उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे १९२७ साली स्थापन झालेले विद्यापीठ. आग्रा, इटा, मणिपूर, बरेली, मुरादाबाद , बिजनोर, अलमोडा, मथुरा, नैनिताल, पिठोरागढ, चामोली, गढवाल, वाराणसी, रामपूर वगैरे जिल्ह्यातील महाविद्यालये ह्यांच्या कक्षेत येतात. ह्या विद्यापीठास १९७२ अखेर सु. ७४ महाविद्यालये संलग्न असून तीन घटक संस्थांनाही विद्यापीठाने मान्यता दिली होती. अलीकडेच विद्यापीठाने पदव्युतर परीक्षांचे अध्यापन व संशोधन यासाठी तीन स्वतंत्र संस्था, हिंदी व भाषाशास्त्र यांच्या अभ्यासासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र संस्था (१९५६) व गृहजीवनशास्त्र यासाठी एक संस्था (१९६८) अशा सुरू केल्या आहेत. संलग्न महाविद्यालयमधून मानवविद्या, शास्त्रे, कृषिविज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक इ. विषयांच्या शाखोपशाखा आहेत. सर्व पदवी व पदव्युतर परीक्षांचे माध्यम इंग्रजी किंवा हिंदी असून तांत्रिक शिक्षण व वैद्यक ह्या विषयांचे माध्यम इंग्रजी आहे. सर्व संलग्न महाविद्यालयांतून १९७१–७२ साली सु. ८८,९१० विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठाचा वार्षिक अर्थसंकल्प १९७१–७२ मध्ये रु. ४६,५७,३७७ (खर्च) व रु. ४२,९८,६१८ (उत्पन्न) एवढा होता.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/12/2020
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.