चेहऱ्यावर मुरूम येण्याची अनेक कारणे आहेत. वाढत्या वयात हार्मोन्स (आंतररस) मध्ये होणारा बदल हे त्यातील मुख्य कारण, याशिवाय चेहऱ्याची कांती जास्त तेलकट असणे, तेलकट पदार्थ जास्त खाणे अशी इतर करणेही असू शकतात. आंतररसाच्या प्रभावाखाली त्वचेचा तेलकटपणा वाढतो. त्या वाढत्या तेलावर त्वचेतील जंतूंची प्रक्रिया होऊन तेल वाहून नेणाऱ्या नळ्या चोंदतात व तेल, पेशी अडवून पुटकुळ्या तयार होतात. त्यात तयार करणाऱ्या जंतूंची वाढ झाली तर पू तयार होतो.
वयात येताना किंवा वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर मुला-मुलींना त्याची लाज वाटते. किंबहुना त्यामुळे बरेचदा न्यूनगंड निर्माण होतो. मग हे मुरूम घालविण्याकरिता चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले जातात. अशा वेळेस कोणत्याही जाहिरातींना बळी न पडता फक्त वारंवार चेहरा स्वच्छ धुवावा. दिवसातून ३-४ वेळा कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालून चेहरा स्वच्छ धुणे, तसेच, चेहऱ्याला कडूनिंबाच्या पाल्याचा रस लावणे, केसात कोंडा होऊ न देणे (केसांना दही किंवा लिंबू लावून केस धुतल्याने कोंडा कमी होतो.) जमल्यास डाळीच्या पीठाने चेहरा धुणे इत्यादी घरगुती उपाय करावेत. तसेच बद्धकोष्टता होऊ नये म्हणून भरपूर पालेभाज्या, सालासकट फळे, कडधान्ये खावीत. रोज भरपूर व्यायाम करावा. हे सर्व केल्याने आपली त्वचा निरोगी व तेजस्वी होते. चेहऱ्यावरील मुरुमे फोडू नयेत, नाहीतर त्यात जंतूलागण होते. मुरुमे जास्त असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जाहिराती पाहून मलमे, साबण वापरू नये. त्याने अपाय होऊ शकतो.
स्त्रोत : वयात येताना (किशोरावस्था), माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/16/2020
किशोरवयीन मुला-मुलींनी वैयक्तीक स्वच्छता कशी ठेवाव...
या विभागात किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्व...
या विभागात किशोरवयीन मुलांमध्ये असणारे कुपोषण, रक...
मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास रक्तस...