मध्य अमेरिकेतील एक निसर्गरम्य सरोवर. एल् साल्वादोर आणि ग्वातेमाला या दोन देशांच्या सरहद्दीवर हे असून सरोवराचा ८० टक्के भाग एल् साल्वादोरच्या सरहद्दीत मोडतो.
३२ किमी. लांब , १० किमी. रुंद व ४६ मी. खोल असलेले हे सरोवर समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून सरोवराच्या परिसरात प्रवाशांसाठी अनेक सुखसोयी आहेत.
लेंपा नदी गीहा सरोवरातून आरपार जाते. सरोवरातील छोट्या बेटांवर जुने अवशेष आढळतात.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/10/2020
मध्य यूरोपातील सर्वांत मोठे सरोवर. हे आग्नेय स्वि...
अॅल्बर्ट सरोवर : मध्य आफ्रिकेतील सरोवर. याला ‘अॅ...
निकाराग्वा सरोवर : (स्पॅनिश-लॅगो दे निकाराग्वा). म...
कोको नदी : मध्य अमेरिकेतील व निकाराग्वा देशातील सर...