स्तनाचा कर्करोग हा महिलांमधे सामान्यपणे होणारा कर्करोग आहे, आणि महिलांचे मृत्यु होण्याचे ते एक सर्वसामान्य कारण आहे. एका महिलेच्या जीवनकाळात, स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एकीला असतो.
लक्षणे
- स्तनात गाठ
- बोंडातून द्राव येणे
- आत वळलेले बोंड
- लाल । दाह होणारे बोंड
- स्तनाचा आकार वाढणे
- स्तनाचा आकार कमी होणे
- स्तन घट्ट होणे
- अस्थी वेदना
- पाठदुखी
धोक्याचे घटक
- स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास. निकटच्या नातेवाईकांमधे सर्वाधिक असणे
- वय वाढते तसा धोका वाढतो
- गर्भाशयाच्या कर्करोगाचा आधीचा प्रसंग
- यापूर्वी स्तनाचा कर्करोग झालेला असणे, असाधारण बदल आणि याआधीचा स्तनाचा रोग
- अनुवंशिक दोष किंवा बदल (दुर्मिळ)
- वयाच्या 12 व्या वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरु होणे
- वयाच्या 50 वर्षानंतर रजोनिवृत्ती संपणे
- मूल झालेले नसणे
- मद्यपान, अधिक चरबीयुक्त आहार, चोथायुक्त अधिक आहार, धूम्रपान, लठ्ठपणा, आणि आधी गर्भाशयाचा किंवा कोलोनचा कर्करोग झालेला असणे.
उपचार
- स्तनाच्या कर्करोगाचा उपचार तीन मुख्य घटकांवर आधारित असतोः
- जर ती स्त्री रजोनिवृत्तीला पोचली असेल
- हा कर्करोग किती पसरला आहे
- या कर्करोगाच्या पेशीचा प्रकार
- या कर्करोगाच्या प्रसाराचे प्रमाण याप्रमाणे निश्चित केले जातेः
- स्तनात तो कुठे झाला आहे
- कर्करोग ज्या वेगाने गाठींपर्यंत पोचला आहे
- कर्करोग स्तनातील खोलवरच्या स्नायूंमधे किती पसरला आहे
- हा कर्करोग दुस-या स्तनात पसरला आहे का
- हा कर्करोग इतर अवयव, जसे, हाडे किंवा मेंदूत पसरला आहे का
- पेशीच्या प्रकारानुसार, पेशींचे अधिक क्रियाशील आणि कमी क्रियाशील असे प्रकार आहेत. त्याशिवाय, या पेशींवरच ग्राहक असतात जे स्तनाच्या कर्करोगाला उपचारांना अधिक प्रतिसाद देण्यास सक्षम करतात.
- वरील घटकांच्या आधारे डॉक्टर हे ठरवू शकतातः
- गाठ आणि त्याभोवतीची उती किरणोत्सार किंवा त्याविना काढणे
- संपूर्ण स्तन काढणे
प्रतिबंध
- दर महिन्यात स्तनांची स्वतः तपासणी करणे
- आपल्या डॉक्टरांव्दारे स्तनांची दरवर्षी तपासणी करणे
- पोषक आहार घेणे
- आपल्याला स्तनाचा कर्करोग आहे असा संशय असल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तो बरा करता येतो परंतु निदान आणि उपचार लांबल्यास मृत्यु येऊ शकतो
स्त्रोत: पोर्टल कंटेंट टिम अंतिम सुधारित : 5/23/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.