आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात आणि केरळ ही राज्ये चिकनगुनियाने प्रभावित आहेत.
भारतामधे गेल्या सहस्त्रकात चिकनगुनियाचा मोठा उद्रेक झाला होता, अनुक्रमे, 1963 (कोलकाता), 1965 (पॉंडीचेरी आणि चेन्नई, आंध्र प्रदेशातील राजामुंद्री, विशाखापट्टणम् आणि काकीनाडा, मध्य प्रदेशातील सागर आणि महाराष्ट्रातील नागपूर) आणि 1973 (बार्शी, महाराष्ट्र). त्यानंतर, विशेषतः महाराष्ट्रात 1983 आणि 2000 मधे किरकोळ प्रमाणात या रोगाचे उद्रेक होत राहिले.
चिकनगुनिया हा चिकनगुनिया विषाणूमुळे होतो, तो टोगोव्हीरीडीई कुलातील, आणि अल्फाव्हारस वंशातील आहे.
चिकनगुनिया हा एडीस डासाच्या, प्रामुख्याने एडीस इजिप्तीच्या चाव्याव्दारे प्रसारीत होतो. मनुष्य हा चिकनगुनिया विषाणूचा मुख्य स्रोत किंवा साठा समजलो जातो. त्यामुळे, हा डास प्रथम एका संक्रमित व्यक्तीला चावतो आणि तो नंतर दुस-या व्यक्तीला चावण्याने पसरतो. एक संक्रमित व्यक्ती दुस-या व्यक्तीला थेट संक्रमण पसरवू शकत नाही (याचा अर्थ हा संसर्गजन्य रोग नाही). एडीस इजिप्ती डास हे दिवसा चावतात
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/2/2020