उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ. सर सय्यद अहमद खान यांनी अलीगढ येथे १८७५ मध्ये ‘मॉहमेडन अँग्लोओरिएंटल’ महाविद्यालय स्थापन केले. त्याचेच पुढे निवासी विद्यापीठात रूपांतर करण्यात आले. विद्यापीठीय मशिदीच्या भोवतालचा सु. २५ किमी. त्रिज्येचा परिसर हे याचे क्षेत्र असून त्यात वसतिगृहे व महाविद्यालये आहेत. मानव्यविद्या, विज्ञान, अभियांत्रिकी इ. विद्याशाखांच्या अध्यापनाची सोय विद्यापीठात आहे. युनानी वैद्यक; उर्दू, अरबी, फार्सी भाषा; शिया व सुन्नी पंथांचे धर्मशास्त्र, इस्लाम धर्म आणि तत्संबंधित विषयांचा अभ्यास हे येथील विशेष होत. युनानी वैद्यक विषयातील पदवी-परीक्षांचे माध्यम उर्दू आहे; मानव्य व वाणिज्य विषयांतील पदवी-परीक्षांचे माध्यम उर्दू, हिंदी व इंग्रजी आहे, तथापि इतर विषयांतील पदवी व सर्व पदव्युत्तर परीक्षांचे माध्यम इंग्रजीच आहे. विद्यार्थ्यांची संख्या नऊ हजारांवर आहे. (१९७२).
लेखक: रा. म. मराठे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
आंध्र प्रदेश राज्यातील वॉल्टेअर येथे १९२६ मध्ये स्...