ह्या सेवांपर्यंत पोचण्यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://scholarship.up.nic.in/
ह्या सेवांपर्यंत पोचण्यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://bhulekh.up.nic.in
उपलब्ध असलेल्या सेवा:
ह्या सेवांपर्यंत पोचण्यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://koshvani.up.nic.in
ह्या सेवांपर्यंत पोचण्यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://courtcases.up.nic.in/
ह्या सेवांपर्यंत पोचण्यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://www.uptransport.org
ह्या सेवांपर्यंत पोचण्यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://niyuktionline.up.nic.in
ह्या सेवांच्या जास्त माहितीसाठी कृपया लॉग ऑन करा –
http://emanchitra.up.nic.in/emanchitra/लोकांना त्यांची सरकार विषयीची गा-हाणी सोप्या त-हेने मांडता यावीत आणि त्या समस्यांचे १५ दिवसांच्या आत व अधिक कार्यक्षम पद्धतीने निवारण करता यावे यासाठी २००४ साली लोकवाणी प्रकल्पाची सूरुवात करण्यात आली. सरकारी कार्यालयांत थेट न जाता देखिल आपली कामे पार पाडण्याची सुविधा ही यंत्रणा देते. याअंतर्गत दिल्या जाणा-या सेवांपैकी काही सेवा पुढिलप्रमाणे आहेत जसे : ऑनलाईन अर्ज करणे, जनतेच्या तक्रारी स्वीकारणे व त्यांचे निवारण करणे, विविध सरकारी योजनांची माहिती, त्यांसाठी लागणारे अर्ज, येणारा खर्च, लाभार्थी, इ., स्थानिक रोजगाराच्या उपलब्धतेची संधी.
लोकवाणीच्या वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी प्रत्येक केंद्राला एक पासवर्ड देण्यात आला आहे. पुरविल्या जाणा-या प्रत्येक सेवेसाठी आकारल्या जाणा-या शुल्कांची यादी तयार करण्यात आली आहे आणि लोकवाणीची केंद्रे देखिल सेवे साठी शुल्क आकारताना याच यादीनुसार आकारतील याचीही काळजी घेण्यात आली आहे. डिसेंबर, २००४ पर्यंत १३ लोकवाणी केंद्रे उभारण्यात आली होती. डिसेंबर, २००६ मध्ये हीच संख्या ९० वर जाऊन पोहोचली. यामुळे लोकांना छोट्या छोट्या कामांसाठी जिल्हा मुख्यालयात फेरे घालण्याची काहीच गरज नाही. ही कामे ते त्यांच्या नजिकच्या तहसिल, विभाग आणि नगरात जाऊनही करू शकतात. लोकवाणीच्या वेबसाईटचा पत्ता: (युजर नेम: guest पासवर्ड: guest)
जमिनींच्या नोंदी, निविदांचे अर्ज, शस्त्रास्त्र परवाना अर्ज, शिक्षकांचा जी.पी.एफ. यासारख्या सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. कामात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारी विकास कामे, शिधा वाटप, ग्राम सभेला पाठविण्यात आलेला निधी आदी माहिती लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सर्व सेवांमध्ये सर्वात लोकप्रिय अशी सेवा आहे ऑनलाईन तक्रार निवारण सेवा. या सेवेद्वारे ३१ डिसेंबर, २००६ पर्यंत ८२ हजारांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि त्यांतील ७६ हजार पाचशे (९३%) तक्रारींचे निवारण करण्यात आले.
जमिनीच्या नोंदीही संगणकीकृत करून लोकवाणीच्या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त जन्म/ मृत्यू नोंदणी करणे, अनुसुचित जाती/ जमातीचा दाखला मिळवणे, नागारिकत्वाचा दाखला मिळवणे यासारख्या सेवा एक खिडकी सेवेच्या माध्यमातून पुरविल्या जात आहेत. उत्तर प्रदेशच्या ५० हून जास्त जिल्ह्यांत लोकवाणीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अंतिम सुधारित : 1/28/2020
उत्तराखंड राज्यातील ई-प्रशासना संबंधीची माहिती व ...
आसाममधील ई-प्रशासन
आंध्रप्रदेश या राज्यातील ई-शासन आणि त्यांच्या वेब ...
अरुणाचल प्रदेशमध्ये ई-प्रशासन