मध्य आफ्रिकेतील सरोवर. याला अॅल्बर्टन्यांझा असेही म्हणतात. मध्य आफ्रिकेतील सरोवरांच्या रांगेतील हे सर्वांत उत्तरेकडील सरोवर असून युगांडा व झाईरे यांच्या सीमारेषेवर आहे.
सरोवराची लांबी सु. १६१ किमी., रुंदी ३२ किमी., क्षेत्रफळ ५,३४६ चौ.किमी. व कमाल खोली ५१ मी. असून समुद्र- सपाटपासून हे ६२० मी. उंचीवर आहे. सरोवराला नैर्ऋत्येकडून सेमलिकी व ईशान्येकडून व्हिक्टोरिया नाईल या नद्या मिळतात.
या सरोवराच्या उत्तरेकडून शुभ्र नाईल नदीला पाणीपुरवठा होतो. याच्या किनाऱ्यावर सरासरी २५० से. तपमान असते व ७५ सेंमी. पाऊस पडतो. पाण्याचे बाष्पीभवन फार होते, त्यामुळे पाणी खारे आहे. सरोवराच्या पूर्व व पश्चिम बाजूंस उंच उंच डोंगर आहेत. या भागात गवत व झाडे असून हत्ती, रेडे, काळवीट इ. प्राणी आहेत.
सरोवरामध्ये हिप्पोपोटॅमस, सुसरी व मासे विपुल आहेत. १८६४ मध्ये सॅम्युएल बेकर याने या सरोवराचा शोध लावला. या सरोवरावर झाईरेतील कासेन्यी व माहागी पोर्ट आणि युगांडातील बुटियाबा ही बंदरे आहेत.
लिमये, दि. ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/15/2020
मध्य यूरोपातील सर्वांत मोठे सरोवर. हे आग्नेय स्वि...
जिनीव्हा सरोवरातून ऱ्होन नदी जेथे निघते, तेथे हे श...
सरोवर : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खोलगट भागातील जमि...
टॉनले सॅप : ख्मेर प्रजासत्ताकाच्या मैदानी प्रदेशात...