2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील घोषणेनुसार नोव्हेंबर 2008 मध्ये आदर्श शाळा योजना अंमलात आली. प्रती गट - एक शाळा या प्रमाणात बुद्धीमान ग्रामीण बालकांना दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी उत्कृष्टतेचा मापदंड असणा-या आदर्श शाळा उभारणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
योजनेचे उद्देश पुढीलप्रमाणे:-
- प्रत्येक गटामध्ये दर्जेदार उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध करणे (किमान एक)
- साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणे.
- नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षणक्रमाचा वापर करणे.
- पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि शालेय प्रशासनासंदर्भात आदर्श भूमिका
योजनेची अंमलबजावणी दोन प्रकारे होते.
- शैक्षणिकदृष्ट्या मागास भागांमध्ये राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांमार्फत
- शैक्षणिकदृष्ट्या मागास नसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक - खाजगी भागीदारीमार्फत
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : http://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Information/FrmModelSchool.aspx?ID=11
अंतिम सुधारित : 6/22/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.