वेबसाईट : फिल्मसिटीमुंबई
सन १८९६ मध्ये मुंबईतील हॉटेल वैटसन्स येथे पहिल्या भारतीय चित्रपटाचे प्रदर्शन होताच चित्रपट उद्योगाने लाखो प्रेक्षकांना संमोहित केले व चित्रपटाचे सामर्थ्य दाखवून दिले.निखळ इच्छाशक्तीचे रुपांतर जगातील सर्वात मोठ्या एका चित्रपट निर्मिती देशामध्ये झाले - भारत.
दरवर्षी भारतामध्ये सुमारे हिंदी व प्रादेशिक चित्रपट अशा जवळपास एक हजार चित्रपटांची निर्मिती होते.या व्यतिरिक्त माहितीपट,लघुपट,दूरदर्शन मालिका व व्यावसायिक जाहिरात चित्रपटांचे चित्रीकरण होते.
चित्रपट उद्योगामध्ये जवळपास चार लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचे सामर्थ आहे.उद्योगाच्या व्याप्ती पाठोपाठ अत्याधुनिकता आली.जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान गरजेप्रमाने घेऊन कल्पक व त्रांत्रिक सहाय्यभूत सुविधा निर्माण केल्या ज्य ा जगातील सर्वात चांगल्या सेवांच्या तुलनेत उत्तम आहेत.
भारतामध्ये मुंबई हे करमणूक उद्योगास अभिमानास्पद ठिकाण आहे. मुंबईतील चित्रपट उद्योगाच्या ६० टक्के निर्मिती वाट्यामध्ये मुंबई उद्योगाचा ३० टक्के वाटा आहे.
मुंबईतील कै. श्री.व्ही.शांताराम, कै.श्री.बी.आर.चोप्रा. श्री दिलीपकुमार या दिग्गजांच्या पाठपुराव्यानंतर कंपनी अधिनियम १९५६ अंतगर्त महाराष्ट्र,चित्रपट ,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तथा चित्रनगरीची दिनांक २६ सप्टेंबर १९७७ रोजी स्थापना झाली.सन २००१ मध्ये चित्रपट उद्योगाचे संस्थापक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण " दादासाहेब फाळके चित्रनगरी " असे करण्यात आले.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/12/2019
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात कृषि विभागाची जबाबदारी