या वेबपोर्टलचा आयटी साक्षरता विभाग खालील बाबींविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी व संगणक, हार्डवेअरविषयी मूलभूत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याशिवाय यासंबंधी अनेकदा विचारल्या जाणा-या प्रश्नांची उत्तरेही येथे निवडक प्रादेशिक भाषांत दिलेली आहेत.
संगणकावर प्रादेशिक भाषा टाईप करणे ही सामान्य माणसासाठी फारच आकर्षणाची गोष्ट आहे. क्विलपॅड (Quillpad) व लिपिकार (lipikaar) ही मोफत उपलब्ध असणारी ऑनलाईन टाईपिंग टूल्स (साधने) वापरून भारतीय भाषांमध्ये टाईप करता येतात. ही साधने ट्रान्सलिटरेशन टेक्नॉलॉजी वापरतात त्यामुळे आपण एखादा शब्द जसाच्या तसा इंग्लिशमध्ये टाईप करू शकतो. उदा. राष्ट्रभाषा हा शब्द टाईप करण्यासाठी 'rAShTrbhAShA असे न लिहिता 'rashtrbhasha' असे लिहिले तरी चालू शकते. टाईप करण्यासाठी पान उघडल्यावर आपल्याला हवी ती भाषा निवडून आपण टाईप करू शकतो. ही साधने खालील ठिकाणी उपलब्ध आहेत
http://quillpad.com/
http://www.lipikaar.com/
भारत सरकारच्या माहितीतंत्रज्ञान खात्याच्या भारतीय भाषांसाठी तंत्रविकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे विविध भाषांमध्ये संगणकाशी संवाद साधण्यासाठी व त्यातील ज्ञान विविध भाषांमधून उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञान व साधने विकसित करणे. त्यामुळेच हे फॉन्टस् सीडी व वेब डाऊनलोडिंगच्या स्वरूपात सर्वांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फॉन्टस् डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
uni.medhas.org
खालील लिंक वापरून ट्रु टाईप फॉन्टमधील मजकूर ओपन टाईप फॉन्टमध्ये (युनिकोडमध्ये) रुपांतरित करता येतो. यासाठी ट्रु टाईप फॉन्टमधील मजकुराची फाईल .txt स्वरुपात अपलोड करा, तुम्ही त्यात कोणता फॉन्ट वापरला ते निवडा व तो मजकूर कोणत्या स्वरुपात हवा ते निवडा. तो मजकूर आपोआप रुपांतरित होतो व अंतिम फाईल ओपन टाईप फॉन्टमध्ये (युनिकोडमध्ये) रुपांतरित होते.
http://uni.medhas.org/fileconverterindex.php5
पद्म तंत्रज्ञान वेदिक (इंडिक) मजकूर सार्वजनिक व खासगी स्वरुपात रुपांतरित करण्यासाठी वापरले जाते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सध्या तेलगु, मल्याळम, तामिळ, देवनागरी (मराठीसह), गुजराती, बंगाली, गुरुमुखी या भाषा वापरता येतात.
युनिकोडचा व्यवस्थित प्रसार होईपर्यंत क्लोज्ड व ओपन दोन्ही स्वरुपामधील दरी भरुन काढण्यासाठी पद्म काम करते. पद्म डायनामिक फॉन्टमधील वेदिक मजकूर आपोआप युनिकोडमध्ये रुपांतरित करते. पद्म ISCII व ITRANS, RTS (फक्त तेलगु) सारख्या ट्रान्सलिटरेशन प्रणालीदेखील युनिकोडमध्ये रुपांतरित करू शकते. पद्म प्लगईन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अंतिम सुधारित : 7/1/2020
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...