वेबसाईट : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 2/24/2020
अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे...
अन्न शिजवताना कोणती पथ्ये पाळावी यासंबधीची माहिती ...
अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स...
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर...