पृथ्वीच्या उष्णकटिबंधामध्ये विशेष प्रमाणात आढळणाऱ्या रोगांना उष्णकटिबंधी रोग असे म्हणतात.
उष्णकटिबंधी रोग, त्यांवरील प्रतिबंधक उपाय व चिकित्सा |
||||
रोगाचे नाव |
रोगकारक आणि रोगवाहक |
प्रादेशिक प्रसार |
प्रतिबंधक उपाय |
चिकित्सा |
हिवताप |
प्लास्मोडियम वंशाचे प्रजीव, अॅनॉफेलीस वंशाच्या डासांच्या मादीचा दंश. |
उष्णकटिबंध. |
डासांचा नाश करणारी कीटकनाशके, डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी आणि शरीराच्या उघड्या भागावर डास चावणार नाहीत अशी औषधे लावणे. |
क्विनीन, निव्हाक्वीन व इतर औषधे. |
कृष्णमूत्र ज्वर |
प्लास्मोडियम वंशाचे प्रजीव, अॅनॉफेलीस वंशाच्या डासांच्या मादीचा दंश.
|
उष्णकटिबंध. |
डासांचा नाश करणारी कीटकनाशके, डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी आणि शरीराच्या उघड्या भागावर डास चावणार नाहीत अशी औषधे लावणे. |
क्विनीन, निव्हाक्वीन व इतर औषधे. |
काळा आजार |
लीशमॅनिया वंशाचे प्रजीव; वालुमक्षिका; कुत्रा. |
भारतातील आसाम वगैरे पूर्वेकडील प्रदेश; ईजिप्त, चीन वगैरे देश. |
रुग्ण अलग ठेवणे, ग्रस्त कुत्र्यांचा नाश, कीटकनाशके. |
अँटिमनीची पंचसंयुजी लवणे. |
पीत ज्वर |
एक विशिष्ट विषाणू (व्हायरस); ईडिस ईजिप्ताय जातीचा दिवसा चावणारा डास. |
दक्षिण अमेरिका, ईजिप्त आणि उत्तर आफ्रिकेतील उष्ण प्रदेश. |
कीटकनाशके, प्रतिबंधक लशीचा परिणाम चार वर्षे राहतो. |
- |
आमांश, यकृत विद्रधी इ. अमीबाजन्य विकार |
एंटामीबा हिस्टॉलिटिका हा प्रजीव; पाणी, दूध वगरे अन्नाशी संबंध असलेले वाहक. |
सर्व उष्णकटिबंध. |
अन्न, पाणी वगैरे गोष्टी स्वच्छ आणि जंतुरहित करून (उकळून) वापरणे; माशांचा नाश करणे; वाहक शोधून त्यांचा अन्नाशी संबंध येणार नाही अशी व्यवस्था करणे. |
एमिटीन, व्हायोफॉर्म, क्लोरोक्वीन, टेरामायसीन. |
निद्रा रोग |
ट्रिपॅनोसोमा गँबिएन्स व ट्रि. ऱ्होडेसिएन्स या जातींचे सूक्ष्मजंतू, त्सेत्से माशी. |
मध्य व दक्षिण अमेरिका; पश्चिम, मध्य आणि विषुववृत्तीय आफ्रिका, विशेषतः काँगो व न्यासालँड. |
माशांचा नाश, माशा चावणार नाहीत असे कपडे वापरणे. |
आर्सेनिकापासून तयार केलेली औषधे. |
डेंग्यू (हाडमोड्या) ज्वर |
एक विशिष्ट विषाणू; ईडिस ईजिप्ताय जातीचा डास. |
सर्व उष्णकटिबंधी प्रदेश. |
कीटकनाशकांचा उपयोग करून डासांचा नाश करणे. |
- |
वालुमक्षिका ज्वर, त्रिरात्र ज्वर |
एक विशिष्ट विषाणू; वालुमक्षिका. |
यूरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील २०० ते ४५० मधील उत्तरेकडील प्रदेश. |
कीटकनाशके. |
- |
पुनरावर्ती ज्वर |
बोरेलिया वंशाचे सर्पिल जंतू; गोचीड; उवा. |
सर्व उष्णकटिबंधी प्रदेश. |
उवा व गोचिडींचा नाश करणे. |
पेनिसिलीन, टेट्रा-सायक्लीन, आर्सेनिका- पासून तयार केलेली औषधे. |
खंडितकायी कृमी रोग (शिस्टोसोमियासीस) |
खंडितकायी कृमी; गोगलगाय. |
आफ्रिका, पश्चिम आशिया. |
मलमूत्राने पाणी दूषित न होऊ देणे. |
अँटिमनीपासून केलेली औषधे, फुआडीन. |
यॉज |
सर्पिल जंतूची एक जात. |
श्रीलंका, वेस्ट इंडीज, फिलिपीन्स. |
रुग्णाशी संसर्ग टाळणे. |
उपदंशाप्रमाणे पेनि-सिलीन वगैरे औषधे. |
प्राची व्रण (ओरिएंटल सोअर), दिल्ली गळू. |
लीशमॅनिया ट्रॉपिका जातीचा प्रजीव; कृंतक प्राण्यावरील वालुमक्षिका. |
उत्तर भारत, पंजाब, अरबस्तान, स्पेन, इटली, ग्रीस. |
कीटकनाशके. |
अँटिमनीपासून बन-विलेली औषधे. |
विषुववृत्ताच्या उत्तरेचे कर्कवृत्त आणि दक्षिणेचे मकरवृत्त यांच्यामधील सु. ४७० प्रदेशास उष्णकटिबंध असे म्हणतात. या प्रदेशातील हवा दमट आणि सूर्याच्या उत्सर्गी किरणांनी तापलेली असते. अशी हवा अनेक परजीवींना (अन्य प्राण्यांच्या शरीरावर उपजीविका करणाऱ्या जीवांना) पोषक असल्यामुळे त्या परजीवींमुळे होणारे विशिष्ट रोग या प्रदेशात आढळतात.
अंतिम सुधारित : 8/24/2020
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...