ग्रामविकास व पंचायत राज विभाग
वेबसाईट : ग्राम विकास विभाग
आमचे ध्येय
बळकट पंचायतराज व्यवस्थेमार्फत पुर्णत्ववादी, सर्व समावेशक आणि चिरस्थायी ग्रामविकास साधणे.
कार्यदृष्टी्
सामाजिक व मुलभूत सार्वजनिक सुविधांची यथार्थ उपलब्धलता, दारिद्रय निमुर्लन केंद्रीभूत मानून सामजिक, आर्थिक व राजकीय संधीचा उपयोग
व्यवस्थापनाच्या त्रिसुत्री - निधी, कार्य व अधिकारी यासाठी पंचायतराज संस्थांचे सक्षमीकरण
नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन व नियंत्रण यासाठी पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण
शासनाचे इतर विभाग, निमशासकीय संस्थात, स्वंयसेवी संस्था व इतर यांच्या विकास संबंधीच्या योजना, कार्यक्रम व कार्याचा समुह कृती संगम
एकत्रित निर्णय, कृती व तक्रार निवारण यासाठी ग्रामसभा, स्वंवय सहाय्यता गट, सामाजिक लेखापरिक्षण व तंत्रज्ञान याद्वारे एकत्रिकरणास प्रोत्साहन
उद्देश
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजने अंतर्गत ग्रामीण महाराष्ट्रातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना उपजिवीकेच्या संधी उपलब्ध करुन दारिद्रय उपशमन करणे
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे
इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे
पर्यावरण संतुलित मूलभूत सुविधांद्वारे स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे
प्रशिक्षणतून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायतराज व्यवस्था बळकट करणे
तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी मूलभुत सुविधा व साधने पुरविणे
ई-पंचायत, प्रशासकीय सुधारणा, संगणकीय कारभार
मागास क्षेत्र अनुदान निधी प्रकल्पांतर्गत येणा-या जिल्ह्यांमधील मूलभूत सुविधा व साधनांमधील गंभीर त्रुटी भरुन काढणे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविणे
प्रशासकीय पारदर्शकतेसाठी ऑनलाईन बदल्या, सेवा पुस्तकांचे संगणीकृत अद्ययावती करण पध्दत इत्यादीचा अवलंब करणे
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 5/15/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.