मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ. रेवा या ठिकाणी १९६८ मध्ये स्थापन झाले विद्यापीठचे स्वरूप अध्यापनात्मक, निवासी व संलग्नक असे आहे. विद्यापीठाच्या कक्षेत रेवा, सिधी, सटना, शहडोल, पन्ना, छत्तरपूर व टीकमगढ हे प्रमुख महसूल जिल्हे समाविष्ट झालेले आहेत. विद्यापीठाची ११ घटक-महाविद्यालये असून २९ महाविद्यालये त्यास संलग्न केलेली आहेत. ह्याशिवाय विद्यापीठात सात भिन्न विषयांच्या विद्याशाखा आहेत. विद्यापीठीय शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व हिंदी असून १९७१-७२ साली १९,१६१ विद्यार्थी शिकत होते.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/15/2019
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
आंध्र प्रदेश राज्यातील वॉल्टेअर येथे १९२६ मध्ये स्...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...