आयुर्वेद ही भारतीय प्रांतातील प्राचीन औषधी संस्था आहे. आयुर्वेदाची ऊत्पत्ती भारतात 5000 वर्षांपूर्वी झाल्याचे म्हटले जाते. आयुर्वेद हा शब्द संस्कृतच्या “आयुस” म्हणजे जीवन आणि “वेद” म्हणजे विज्ञान या दोन शब्दांचे संयोजन आहे, म्हणूनच आयुर्वेद म्हणजे “जीवनाचे विज्ञान”. इतर वैद्यकिय शास्त्रांपेक्षा जास्त, आयुर्वेदाचा जोर रोगांवर उपचारांपेक्षा निरोगी जीवनावर जास्त आहे. आयुर्वेदाचा मूळ उद्देश उपचार प्रक्रियेला वैयक्तिक करणे असा आहे.
आयुर्वेदा प्रमाणे, मनुष्याचे शरीर हे चार मूळ तत्वांवर आधारित असते – दोष, धातू, मल आणि अग्नी. आयुर्वेदामध्ये शरीराच्या या चार मूल तत्वांचे फार महत्व आहे. ह्यांना “मूळ सिध्दांत” किंवा “आयुर्वेद उपचारांचे मूल आधार“ देखील म्हटले जाते.
दोष
वात, पित्त आणि कफ हे दोषांचे तीन महत्वपूर्ण सिध्दांत आहेत जे एकत्रितपणे अपचयी आणि उपचयी चयापचय नियंत्रित करतात. या तीन दोषांचे मुख्य कार्य पचन झालेल्या पदार्थांचे प्रतिफल शरीरात सर्वत्र पोहोचविणे असे आहे, ज्यामुळे शरीरात मांसपेशांच्या निर्माण कार्यास मदत होते. दोषांच्या कोणत्याही बिघाडामुळे शरीरात रोग निर्माण होतो.
धातू
शरीराला आधार देणारे घटक म्हणजे धातू अशी धातूची व्याख्या करता येते. शरीरात सात प्रकारच्या मासंपेशी यंत्रणा कार्यरत असतात - रस,रक्त,मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र जे शरीरात रक्तरस, रक्त, मांसपेशी, चरबी, अस्थी, अस्थी मज्जा आणि वीर्य ह्याचे दर्शक आहेत. धातू शरीराला फक्त मूलभुत पोषण देतात आणि ते मनाची वाढ आणि संरचना यासाठी महत्त्वाचे आहेत.
मल
मल म्हणजे कचरा किंवा घाण. शरीराच्या त्रिनेत्र म्हणजे दोष आणि धातू मध्ये हे तिसरे नेत्र होय. मलाचे तीन प्रकार असतात जसे विष्ठा, मूत्र आणि घाम. मल हे मुख्यतः शरीरातील निरर्थक ऊत्पाद आहे, मल विसर्जन हे प्रत्येकाच्या शरीराच्या नियमित कार्यासाठी महत्वाचे आहे. मलाचे दोन मुख्य स्वरुप आहेत मल आणि किट. मल म्हणजे निरर्थक ऊत्पाद आणि किट म्हणजे धातूंचे निरर्थक ऊत्पाद.
अग्नी
शरीरातील सर्व चयापचयी क्रिया आणि पाचनिय गतिविधी शरीरात शरीराच्या जैविक आगीमुळे, अग्नी मुळे घडत असतात. अग्नी म्हणजे शरीरातील एंझाईमस् म्हणू शकतो जे शरीरात जठर, एलिमेंटरी कॅनाल, यकृत आणि ऊतक कोशीकेत असतात.
आयुर्वेदात जीवन म्हणजे शरीर, ज्ञान, मन आणि आत्मा यांचे संयुजन होय. जिवंत मनुष्य तीन मनोवृत्तीं (वात,पित्त आणि कफ), सात मूलपेशी (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र) आणि शरीराच्या निरर्थक ऊत्पाद जसे विष्ठा, मूत्र आणि घाम यांचा समूह आहे. म्हणून संपूर्ण शरीर आधार म्हणजे मनोवृत्तीं, सात मूलपेशी आणि शरीरातील निरर्थक ऊत्पाद यांचे एकत्रीकरण आहे. शरीराची वाढ आणि झीज आणि याचे घटक हे त्या अन्नावर अवलंबून असते जे ते शरीर खाते आणि त्याचे रुपांतर मनोवृत्तीं, सात मूळपेशी आणि शरीरातील निरर्थक ऊत्पाद यांत होते. अन्न खाणे, पचणे, शोषण, आत्मसात आणि चयापचय ह्यावरुन शरीराचे आरोग्य आणि रोग अवलंबून असतात जे मानसिक तंत्रांवर आणि अग्नी (जैवीक आग) यांवर देखील अवलंबून असतात.
आयुर्वेदा प्रमाणे सूर्यमंडलातील कोणतीही वस्तू आणि मानवीय शरीर हे पांच मूल तत्वांचे बनलेले आहे (पंचमहाभूत) जसे पृथ्वी, पाणी, आग, हवा आणि पोकळी (व्योम). या सर्व तत्वांचे शरीराच्या मुख्य ढाचा आणि त्याच्या अवयवांप्रमाणे वेगवेगळ्या कार्यांत आणि त्याच्या गरज आणि आवश्यकते नुसार संतुलित संक्षेपण असते. शरीराच्या ढाच्याची वाढ आणि विकास पोषणावर अवलंबून असतो, म्हणजे अन्न. अन्न, देखील पाच तत्वांचे बनलेले असते, जे बायो-फायर (अग्नी) च्या कार्या नंतर शरीराच्या सम तत्वांचे भरण आणि पोषण करते. शरीराची ऊतके संरचनात्मक आहेत आणि भावना ह्या मानसिक संस्था, ज्या वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या क्रमपरिवर्तनाने किंवा संयोजनाने ऊत्पन्न होत असतात.
संपूर्ण शरीराच्या संतुलित अवस्थेच्या उपस्थिति किंवा अनुपस्थितिवर आरोग्य किंवा आजार अबलंबून असतात. दोन्ही अंतरिक किंवा बाह्य कारक नैसर्गिक संतुलनात अशांतता निर्माण झाल्याने रोग ऊत्पन्न करतात. ह्या नैसर्गिक संतुलनात अशांतता ही आहार अविवेक, अवांछनीय सवयी आणि आरोग्यवर्धक नियम न पाळण्यामुळे येऊ शकते. मोसमी असामान्यता, अनुचित शारिरीक व्यायाम किंवा इंद्रियांचा आणि मनाचा अनियमित वापर यांमुळे देखील नैसर्गिक संतुलनात अशांतता निर्माण होऊ शकते. नैसर्गिक संतुलनात अशांतता निर्माण झालेल्या शरीरात शांतता आणण्यासाठी, आहारावर नियंत्रण ठेवून, सवयी आणि जगण्याच्या पद्धतीत बदल करुन, औषधोपचारांनी आणि रसायन आणि पंचकर्म चिकित्सेने उपचार केले जातात.
आयुर्वेदात रुग्णाचे नेहमी संपूर्ण निदान केले जाते. चिकित्सक रुग्णाच्या शारीरिक विशेषता आणि मानसिक स्वभावाचे व्यवस्थित टिपण घेतो. तो इतर घटकांचा देखील अभ्यास करतो जसे शारीरिक मांस, मनोवृत्ती, रोग ज्या जागेवर झाला आहे ती जागा, रुग्णाची प्रतिकारशक्ति आणि जीवनबल, त्याची दिनचर्या, आहाराच्या सवयी, चिकित्सीय अवस्थांची घनता, पचनशक्ति आणि रुग्णाच्या व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय जीवनाची सखोल माहिती. खालील पैकी मुद्दयांचा देखील निदानात समावेश केला जातो :
साधारण चिकित्सात्मक दृष्टिकोण असा आहे की, उपचार जो आरोग्य देतो तो अचुक असतो आणि खरा वैद्य तो जो रुग्णाला रोगपासून मुक्ती देतो. आरोग्यता आणि आरोग्यतेत वाढ, रोगापासून बचाव आणि आजारावर उपचार हा एकूण आयुर्वेदाचा मुख्य उद्देश आहे.
रोगाच्या उपचारांमध्ये पंचकर्म प्रक्रिया, औषधे, उपयुक्त आहार, गतिविधी आणि आहारात संतुलन आणि शारिरीक क्षमतेस मजबूत करणे या सारख्या उपायांद्वारे पुढील काळात रोग होणार नाही किंवा तो होण्याची शक्यता कमी होऊन त्यापासून बचाव होऊन शरीराच्या ढाच्यात किंवा शरीरातील कोणत्याही भागात असंतुलन निर्माण करणा-या कारकांपासून बचाव केला जातो.
साधारण कोणत्याही उपचार पद्धतीत औषधे, विशेष आहार आणि ठराविक दिनचर्या गतिविधींचा समावेश असतो. या तीन उपायांचा प्रयोग दोन प्रकारे केला जातो. उपचाराच्या एका दृष्टिकोणात हे तीन उपाय प्रमाणशीरपणे कारकांचा आणि रोगाच्या विभिन्न लक्षणांचा प्रतिकार करतात व रोगाची तीव्रता कमी करतात. दुस-या दृष्टीकोणात औषधे, विशेष आहार आणि ठराविक दिनचर्या या तीन उपचार पद्धतींनी प्रमाणशीरपणे कारकांचा आणि रोगाच्या विभिन्न लक्षणांचा प्रतिकार करणा-या व रोगाची तीव्रता कमी करणा-या कारकांवर भर दिला जातो. ह्या दोन चिकित्सकीय दृष्टिकोणांना विप्रीता आणि विप्रीतार्थकारी चिकित्सा असे म्हटले जाते.
उपचाराच्या सफल प्रशासनासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. त्या म्हणजे:
सर्वात महत्वाचा म्हणजे चिकित्सक. तो पवित्र आणि मानवी समज असलेला व तांत्रिकरित्या, शास्त्रोक्त ज्ञानी आणि कुशल असला पहिजे. चिकित्सकाने त्याच्या ज्ञानाचा वापर विनम्रतेने आणि बुद्धीने व मानवीयतेने केला पाहिजे. त्यानंतर महत्वाचे अन्न आणि औषधे. हे चांगल्या प्रतीचे, बहुपयोगी, वाढीव आणि अनुमोदित प्रक्रियांपासून तयार केलेले आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावे. प्रत्येक सफल उपचाराचे तिसरे घटक म्हणजे उपचारकाची भूमिका आहे ज्याला उपचर्येचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे, त्याच्या विषयात पारंगत असावा व स्नेहपूर्ण, सहानुभूतिपूर्ण, बुद्धिमान, स्वच्छ व नेटनेटका आणि दिलासा देणारा असावा. चौथे घटक म्हणजे रुग्ण स्वतः जो चिकित्सकाच्या निर्देशांचे पालन करणारा अज्ञाकारी आणि सहकार्य देणारा, त्याला होणारा त्रास नमूद करण्यास सक्षम आणि उपचारांसाठी लागणारे सर्व सहकार्य देणारा असावा.
आयुर्वेदाने रोगाचे चरण आणि घटनां पासून तर रोगाच्या अंतिम टप्प्यापर्यंतचे एक उज्ज्वल विश्लेषणात्मक विवरण विकसित केले आहे. यांमुळे अव्यक्त लक्षणे स्पष्ट होण्या आधीच रोगाची संभाव्य सुरुवात लक्षात येऊ शकते व या प्रणालीस एक अतिरिक्त लाभ प्राप्त होतो. यामुळे वेळे आधीच उचित आणि प्रभावी पाऊल ऊचलण्यास मदत होते आणि या चिकित्सापद्धतीची निवारक भूमिका फार वाढते, रोगजननाची भविष्यातील शक्यता थांबते किंवा रोगाच्या प्रारंभिक स्थितीतच त्यावर उपयुक्त उपचारात्मक उपाय करण्यास मदत होते.
रोगाची चिकित्सा पद्धती ही मुख्यतः खालील प्रमाणे वर्गीकृत करता येते
शोधन चिकित्सा (शोधन उपचार)
शोधन चिकित्सा ही दैहिक आणि मानसिक रोगांची प्रेरणा कारके नष्ट करण्याची उपचार पद्धती आहे. ह्या पद्धतीत अंतरिक आणि बाह्य शुद्धीकरण सामील आहे. नेहमीच्या सामील प्रथांमध्ये पंचकर्म (चिकित्सकीय प्रेरित वमन, विरेचन, तेल एनीमा, काढ़ा एनीमा आणि नाकातून औषधे देणे), आणि पंचकर्म पूर्व प्रक्रिया (बाह्य आणि आंतरिक स्निग्धता आणि मुद्दाम घाम आणणे) यांचा समावेश होतो. पंचकर्म उपचार चयपचय प्रबंधनावर केंद्रित आहे. चिकित्सीय लाभ करण्या व्यतिरिक्त ते परिशोधक प्रभाव प्रदान करतात. ही चिकित्सा खासकरुन स्नायविक विकारांवर, अस्थिरोगांवर, नाडीचे रोग किंवा स्नायविक नाडीचे रोग, श्वसन रोग, चयापचय आणि अपक्षयी विकारांवर उपयोगी ठरते. शमन चिकित्सा (उपशामक उपचार)शमन चिकित्सेत बिघडलेल्या देहद्रवांचे दमन केले जाते (दोष). बिघडलेल्या देहद्रवांचे दमन होऊन इतर देहद्रवांमध्ये बिघाड न होऊ देता त्यास संथता आणण्याच्या ह्या पद्धतीस शमन असे म्हणतात. ह्या चिकित्सेत क्षुधावर्धके, पाचके, व्यायाम आणि सूर्यप्रकाश, स्वच्छ मोकळी हवा यांचा इ. चा उपयोग करुन रोगमुक्ती प्राप्त केली जाते. या चिकित्सा पद्धतीत उपशामके व शामके याचा उपयोग केला जातो. पथ्य व्यवस्था (आहार आणि गतिविधिंचे निर्धारण)पथ्य व्यवस्थेत आहाराबद्दल सहमती आणि मतभेद, गतिविधी, सवयी आणि मानसिक अवस्था हे सर्व सामील असते. उपचारात्मक उपायांचा परिणाम वाढविणे आणि रोगजनक प्रक्रियेत बाधा आणण्याचा या चिकित्सेचा दृष्टिकोण असतो. आहारात काय खावे आणि काय खाऊ नये इ. वर भर देऊन अग्नी शमन होणे आणि पचन अनुकूल होणे आणि आत्मसात केलेल्या भोजनातील ऊतकांना शक्ति प्राप्त होते आहे हे निश्चित करण्याचा हेतू ठेवून यावर भर दिला जातो. निदान परिवर्जन (रोग होणे टाळणे आणि ऊत्तेजक कारक)निदान परिवर्जनात रुग्णाच्या आहारातील आणि राहणीमानातील रोग कारकांची कारणे टाळण्यास प्रवृत्त केले जाते. रोग उत्तेजक कारकांत भाग घेणे टाळणे किंवा स्वतःला त्यापासून वाचविणे हे देखील विचार यात सामील केले आहेत. सत्ववजय (मनश्चिकित्सा)सत्ववजय म्हणजे मुख्यतः मानसिक अशांतता आणि चिंता यावर काम करणे. यात अनारोग्यकर वस्तूंसाठी मनात रोधक इच्छा निर्माण करुन साहस, समृती आणि एकाग्रता जोपासना केली जाते. मनोविज्ञान आणि मनोरोग विज्ञानाचा अभ्यास आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर विकसित केला गेला आहे आणि मानसिक विकारांवरील उपचारामध्ये एक विस्तृत दृष्टिकोण ठेवला गेला आहे. रसायन चिकित्सा (प्रतिरोधक अधिमिश्रकांचा आणि कायाकल्प औषधांचा उपयोग)रसायन चिकित्सेत शक्ति आणि जीवन शक्ति वाढविली जाते. शरीराच्या ढाच्याची अखंडता, स्मृतीत वाढ, बुद्धीत वाढ, रोग प्रतिकार शक्तीत वाढ, यौवन, चमक आणि चेतना टिकविणे आणि शरीरातील इष्टतम शक्ति आणि बोध टिकविणे हे या चिकित्सेतील काही सकारात्मक लाभ आहेत. शरीरातील ऊतकांची अकाली झीज आणि तूट वाचविणे आणि व्यक्तिच्या संपूर्ण आरोग्यात वृद्धी ह्या रसायन चिकित्सेच्या दोन मुख्य भूमिका आहेत. आहार आणि आयुर्वेदीक चिकित्साआयुर्वेद स्नातकोत्तर अध्यापन आणि संशोधन संस्था, जामनगर (गुजरात)
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था
|
अंतिम सुधारित : 9/14/2019
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...