावर अक्रियाशील उंदीराच्या मेंदूपासून तयार केलेली लस उपलब्ध आहे.  ही लस हिमाचल प्रदेशात कसौली इथे केंद्रीय संशोधन संस्थेत तयार केली जाते.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate