माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आकाशवाणीवर दिलखुलास हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारीत करण्यात येतो. या कार्यक्रमात ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ.संगीता पत्की यांच्या शनिवार दिनांक १३ स्पटेंबर 2014 रोजी योगेश कोलते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा सारांश..... (भाग-२)
मानवी जीवनात कॅन्सर, हृदयरोग आणि किडनी संबंधीचे आजार हे जीवन शैलीशी निगडीत आहेत. ह्या आजारांमुळे व्यक्तीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात येते. म्हणून या आजारांविषयी योग्य ती जाणिव जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारात काय खावे व काय खावू नये जेणेकरुन हे आजार टाळता येतील. लठ्ठपणामुळे हृदयरोग व मधुमेह हे आजार होतांना दिसून येतात. मधुमेह हा आजार आता अनुवांशिक राहिलेला नसून तो आता पांढरा डायबेटिज म्हणून ओळखला जातो. हा मधुमेह कधीही बरा होत नाही. त्यासाठी योग्य आहार व योग्य व्यायाम ह्या दोघांच्या माध्यमातून त्याचे समतोल राखता येते. भारतीय जीवन शैलीमध्ये जो आहार घेतला जातो त्या आहारात प्रामुख्याने ६०% साखर रोज खाल्ली जाते. म्हणून यासाठी योग्य तो व्यायाम करुन आहाराचा समतोल राखून आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
मधुमेह झाल्यावर वजन वाढू लागते त्यानंतर आळस येतो, काम करायला उत्साह येत नाही, अनावर झोप येणे, मानेवर काळी रेघ येणे त्यासाठी कितीही उपाय केले तरी ती न जाणं/ चेहरा काळा पडणे, तसेच चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे ही या आजाराची प्री-डायबेटिक लक्षणे आहेत. या लक्षणांवर जर वेळीच योग्य उपाय केला तर मधुमेह या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो.
ह्या आजारात आपल्याला जीवन शैलीत पुर्णपणे बदल घडून आणावा लागतो. तो ठराविक काळापुरता न राहता कायम स्वरुपी असावा. तसेच रोज योग्य प्रमाणात व्यायाम करावा, पायी चालावे. जेवण करतांना तीन वेळेत विभागून ते खावे. उदा. सकाळ, दुपार, संध्याकाळ असावे. जेणेकरुन या आजाराचा समतोल राखता येतो.
वाढत्या वयानुसार आपला आहार वाढत जातो. पण जस जसे वय वाढत जाईल तस तसे त्याचे प्रमाण हे हळू-हळू कमी करत जावे. तरुण वयात वाढता आहार ही बौद्धिक आणि शारिरीक विकास वाढीची गरज आहे. पण तोच आहार प्रौढ वयात घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. म्हणून लहानपणापासूनंच जर व्यायामाची सवय लावली तर आपले ५०% आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते व मधुमेह सारख्या आजारात समतोल राखता येतो.
-जयश्री कोल्हे
प्रतिवेदक
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...