অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पौगंडावस्था

पौगंडावस्था

  1. प्रस्तावना
  2. मोठे परिवर्तन, मोठे आव्हान
  3. शरीराची मूलभूत निगा
  4. पालकांसोबत सुसंवाद
  5. आरोग्यसमस्यांचा पौगंडावस्थेवर परिणाम होतो
    1. पौगंडावस्थेतील आरोग्याची भारतातली स्थिती.
    2. मनाचे निरोगीपण
    3. घातक पदार्थांचे सेवन
    4. अपघात
    5. हिंसाचार
    6. पोषण
    7. लैंगिक आणि पुनरुत्पादनासंबंधी आरोग्य
    8. एचआयव्ही
    9. पोषण
  6. हाडांचे (अस्थि) आरोग्य
    1. हाडांच्या आरोग्‍याची मूलभूत माहिती
    2. हाडांची संरचना
    3. हाडांचे मूलभूत घटक खालील प्रमाणे आहेत
    4. हाडाची वाढ
    5. आहार आणि हाडांचे आरोग्‍य
    6. हाडांच्या आरोग्‍यास प्रभावित करणारी कारके
    7. ओस्टिओपोरोसिस
    8. ऑस्टियोपोरोसिसला रोखणे
    9. रोजच्या आहारातील कॅल्शियमचे प्रमाण
    10. विविध अन्न पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण
    11. हाडांसाठी व्यायाम

प्रस्तावना

जागतिक आरोग्य संघटनेनं पौगंडावस्थची व्याख्या दोनप्रकारे केली आहे. एक वयानुसार (10 ते 19 वर्षांदरम्यानचा काळ) आणि दुसरी विशिष्ठ गुणधर्म असलेल्या जीवनाच्या टप्प्यानुसार. या गुणधर्मांमधे पुढील समाविष्ट आहेतः 1.   जलद शारीरिक वाढ आणि विकास
2.   शारीरिक, सामाजिक, मानसिक परिपक्वता (सर्व एकाचवेळी नाही)
3.   लैंगिक परिपक्वता आणि लैंगिक क्रिया
4.   प्रायोगिकता
5.   प्रौढ मानसिक प्रक्रियांचा विकास आणि प्रौढत्वाची ओळख
6.   सामाजिक आर्थिक परावलंबनातून सापेक्ष स्वावलंबनात स्थित्यंतर

मोठे परिवर्तन, मोठे आव्हान

वयात येणे वयाच्या 10 व्या आणि 16 व्या वर्षाच्या दरम्यान सामान्यतः सुरु होते.  ही एक क्रमाक्रमाने होत जाणारी प्रक्रीया असते.  शैशवातून प्रौढत्वात बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या वयात बदल होतो.  शरीरात होणारा बदल, स्वभावात, जीवनशैलीत होणारे बदल ही त्याची काही लक्षणे आहेत. या प्रक्रियेदरम्यान होणारे बदल याप्रमाणे आहेत –

1. हात, पाय, बाहू, नितंब आणि छातीचा आकार वाढत जातो.  शरीरता संप्रेरकांचे उत्पादन सुरु होते जे अत्यावशअयक रासायनिक संवाहक असताता आणि ते शरीराला कसं वाढायचं आणि बदलायचं ते सांगतात.
2. शरीराची गुप्तांगं मोठी होऊ लागतात आणि त्यातून द्रवांची निर्मिती होऊ लागते.
3. त्वचा आणखी तैलीय होऊ लागते.
4.  काख, पाय आणि हात याठिकाणी केस येणे.

शरीराची मूलभूत निगा

शरीराची चांगली काळजी घेण्यासाठी काही साध्या आणि मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे.
1.  वयात आल्यानंतर, घामाचे प्रमाण वाढते.  अंघोळ केल्याने स्वच्छता राखता येते आणि सुगंध चांगला येतो.
2.  दात किडणे टाळण्यासाठी आणि चांगला श्वास राखण्याकरिता दिवसातून दोनवेळा दात स्वच्छ करा.
3.  तैलग्रंथी सीबम (एक तेलकट द्राव) अधिक प्रमाणात निर्माण करु लागल्यानं, तारुण्यपिटीका तयार होतात.  कुमारवयात तारुण्यपिटीका होणे ही नैसर्गिक प्रक्रीया आहे त्यांना पूर्णतः टाळण्याचा कोणताही मार्ग नाही.  त्वचा स्वच्छ ठेवणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे.
4.  पोषक आहार आवश्यक आहे.  अतिशय गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
5.  चांगल्या आरोग्यासाठी आणि सुदृढ मनासाठी डोकं शांत ठेवणं आणि सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे.

पालकांसोबत सुसंवाद

पौगंडावस्था हा असा काळ आहे ज्यामधे युवा मुलं आणि त्यांच्या पालकांना एकमेकांशी सुसंवाद साधणं अवघड जातं.  युवा मलांनी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात –

1.   आपल्या कुटुंबाचा आदर करावा.
2.   पालकांच्या मूल्यांना आणि श्रध्दा समजून घ्याव्यात.
3.   हे लक्षात ठेवावं की, पालक मुलांच्या चांगल्या हिताचाच विचार करतात.
4.   आपल्या पालकांशी मोकळे आणि प्रामाणिक राहावे.
5.   पालकांची काळजी घ्यावी आणि त्यांचा आदर करावा.

आरोग्यसमस्यांचा पौगंडावस्थेवर परिणाम होतो

पौगंडावस्थेतील आरोग्याची भारतातली स्थिती.

आज लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे - आपल्या देशात १०८ कोटी १० लाखांपेक्षा जास्त लोक राहतात. यातील पौगंडावस्थेतील म्हणजे १० ते १९ वर्षे वयातल्या मुलामुलींचे एकुणातील प्रमाण २२.५ टक्के उर्फ २२ कोटी ५ लाख आहे. प्रत्येकाचे जीवनमान आणि त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गरजा आणि प्रश्न वेगवेगळे आहेत. तरुणांचे म्हणजे १० ते २४ वर्षे वयोगटातील जनतेचे प्रमाण जवळजवळ ३० टक्के म्हणजे ३३ कोटी १ लाख आहे. (२००१ च्या जनगणनेनुसार)

पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना भरपूर उत्साह असतो, त्यांना नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करण्याची जिद्दही असते. तरूण पिढी प्रत्येक देशाचे बलस्थान असते आणि त्यांचा सर्वांगीण उत्तम वाढ झाली तर देशाचे भविष्यदेखील उज्ज्वल असते. ह्या वयोगटातले मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने साधारणपणे तरूणांची तब्येत चांगलीच असते असे मानले जाते. मात्र मृत्युदराची आकडेवारी ह्या बाबतीत चुकीचे चित्र उभे करणारी आहे. उलट पौगंडावस्थेतील काही विशिष्ट आरोग्यसमस्यांमुळे आजारसदृश स्थिती निर्माण होते.

पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या आरोग्यपूर्ण विकास आणि वाढीसाठी पूरक आणि सहाय्यक कृतींची गरज आहे म्हणजे वेळ आल्यावर ते वागणुकीच्या समस्यांचा सामना करू शकतील. त्यांची दुर्बलता कमी करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या मध्यस्थीची गरज असते - उदाहरणार्थ माहिती आणि कौशल्ये, सुरक्षित आणि आश्वासक वातावरण, योग्य आणि सहज मिळणार्या आरोग्य तसेच समुपदेशन-सेवा.

मनाचे निरोगीपण

बालपण संपताना आणि पौगंडावस्थेच्या सुरुवातीला अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात - वागण्याबोलण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या सवयी, नैराश्य, चिडचिड किंवा हातघाईवर येणे, लैंगिक वर्तणूक व समस्या इ. अर्थात् ह्यावर उपाय म्हणजे समाजात वावरण्याशी संबंधित कौशल्ये वाढवणे, समस्यानिवारणाचे मार्ग शिकणे आणि आत्मविश्वास वाढवणे. आरोग्यसेवकांना तरूण पिढीशी संवाद साधता यायला हवा म्हणजे समुपदेशन, वर्तणूकविषयक उपचार किंवा गरज असल्यास मानसोपचार करून त्यांच्या संभाव्य मानसिक समस्यांवर वेळेवर उपचार होऊ शकतील.

घातक पदार्थांचे सेवन

मादक द्रव्ये, तंबाखू आणि दारूवर कायद्याची बरीच बंधने आहेतच मात्र ह्यांचे सेवन टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास आरोग्यपूर्ण विकास आणि वाढ साधता येईल. ह्या आणि अशातर्हेच्या पदर्थांच्या सेवनातून उद्भवणार्या धोक्यांची जाणीव असणे, मित्रांच्या आग्रहाला बळी न पडण्यास शिकणे आणि ताणतणावांचा योग्य रीतीने सामना करणे ह्या मार्गांनी पौगंडावस्थेतील पिढीचे ह्या पदार्थांबाबतचे आकर्षण कमी करता येते.

अपघात

पौगंडावस्थेतील अनेक मुलेमुली आज रस्त्यावरील अपघातांना बळी पडताना आढळतात. अतिवेगावर मर्यादा आणणे आणि त्यामधील धोक्याची जाणीव देणे हे उपाय आहेत. बालपण संपताना आणि पौगंडावस्थेच्या सुरुवातीला अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात - वागण्याबोलण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या सवयी, नैराश्य, चिडचिड किंवा हातघाईवर येणे, लैंगिक वर्तणूक व समस्या इ. अर्थात् ह्यावर उपाय म्हणजे समाजात वावरण्याशी संबंधित कौशल्ये वाढवणे, समस्यानिवारणाचे मार्ग शिकणे आणि आत्मविश्वास वाढवणे. आरोग्यसेवकांना तरूण पिढीशी संवाद साधता यायला हवा म्हणजे समुपदेशन, वर्तणूकविषयक उपचार किंवा गरज असल्यास मानसोपचार करून त्यांच्या संभाव्य मानसिक समस्यांवर वेळेवर उपचार होऊ शकतील.

हिंसाचार

मुले आणि पौगंडावस्थेतील पिढीसाठी सामाजिक विकासाचे कार्यक्रम हाती घेणे आणि जीवनविषयक कौशल्ये शिकवणे हे उपाय करून हिंसाचार आणि हिंसक वृत्ती काबूत ठेवता येतात. शिक्षक तसेच पालक पाठिंबा देणारे असल्यास ते शारीरिक शिक्षा न करता शिस्त लावतात आणि प्रश्न सोडवण्याचे विविध मार्ग शिकवून हिंसक वृत्ती कमी करतात. तरीही तिने डोके वर काढल्यास आरोग्यसेवेने ती योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे म्हणजे हिंसेला - विशेषतः लैंगिक - बळी पडलेल्यांना संवेदनशील रीतीने उपचार मिळू शकतील. मानसिक आणि सामाजिक पाठिंबा सातत्याने मिळाल्यास पौगंडावस्थेतील मुलेमुली हिंसाचाराच्या दूरगामी परिमामांचा सामना चांगल्या प्रकारे करू शकतात. तसेच त्यांच्याडून ही हिंसक वृत्ती जोपासली जाण्याची शक्यता कमी होते.

  • प्रबोधन आणि कायदे ह्यांची सांगड घालून वाहनचालकांना हेल्मेट घालण्यास आणि सीटबेल्ट लावण्यास प्रवृत्त करणे तसेच दारू वा तत्सम मादक पदार्थांच्या सेवनानंतर वाहन चालण्यास बंदी करणे
  • सुरक्षित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक-सेवा उपलब्ध करून देऊन वाहने चालवण्याचे प्रमाणच कमी करणे
  • पर्यावरण सुरक्षित ठेवणे तसेच बुडणे, भाजणे, पडणे ह्यांसारखे अपघात टाळण्याबाबत मुले आणि पौगंडावस्थेतील पिढीचे शिक्षण करणे. अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने उपचार मिळवून देऊन तिचा जीव वाचवण्याचे महत्व पटवणे
  • पोषण

    बालपणीच गंभीर कुपोषण झाल्यास त्याचे वाईट परिणाम एकंदर वाढ खुंटण्यामध्ये होतो. ह्याचे सामाजिक परिणामदेखील गंभीर आहेत. पोषणमूल्ये असलेले अन्न मिळणे पौगंडावस्थेसाठीही खूपच महत्वाचे आहे. ह्या वयातील मुलींमध्ये अॅनिमियाचे म्हणजे अंगात रक्त न भरण्याचे प्रमाण फार आढळते. कमी वयातली गर्भधारणा टाळली आणि खाणेपिणे व्यवस्थित ठेवले तर गर्भवतींना होणारे त्रास आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी होईलच शिवाय कुपोषणाचे परिणाम पुढच्या पिढीत झिरपण्याचे दुष्टचक्र थांबेल. रोगांचा संसर्ग टाळणेही महत्वाचे आहे. पोषणयुक्त आहार घेण्याची आणि भरपूर व्यायाम करण्याची सवय लागण्यासाठी हे वय आदर्श आहे असे म्हणता येईल. कारण मोठेपणी होऊ शकणारे पोषणाशी संबंधित आजार टाळण्यासाठी पौगंडावस्थेतील ही मानसिक आणि शारीरिक पायाभरणी उपयोगी पडते. आहार आणि आरोग्याच्या चांगल्या सवयींद्वारे जगभर दिसू लागलेल्या लठ्ठपणाशीही सामन करता येईल.

    लैंगिक आणि पुनरुत्पादनासंबंधी आरोग्य

    पौगंडावस्थेतील मुलामुलींना लैंगिक आणि पुनरुत्पादनासंबंधी आरोग्याचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांनी ह्या शिक्षणाचा उपयोग रोजच्या आयुष्यात करणे तितकेच महत्वाचे आहे. तसेच कार्यक्षम आणि संवेदनशील आरोग्यसेवकांकडून त्यांना ह्यासंबंधीचे प्रतिबंधात्मक आणि रोगनिवारक उपचार सहजपणे मिळणेही आवश्यक आहे. पौगंडावस्थेत होऊ शकणार्या लैंगिक जबरदस्तीचा सामना विविध पातळ्यांवर व्हायला हवा. ह्याबाबत कडक शिक्षांची तरतूद आणि अंमलबजावणीही करणे आवश्यक आहेच शिवाय समाजाने ह्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करायला हवा. शिक्षणसंस्था, कार्यालये तसेच एकंदर समाजात वावरणार्या मुली आणि महिलांना लैंगिक छळ आणि जबरदस्तीपासून संरक्षण मिळाले पाहिजे.

    कमी वयातली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाचे कमीतकमी वय कायद्याने ठरवून दिले आहे, त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. समाजातील सर्वांनीच मुलीचे स्त्रीमध्ये किंवा पत्नीमध्ये आणि आईमध्ये रूपांतर होण्यासाठी पुरेसा वेळ जाऊ देणे गरजेचे आहे.

    एचआयव्ही

    तरुण पिढीने लैंगिक अनुभवविश्वाच्या उंबरठ्यावर असण्याचा आणि त्यांना एचआयव्हीसारखे रोग होण्याच्या शक्यतेचा फार जवळचा संबंध आहे. ह्या वयातील एचआयव्ही टाळण्याच्या कार्यक्रमात लैंगिक संबंधंपासून दूर राहणे आणि असे संबंध शक्यतितके उशीरा सुरू होऊ देणे ह्या बाबींचा मुख्यतः समावेश आहे. लैंगिकदृष्ट्या कार्यशील असलेल्यांनी आपल्या जोडीदारांची संख्या कमीतकमी ठेवणे, त्यासंबंधीचे शिक्षण घेणे, सर्वमावेशक प्रतिबंधक सेवांचा लाभ घेणे, कंडोम वापरणे ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. प्रबोधनात्मक कार्यक्रमांतून आरोग्यास असलेल्या इतर धोक्यांचीही जाणीव करून द्यायला हवी, उदाहरणार्थ तंबाखू किंवा मादक द्रव्ये इ. एचआयव्हीसाठीच्या तपासण्याच्या केंद्रांपर्यंत तरूण पिढील सहजपणे विनसंकोच पोहोचता आले पाहिजे. एचआयव्हीग्रस्तांनादेखील ह्या कर्यक्रमांत सामील करून घ्यायला हवे.

    पोषण

    पोषणयुक्त अन्न प्रत्येक मनुष्याला आवश्यक तर आहेशिवाय ती आरोग्याची गुरुकिल्लीच आहे. सर्वांगीण विकास आणि वाढीसाठी अगदी बालपणापासून चौरस आहार मिळणे गरजेचे आहे. आहारशास्त्रामध्ये अन्नामधील सर्व घटक विचारात घेतले जातात. लोकांच्या विशिष्ट गटांची पोषणमूल्यांची एकंदर गरज लक्षात घेतली जाते. ही गरज वय, लिंग, उंची, वजन, दररोजची कामे आणि वाढीचा दर अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. ह्यापुढील विभागात ह्या सर्वांचा तपशीलवार विचार केला आहे.

    हाडांचे (अस्थि) आरोग्य

    हाडे आपल्या शरीराकरिता फार महत्वाची आहेत, म्हणून आपल्या शरीरातील हाडे ही आयुष्‍यभर निरोगी ठेवणे महत्वपूर्ण आहे. निरोगी हाडे शरीराला गतिशील ठेवतात व दुखापतींपासून संरक्षण देऊन, बळकट आधार देतात. कॅल्शियम सारखी महत्वपूर्ण खनिजे साठवून हे आपल्या शरीराच्या विविध अवयवांसाठी बँकेचे काम करतात.

    हाडे जिवंत असतात व त्यांत सतत बदल होत असतो, म्हणजे आयुष्‍यभरात नवीन हाडे तयार होतात आणि जुनी हाडे लोप पावतात? प्रौढांमध्ये, पूर्ण सांगाडा हा दर 7-10 वर्षांनी पुनर्स्‍थापित होत असतो.

    तरूण असतांना योग्‍य पोषण आणि व्यायामाद्वारे हाडांची काळजी घेतल्‍यास हाडांचा बळकटपणा राखला जाऊन आपल्याला पाहिजे असलेल्या पद्धतीने जीवन जगण्‍यास मदत मिळते. येथे हाडांच्‍या आरोग्‍यात, आपण हाडांची मूलभूत माहिती आणि त्यांचे आरोग्य समजून घेणार आहोत. आम्ही आपल्याला त्याबद्दलची वस्तुस्थिती सांगून त्यासाठी काही खास पाऊल उचलण्यास मदत करु जसे आहार प्रबंधन आणि योग्य व्यायाम कसा करावा हे सांगू जेणे करुन स्त्रियांच्या बाबतीत उच्‍च प्रमाणात आढळणारा रोग ओस्टियोपोरोसिस आपल्याला रोखता येईल.

    हाडांच्या आरोग्याची मूलभूत माहिती

    हाडे या जीवित पेशी आहेत ज्या हाडाच्या सांगाड्याचा मुख्य घटक असतात. प्रौढ व्‍यक्‍तीच्‍या शरीरात 206 हाडे आसतात. आणि बाळाच्या शरीरात 300 हाडे असतात. हाडे आपल्या शरीराला गतिशीलता देतात आणि आंतरिक इंद्रियांना संरक्षण देतात.

    हाडांची संरचना

    हाडे ही प्रोटीन, कॅल्शियम,फॉस्फेट आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांची बनलेली असतात. कोलेजेन (एक प्रकारचे प्रथिन), एक जोडणारा पदार्थ आहे, जो हाडांची संरचना आणि चौकट तयार करण्यास मदत करतो.

    हाडांचे मूलभूत घटक खालील प्रमाणे आहेत

    पेरियोस्टेयम (Periosteum) हा एक पातळ पडदा आहे जो हाडाच्या बाहेरील आवरणाचे काम करतो. मज्‍जातंतू आणि रक्तवाहिन्‍या यात असतात.

    कॉम्पॅक्ट हाडे (Compact bone) हाडाचे बाहेरील आवरण हयापासून बनलेले असते आणि हे फार दाट असते. जेव्हा आपण सांगड्याकडे पाहतो, आपल्याला दिसणारी हाडे कॉम्पॅक्‍ट हाडे असतात.

    कॅन्‍सलस हाडे (Cancellous bone) हे हाड एखाद्या स्पंज सारखे दिसते आणि कॉम्‍पॅक्‍ट हाडासारखे कठिण नसते. हाडाच्‍या सर्वांत जास्‍त आतल्‍या भागाला म्हणजे बोन मॅरोला हा आच्‍छादन पुरवितो.

    हाडाची वाढ

    हाडांमध्ये सतत झीज (जुनी हाडे जाणे) आणि साठा (नवीन हाडे तयार होणे) ह्या सशक्त प्रक्रिया घडत असतात ज्‍याला हाडांचे चयापचय म्हणतात.

    हाडांच्या नवनिर्माण आणि साठा प्रक्रियेत दोन महत्वाच्या पेशीं कार्यरत असतात त्या आहेत: :

    •ओस्टिओब्लास्ट (Osteoblasts) ह्या पेशीं नवीन हाडे बनण्याच्या प्रक्रियेत कार्यरत असतात.
    •ओस्टिओक्लास्ट (Osteoclasts) ह्या पेशी हाडांच्या झिजण्याच्या प्रक्रियेत कार्यरत असतात.

    ह्या दोन्ही पेशींतील समतोलानेच आपल्या शरीरातील खनिजांचे योग्‍य संतुलन राखले जाते जे शारीरिक हालचालींकरीता गरजेचे आहे. झिजण्याची प्रक्रिया आणि साठा प्रक्रिया आयुष्‍यभर चालत असते.

    आहार आणि हाडांचे आरोग्

    पुरेशा प्रमाणात कॅल्शियमचे सेवन हाडांचे आरोग्य राखण्यास आवश्यक आहे कारण शरीरात 90% कॅल्शियम हे हाडांमध्येच असते. इतर महत्वाची पोषके जसे फॉस्फोरस, मॅग्नेशियम, फ्लुराईड आणि के जीवनसत्व यांचा देखील समावेश असतो. कॅल्शियमचे प्रमाण उच्‍च असणारे अन्न पदार्थ म्हणजे दूध आणि डेअरीचे पदार्थ.

    के जीवनसत्व शरीरात आहारातून कॅल्शियम शोषण्यास मदत करते. सूर्यप्रकाशाद्वारे के जीवनसत्वाचा पुरवठा शरीरास आपल्या त्‍वचेद्वारे होत असतो.

    हे पौष्टिक आहाराच्या स्‍वरूपात जसे फोर्टिफाइड दूध, व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड खाद्य पदार्थ आणि मासे यांपासून प्राप्त केले जाऊ शकते.

    हाडांच्या आरोग्यास प्रभावित करणारी कारके

    हाडांच्या आरोग्‍यास प्रभावित करणारी विविध कारके आहेत:

    • आनुवांशिक : कुटुंबात हाडांचे विकार दिसून येऊ शकतात. जर आपल्या पालकांमध्ये किंवा धाकटया बहिण-भावंडांमध्‍ये हाडांचे विकार असल्‍यास, तुम्हाला ही ते होऊ शकतात. काही जाती समूहांची हाडे इतर जातीय समुदायांच्‍या तुलनेने जास्‍त बळकट असतात.
    • आहार: निरोगी हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. विडी-सिगारेट ओढणे आणि दारुच्‍या सेवनाने हाडांचे आरोग्य खालावण्याचा धोका वाढतो.
    • शारीरीक हालचाल : नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचालींमुळे हाडांची ताकद वाढते.
    • वय: वयोमानाप्रमाणे हाडांची ताकद कमी होत जाते. रजोनिवृत्ती नंतर हाडांच्या तक्रारी किंवा विकार वाढू शकतात
    • शरीराचा आकार : बारीक आणि कमी वजनाच्या स्त्रियांची हाडे अशक्त असतात.

    कॅल्शियम युक्त आहार घेऊन आणि शारीरिक व्यायामाने हाडांची बळकटी राखण्यास मदत होते. हाडांच्या तक्रारींमुळे जीवनाची गुणवत्ता खालावू शकते.

    ओस्टिओपोरोसिस

    ऑस्टियोपोरोसिस तेव्हां होतो जेव्हां कॅल्शियम सारखे खनिज प्रामुख्याने हाडांत कमी होऊ लागते. ऑस्टियोपोरोसिस स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो, पण पुरुषांमध्ये कमी प्रमाणात आढळतो.

    ऑस्टियोपोरोसिस मध्ये काही ही लक्षणे दिसत नाहीत व सामान्यपणे हा वयोमानाच्‍या प्रक्रियेचा भाग आहे. पण, काही स्त्रियांमध्ये इतर काही रोगांबरोबर हा लवकर येतो. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती नंतर देखील ह्याचा धोका वाढतो. याची लक्षणे दिसत नसल्याने जेव्हा एखादे फ्रॅक्चर किंवा सतत अस्थिभंग होऊ लागतो तेव्हाच डॉक्टर याचे निदान करु शकतात.

    अस्थि खनिज घनत्व (बी.एम.डी.) या चाचणीने आपले डॉक्टर आपल्याला शरीरातील खनिजांच्या प्रमाणातील घट सांगू शकतात.

    ऑस्टियोपोरोसिसला रोखणे

    सशक्त हाडांची वाढ लहान वयात सुरु होते. आयुष्‍यभर निरोगी राहिल्‍याने शरीरातील हाडे देखील सशक्त राहतात. सशक्त हाडांसाठी आवश्‍यक असलेले घटक आहेत :

    हार्मोन : प्रौढ आणि तरुण स्त्रियांमध्ये एस्ट्रोजन हार्मोनचे उत्पादन शरीरातील हाडांच्या घनतेचा समतोल राखते. एस्ट्रोजन हार्मोनच्या उत्पादनाची कमतरता असल्‍यास शरीरातील हाडांच्या घनतेचा समतोल राखण्यास खालील बाबतीत व्यत्यय येतो आणि ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो

    • रजोधर्म न येणे (Absence of periods)
    • रजोधर्म नियमित नसणे (Infrequent menstrual cycles)
    • प्रथम रजोधर्म येण्यास खूप उशीर लागणे (Delay in the onset of the first period)
    • किंवा रजोधर्म फार लवकर जाणे (Early menopause)

    जीवनशैली (Lifestyle) : स्त्रियांमध्ये धूम्रपानामुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि अस्थि खनिज घनत्वात कमतरता येते (अस्थि खनिज घनत्व). ऑस्टियोरोटिक स्त्रिया जर ऑस्टियोपोरोसिसच्या औषधोपचाराच्‍या दरम्‍यान धूम्रपान करीत राहिल्या तर त्यांच्या ऑस्टियोपोरोसिसच्या औषधोपचाराचा परिणाम पूर्णपणे मिळत नाही. ज्या स्त्रिया जास्त प्रमाणात मद्य सेवन करतात त्या देखील ऑस्टियोपोरोसिसला बळी पडू शकतात.

    ऑस्टियोपोरोसिस  होण्यास कारणीभूत असणा-या इतर जीवन पद्धती खालील प्रमाणे आहेत :
    कॅल्शियमचे कमी प्रमाणात सेवन,

    • फार कमी शारीरिक हालचाली,
    • जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन,
    • जास्त प्रमाणात मद्य सेवन

    पोषण (Nutrition)
    कॅल्शियम (Calcium) हाडांची बळकटी गाठण्यासाठी कॅल्शियम हा एकमेव पोषक घटक आहे. ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठी प्रत्येकाने समतोल आहार घेणे फार गरजेचे आहे ज्यात डेअरी पदार्थांचा समावेश असावा, ज्यात कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते.

    व्हिटॅमिन डी (Vitamin D) व्हिटॅमिन डी कॅल्शियम मेटाबोलिझमच्‍या प्रक्रियेच्‍या फार महत्वाच्‍या कार्यांत मदत करीत असते.  जठरांतून आणि मूत्रपिंडातून कॅल्शियम शरीरातील पेशी आणि रक्तात शोषून घेण्यास व्हिटॅमिन डी महत्‍वाचे कार्य करते. ते कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचविण्यात देखील कार्यरत असते.

    रोजच्या आहारातील कॅल्शियमचे प्रमाण

    श्रेणी

    वय(वर्ष)

    कॅल्शियम (एम.जी.)

    लहान मुले

    1-3

    500

    4-8

    700

    मुली

    9-11

    1000

    12-18

    1300

    स्त्रिया

    19-50

    1000

    >50

    1300

    गर्भावस्था/स्तनपान

    14-18

    1300

    19-30

    1000

    31-50

    1000

    विविध अन्न पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण

    विविध अन्न पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण )

    डेअरी

    अन्न स्त्रोत

    देण्याचे प्रमाण

    कॅल्शियम

    सामान्य दूध

    1 कप (250 एम.एल)

    285

    स्किम्ड मिल्क

    1 कप (250 एम.एल)

    310

    सामान्य दही

    1 टब (200 ग्रॅ)

    340

    कमी फॅटचे दही

    1 टब (200 ग्रॅ)

    420

    सेडार चिझ

    ४०ग्रॅ तूकडा

    ३१०

    कमी चरबीयुक्त कॉटेज चिझ

    100 ग्रॅ

    80

    डेअरी व्यतिरिक्त

     

     

    पांढरा ब्रेड

    1 स्लाईस

    15

    उकडलेला पालक

    1 कप (340 ग्रॅ)

    170

    डब्यातील सालेमान (+ हाडां सहित)

    ½ कप

    230

    डब्यातील सारडिन्स (+ हाडां सहित)

    50 ग्रॅ

    190

    बदाम

    15 बदाम

    50

    हाडे ही आयुष्‍यभर नवीन हाडे तयार करणे आणि जुनी हाडे लोप पावण्याच्या प्रक्रियेतून जात असतात. जसे जसे तुमचे वय वाढते, जास्त प्रमाणात हाडे झिजतात व कमी प्रमाणात वाढ होते आणि ही सामान्य प्रक्रिया आहे. आपले आरोग्य समतोल राखण्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी घेणे फार महत्वाचे आहे. ऑस्टियोपोरोसिस वर उपचार आणि त्‍याच्‍यापासून बचावासाठी उपाय यासाठी आपल्या डॉक्टरशी संपर्क साधून माहिती मिळवा आणि त्यांचा सल्ला घ्या.

    हाडांसाठी व्यायाम

    जस-जसे वय वाढते, शरीरात अनेक बदल होत असतात. काही मुख्य बदल वयोमानाप्रमाणे शरीरात होत असतात ते खालील प्रमाणे आहेत :

    • हाडांची घनता आणि क्षमता कमी होणे.
    • मांसपेशींचा आकार आणि ताकद कमी होणे
    • स्नायुंमधील लवचिकता आणि ताकद कमी होणे
    • उप-अस्थिंची झीज आणि सूज येणे

    वरील सर्व शारीरिक बदलांमुळे आपले शरीर जास्तीत जास्त फ्रॅक्चर, लागणे, ऑस्टियोपोरोसिस  किंवा आर्थ्रायटिस सारख्या दुखण्यांना बळी पडू शकते. म्हणून नियमित व्यायाम केल्याने वरील सर्व दुखण्यांना आपण थोपवू शकतो आणि अशा प्रकारच्या जीर्ण व्याधींपासून व ऑस्टियोपोरोसिस  किंवा ऑस्टियोअर्थ्रायसिस पासून संरक्षण करतात. नियमित व्यायाम केल्याने हाडांची झीज देखील कमा होते आणि मांसपेशीय ताकद मिळते, समतोल राखला जातो जेणे करुन फ्रॅक्चर आणि पडणे इत्‍यादिंपासून होणारा धोका टाळता येतो.

    व्यायामाचा सराव करा आणि सुरुवात करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरने सांगितलेले व्यायामच करा. आपल्या शरीराला झेपेल असे आणि शरीराला उपयुक्त असे व्यायाम आपले डॉक्टर आपल्याला सांगतील त्या प्रमाणे त्यांच्या सल्ल्यानेच व्यायाम करा. आपण स्वतःच्या मर्जीने व्यायाम ठरवू किंवा करु नका.

     

    स्त्रोत : Indianwomenshealth

    अंतिम सुधारित : 4/23/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate