ज्ञानगंगा घरोघरी हे बोधवाक्य घेऊन नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीतील एक मैलाचा दगड ठरणारी घटना घडली. निरंतर शिक्षणाच्या संधी या विद्यापीठामुळे सर्वासाठी खुल्या झाल्या. पारंपारिक शिक्षणाच्या बंधनातून शिक्षण मुक्त होणे हे राज्याच्या क्रांतीकारी परंपरेला पुढे नेणारे आहे. आर्थिक सामाजिक कौटुंबिक ह्या कारणांनी ज्यांची शिक्षणाची गाडी हुकली त्यांच्या जीवनात एक नवा आशेचा किरण घेऊन हे विद्यापीठ आले. काम करता करता शिक्षण, व्यवसाय, प्रपंच, नोकरी सांभाळून आवडीचे निवडीचे आणि सवडीनुसार शिक्षण घेण्याची नवी व्यवस्था ह्या विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. आज विद्यापीठाने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ कायदा क्रमांक 20/1989 अन्वये ह्या विद्यापीठाची स्थापना 1 जुलै, 1989 ला केली. विद्यापीठाची 1 जुलै, 1989 ला स्थापना होताच, 3 शिक्षणक्रम, 15 अभ्यासक्रम आणि 1500 विद्यार्थी नोंदवून सुरूवात झाली होती. विद्यापीठाने आज 211 शिक्षणक्रम तयार केले आहेत. 5,82,660 विद्यार्थी 4,000 पेक्षा जास्त अभ्यासकेंद्र / कार्यकेंद्रावर शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
आज विद्यापीठाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात जी भर घातली आहे ती थक्क करणारी आहे. आजपर्यत विद्यापीठातून विविध शिक्षणक्रमांच्या पदव्या घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची 2,78,345 आहे. तर पदविका 1,34,177 आणि पदव्युत्तर पदवी 22,046 इतकी आहे. गेल्या 25 वर्षात इतके विद्यार्थी प्रत्यक्ष पदव्या घेऊन बाहेर पडले. त्यातील हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोकरीतील पदोन्नती, नविन नोकरी, स्वतंत्र व्यवसाय मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यात विद्यापीठाच्या पदवीधर लोकसेवा आयोगांची (IAS) परीक्षा उत्तीर्ण झालेले रमेश घोलप आणि कोस्तुभ दिवेगावकर आहेत. तसेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांत ईश्वर कातकाडे, कुमारी अर्चना पाटील श्री. हंसराज पाटील सारखे अनेक विद्यार्थी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, पोलिस निरिक्षक, उप पोलिस अधिक्षक या पदांवर कार्यरत आहेत. जीवनाचे सर्व दरवाजे आपल्यसाठी बंद झाले असे वाटणारा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी हितेश शहा जो आज मुंबई हाय कोर्टात उत्तम वकिल आहे. खेडेगावांत शिलाई मशीन चालवून प्रपंच चालवणारे मालेगांवचे गणपत विठ्ठल बागुल आज एक प्रतिथयश वकिल आहेत. अशा हजारोंच्या संख्येने यशोगाथा ह्या विद्यापीठाने घडविल्या आहेत.
विद्यापीठाच्या ह्या कार्यपद्धतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. व 2002 साली कॉमलवेल्थ ऑफ लर्निंग (COL) ह्या जागतीक संस्थेने सर्वौत्कृष्ठतेचा Excellence Award पुरस्कार देऊन मेगा युनिव्हर्सिटी म्हणून सन्मानित केले आहे. वर्ष 2011-12 मध्ये भारतातील आऊटलुक ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलने केलेल्या शैक्षणिक सर्वेत मुक्त विद्यापीठ हे देशातील सर्व विद्यापीठात दुसऱ्या क्रमाकांचे विद्यापीठ तर देशातील 13 मुक्त विद्यापीठांत प्रथम क्रमाकाचे जाहिर केले आहे.
भारतातील पहिला रेडिओ यशवाणी इंटरनेटद्वारे वेबरेडिओ म्हणजे जेथे इंटरनेट कनेक्शन आहे असा जगातील कोणताही विद्यार्थी ह्या माध्यमाचा उपयोग करून विद्यार्थी http://ycmou.digitaluniversity.ac ह्याद्वारे मार्गदर्शकाशी थेट संवाद साधु शकतो.
विद्यापीठाचा परिसर कोणत्याही परदेशी विद्यापीठापेक्षा कमी नाही. विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ग्रंथालयाची वास्तू आणि यश इंटरनॅशनल हे गेस्ट हाऊस याची प्रचिती देणारे आहे. गेल्या वर्षभरात विद्यापीठाच्या नाविण्यपूर्ण शिक्षणक्रमासह विद्यार्थी संख्येत दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. बी.ए. / बी. कॉम या मूलभूत पदव पदवीप्रमाणेच व्यावसायिक, तांत्रिक आणि पदव्युत्तर, पदवी, पदवीका प्रमाणपत्र शिक्षणक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.विद्यापीठाच्या 8 विद्या शाखा, 1 विभाग, 1 केंद्राच्या मार्फत हे सारे काम चालते.
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
पूर्वतयारी प्रमाणपत्र शिक्षणक्रम
सहा महिन्यांचा पूर्वतयारी शिक्षणक्रम किमान पूर्व शिक्षणाची अट नसलेला मात्र मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणक्रम मराठी, हिंदी, उर्दू हया माध्यमातून आहे. हा शिक्षणक्रम म्हणजे विद्यापीठाचे एक अत्यंत लोकप्रिय वैशिष्ट म्हणावे लागेल. पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेवून लाखो विद्यार्थी पदवीधर झाले आहेत.
डिप्लोमा इन व्हॅल्यूज ॲण्ड स्पिरिच्युअल एज्युकेशन
पदवी शिक्षणक्रम :
बी. ए. पदवी शिक्षणक्रम, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदवी आणि पदविका, ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी ( बी.लिब.)
पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम
ग्रंथालय व माहितीशास्त्र निष्णात (एम.लिब.)
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
पूर्वतयारी (इंग्रजी माध्यम)
प्रवेश पात्रता : किमान पूर्वशिक्षणाची अट नाही. मात्र मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
सर्टिफिकेट इन फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनिअरींग मॅनेजमेंट
प्रवेश पात्रता : 10 वी पास किंवा समकक्ष आणि माहितीपुस्तिकेतील दिलेली शारिरिक पात्रता.
पदविका शिक्षणक्रम
सहकार व्यवस्थापन पदविका, सहकार व्यवस्थापन पदविका ( ॲग्रो बेस्ड कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट), सहकार व्यवस्थापन पदविका (बॅंकिंग), सहकार व्यवस्थापन पदविका ( दुग्ध व्यवसाय), सहकार व्यवस्थापन पदविका (सेल्फ एम्प्लॉयमेंट सर्विसेस को-ऑप इन्स्टिट्युशन्स), डिप्लोमा इन फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनिअरींग मॅनेजमेंट
पदवी शिक्षणक्रम
बी.कॉम्.(मराठी व इंग्रजी माध्यम), बी.कॉम्.फायनान्स ॲन्ड अकौंटस्, बॅचलर ऑफ फायर ॲण्ड हेल्थ सेप्टी एन्व्हायरनमेंट मॅनेजमेट, सहकार व्यवस्थापन पदवी
पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम
एम कॉम्., एम.बी.ए. ( जनरल / ह्युमन रिसोर्स / फायनान्स / मार्केटिंग / मॅन्युफॅक्चरिंग ), एम.बी.ए. (पीपीएम) , पी.जी. डिप्लोमा इन फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनिअरींग मॅनेजमेंट
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
स्वयं सहाय्य गट प्रेरक प्रेरिका प्रमाणपत्र, बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र , आय.सी.टी. फॉर स्कूल प्रॅक्टिसेस , आशययुक्त अध्यापन पद्धती
पदविका शिक्षणक्रम
शालेय व्यवस्थापन पदविका, घर कामगार कल्याण पदविका
पदवी शिक्षणक्रम
बी.एड.(शिक्षणशास्त्र,) , बी.एड. (ई.एज्यु.)
पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम
एम.एड ,एम.ए (शिक्षणशास्त्र), पी.जी. डिप्लोमा इन अॅडव्हान्स्ड पेडॉलॉजी
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
माळी प्रशिक्षण, कृषि अधिष्ठान
पदविका शिक्षणक्रम
कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदविका, उद्यानविद्या पदविका, कृषि पत्रकारिता पदविका, फळबागा उत्पादन पदविका, भाजीपाला उत्पादन पदविका, फुलशेती व प्रांगण-उद्यान पदविका
पदवी शिक्षणक्रम
बी.एस्सी (कृषी), बी.एस्सी (उद्यानविद्या)
पदविका शिक्षणक्रम
फाऊंडेशन डिप्लोमा इन आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन,
पदवी शिक्षणक्रम
बी. डिझाईन ( इंटरिअर डिझाईन) 2010 पॅटर्न, बी.आर्क (जनरल) 2010 पॅटर्न., बी.एस्सी (नॉटीकल सायन्स ) 2010 पॅटर्न, बी.एस्सी. (ॲक्च्युरिअल सायन्स) 2011 पॅटर्न., बी. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, बी.एस्सी. बायोइन्फॉर्मॅटिक्स)
पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम
एम. आर्क (जनरल) 2011 पॅटर्न, एम.आर्क (कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट) 2011 पॅटर्न., एम.आर्क (एन्व्हायरनमेंटल आर्क) 2011 पॅटर्न., एम. आर्क (अर्बन ॲण्ड रिजनल प्लॅनिंग) 2011 पॅटर्न., एम.एस्सी. ( बायोटेक्नॉलॉजी)., एम. एस्सी. (बायो इनफॉर्मेटिक्स )., एम.एस्सी. (ॲक्च्युरिअल सायन्स ) 2011 पॅटर्न.
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
प्रोग्रॅमिंग एक्सपर्टिज् इन् सी., कॉम्प्युटर फंडामेंटलस्, डाटा स्ट्रक्चर युजिंग सी, ऑफिस टूल्स, लिनियुक्स (Linux), जावा, व्हिज्युअल बेसिक, कॉम्प्युटराईज्ड फायनान्सीअल अकौंटिंग, ओपीपीज् व सी+++(OPPs & C++), प्रोग्रॅमिंग एक्सलन्स थ्रू व्हीबी.नेट, बिल्डिंग वेब पोर्टल्स थ्रू एएसपी नेट, एन्टरप्राईस सोल्युशन्स युजिंग जेटूईई, प्रोग्रॅमिंग एक्सलन्स थ्रू सी, ओरॅकल, व्हिज्युअल प्रोग्रॅमिंग
पदविका शिक्षणक्रम
डिल्पोमा इन कॉम्प्युटिंग, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन कॉम्प्युटिंग, डिप्लोमा इन इंडस्ट्रीअल सायन्स., डिप्लोमा इन ऑफिस कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स
पदवी शिक्षणक्रम
बी.एस्सी.(बिझनेस इन्फॉर्मेशन सिस्टम), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (बीसीए), बी.एस्सी. (इंडस्ट्रिअल सायन्स)
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
समंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रम, ग्रंथालय संगणकीकरण प्रमाणपत्र शिक्षणक्रम
पदविका शिक्षणक्रम
गांधी विचार दर्शन पदविका शिक्षणक्रम
पदवी शिक्षणक्रम
बी.ए.(ग्राहकसेवा)
पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम
एम. ए. (विषय संप्रेषण), एम.ए. (शैक्षणिक संप्रेषण), एम.ए. (दूर शिक्षण), एम.कॉम्. (विषय संप्रेषण), एम.एस्सी.(विषय संप्रेषण)
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
पूर्वतयारी (आर्मी पॅटर्न), पूर्वतयारी (आयटीबीपी पॅटर्न 2012 ), पूर्वतयारी (एनआयओएस पॅटर्न 2012 ), पूर्वतयारी (रोड ट्रान्सपोर्टेशन पॅटर्न 2012 ), पूर्वतयारी (अशोक लेलॅन्ड पॅटर्न 2012 ), अवारनेस कोर्स इन सायबर सिक्युरिटी (ऑनलाईन)
पदवी शिक्षणक्रम
बी.ए. (आर्मी पॅटर्न ), बी.ए. (ITBP पॅटर्न ), बी.ए. (रोड ट्रान्सपोर्टेशन), बी.ए. (पोलिस ॲडमिनिस्ट्रेशन)
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
दाई प्रशिक्षण, आरोग्य मित्र, गृहरूग्णसहायक, रूग्णसहायक, योगशिक्षक
पदविका शिक्षणक्रम
डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ऑप्थल्मिक टेक्निकल असिस्टंट, डिप्लोमा इन सी.टी.स्कॅन ॲण्ड एम. आर. आय. टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेडिकल रेकॉर्डस
पदवी शिक्षणक्रम
बी.एस्सी. (एम.एल.टी.), बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री, बी.एस्सी (इंडस्ट्रिअल ड्रग सायन्सेस)
पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम
पीजी डिप्लोमा इन हॉस्पीटल ॲण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट, मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ
प्रमाणपत्र शिक्षणक्रम
सर्टिफिकेट इन ब्युटी पार्लर मॅनेजमेंट ( 3 महिने), सर्टिफिकेट इन ब्युटी पार्लर मॅनेजमेंट ( 6 महिने), सर्टिफिकेट इन टेलरिंग (3 महिने), सर्टिफिकेट इन मोबाईल रिपेरिंग ( 3 महिने) , सर्टिफिकेट इन सलून टेक्निक्स ( 3 महिने), सर्टिफिकेट इन जर्मन लॅन्ग्युएज, सर्टिफिकेट इन स्पॅनिश लॅन्ग्युएज, सर्टिफिकेट इन जॅपनिज लॅन्ग्युएज
सर्टिफिकेट इन चायनिज लॅन्ग्युएज, सर्टिफिकेट इन इंग्लिश लॅन्ग्युएज,सर्टिफिकेट इन फ्रेंच लॅन्ग्युएज, सर्टिफिकेट इन अरेबिक लॅन्ग्युएज, सर्टिफिकेट इन डोमेस्टिक वायरमन, सर्टिफिकेट इन मोटर रिवाईंडिंग, सर्टिफिकेट इन आयटी फॉर प्रायमरी स्कूल स्टूडन्सटस् (5 वी ते 7 वी), सर्टिफिकेट इन आयटी फॉर प्रायमरी स्कूल स्टूडन्सटस् (8 वी ते 10 वी) , सर्टिफिकेट इन सॉफ्ट स्किल्स, अे सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन टेक्सटाईल्स , बी सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन टेक्सटाईल्स , सी सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन टेक्सटाईल्स , डी सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन टेक्सटाईल्स , ई सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन टेक्सटाईल्स ,एफ सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन टेक्सटाईल्स .
डिप्लोमा इन प्रिटिंग टेक्निक्स आणि ग्राफिक आर्टस,डिप्लोमा इन इंटेरिअर डिझायनिंग ॲण्ड डेकोरेश, डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन ॲण्ड डोमेस्टिक अप्लायनसेस मेटेंनन्स, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक्स , डिप्लोमा इन फॅब्रिकेशन, डिप्लोमा इन एअर कंडिशनिंग ॲण्ड रेफ्रिजरेशन, डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स ॲण्ड नेटवर्क टेक्नॉलॉजीज् (विंडोज 2000 सर्वर), डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स ॲण्ड नेटवर्क टेक्नॉलॉजीज् (विंडोज 2003 सर्वर), डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स ॲण्ड नेटवर्क टेक्नॉलॉजीज् (विंडोज 2008 सर्वर), डिप्लोमा इन पैठणी हॅन्डीक्राफ्ट ॲण्ड मॉडर्न गारमेंटस, डिप्लोमा फॉर सिविल सुपरवायझर, डिप्लोमा इन मेकॅनिकल टेक्निक्स., डिप्लोमा फॉर फिटर (DFF), डिप्लोमा इन फॅशन डिझाईन ॲण्ड बुटीक मॅनेजमेंट, डिप्लोमा इन सलून टेक्नॉलॉजी.
पदवी शिक्षणक्रम
बी.ए. ( पब्लिक सर्विसेस), बी.एस्सी.(इंटेरिअर डिझाईन), बी.एस्सी.(फॅशन डिझाईन), बॅचलर ऑफ फाईन आर्ट, बी.एस्सी (हॉस्पीटॅलिटी ॲण्ड टूरिझम स्टडिज), बी.एस्सी (हॉस्पीटॅलिटी ॲण्ड केटरिंग सर्विसेस, बी.एस्सी.(मेडिया ग्राफिक्स ॲण्ड ॲनिमेशन)
पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम
एम.ए. (पब्लिक सर्विसेस), एम.ए. ( फॅशन ॲडमिनिस्ट्रेशन), एम.एस्सी ( फॅशन डिझाईन), एम.एस्सी ( एन्व्हायरनमेट सायन्स), एम.एस्सी ( हॉस्पिटॅलिटी ॲन्ड टूरिझम स्टडिज), एम.एस्सी (फूड सायन्स)
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac ह्या वेब पोर्टलला भेट द्या!
अंतिम सुधारित : 1/1/2020
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...