किशोरवयीन मुला-मुलींकरिता वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व
किशोरवयीन मुला-मुलीनी वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी
मुलींसाठी जननेंद्रियाची स्वच्छता ठेवावी.
- घरातील बायकांनी एकमेकीचे पाळीचे कपडे न वापरणे .
- मासिक पाळीचे कपडे साबणाने स्वच्छ धुवून उन्हात वाळत टाकावेत.
- मासिक पाळीच्या वेळी रोज आंघोळ करावी.
- आन्घीलीच्या वेळी मायांग सुद्धा स्वच्छ धुवावे.
- मायांग स्वच्छ कपड्याने व्यवस्थित कोरडे करावे.
- पाळीचे घ्यायचे कपडे दिवसातून २-३ वेळा तरी बदलावेत.
- संडासला जाऊन आल्यानंतर जागा पुढून मागे धुवावी.
- मायांगाचा बाहेरील भाग स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
- शक्य असल्यास पाळी पूर्ण बंद झाल्यानंतर सर्व कपडे स्वच्छ धुवून डेटोलच्या पाण्यात भिजत ठेवून स्वच्छ कडक उन्हात वाळवून पुढच्या वेळी वापरण्याकरिता घडया करून ठेवाव्यात.
मुलांनी जनेन्द्रीयांची कशी घ्यावी?
- मुलांनी त्यांची जननेंद्रिये रोज स्वच्छ धुतली पाहिजेत. या शिश्न, संडासची जागा, जांघेवरचे केस इत्यादी साबणाने धुतले पाहिजे.
- लघवी नंतर शूचा शेवटचा थेंब सुद्धा पडू दयावा.
- संडासची जागा सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवावी.
- लघवी नंतर व संडासहून आल्यावर हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
- घट्ट असलेले आतले कपडे आणि प्यान्ट सुद्धा वापरू नये.
- जर कपडे ओले झाले असतील ते ते बदलावेत.
- एकमेकांचे टॉवेल/ अंगपुसणे सुद्धा वापरू नये.
- शिश्नाच्या टोकाची त्वचा व जवळपासचा भाग सुद्धा स्वच्छ पाण्याने रोज स्वच्छ धुवावा.
- स्वच्छ धुतलेले आतले कपडेच वापरावेत.
- आतले कपडे पण सैलसर असावेत.
स्त्रोत : वयात येताना (किशोरावस्था), माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/24/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.