स्त्रियांना व्यायामाची पुरुषांइतकीच गरज असते. मात्र प्रत्यक्षात त्यांना जास्त प्रमाणात काबाडकष्टच करावे लागतात. गरोदरपणात व बाळंतपणानंतर महिनाभर व्यायाम करणे अवघड असते. तरीही या काळात चालण्यासारखे सौम्य व्यायाम घ्यावेच. ओटीपोटाचे विशेष व्यायाम (पहा: स्त्री जननसंस्थेचे आजार) स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहेत. काबाडकष्ट (उदा. मैल मैल पाणी आणणे) हा सातत्याचाच एक प्रकार आहे. मात्र यात व्यायामाचे सर्वांगीण फायदे नसतात. म्हणून स्त्रियांनी काही वेगळया प्रकारचे व्यायाम- (उदा.फुगडया) करावेत. स्त्रियांना सर्व खेळांची क्षेत्रे मोकळी असली तरी पुरुष समाजव्यवस्था यावर बंधने आणण्याचा प्रयत्न करते. लवकर होणा-या लग्नांनी या बंधनात भरच पडते. स्त्री आणि पुरुषांच्या शरीराच्या ठेवणीत काही फरक असल्यामुळे काही व्यायामप्रकार (उदा. कुस्ती) पुरुषांना तर काही स्त्रियांना बरे पडतात. काही व्यायाम प्रकारात स्त्रियांची बरोबरी पुरुषांना अशक्य असते. (उदा. जिम्नॅस्टिक्स).
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आकाशवाणीवर द...
योगासनांची इतर खेळ, मजुरीची कामे, व्यायाम यांच्याश...
व्यायामातून बरीच उष्णता निर्माण होते.