शोभेचे/अलंकारिक मासे पाळणे हा अनेकांचा छंद आहे. हा छंद केवळ सौंदर्यपूरक आनंदच नाही तर आर्थिक उत्पन्नही मिळवून देऊ शकतो. शोभेसाठी वापरल्या जाणार्या जगभरातील विविध ठिकाणी आढळणार्या माशांच्या सुमारे 600 प्रजाती ज्ञात आहेत. भारतामध्येही 100 पेक्षा जास्त शोभेच्या माशांच्या प्रजाती आढळून येतात आणि तितक्याच संख्येने परदेशी प्रजाती नियंत्रित वातावरणात वाढवल्या जातात.
गोड्या पाण्यातील स्थानिक आणि परदेशी प्रजातींपैकी चांगली मागणी असणार्या प्रजातींचे पालन करून त्यांचे प्रजनन करता येते. व्यावसायिक प्रजाती म्हणून प्रसिद्ध असणार्या या प्रजातींचे पिलांना जन्म देणार्या आणि अंडी घालणार्या अशा दोन गटांत विभाजन करण्यात आले आहे.
इतर
नवख्या माणसाने मत्स्यप्रजननास कोणत्याही पिले देणार्या प्रजातीपासून सुरूवात करावी व नंतर गोल्डफिश किंवा इतर अंडे देणार्या प्रजातींकडे वळावे. त्यामुळे त्याला माशांच्या पिलांचा समुदाय हाताळण्याची पद्धत आणि व्यवस्थापन यांचे ज्ञान मिळेल. माशांचे जीवशास्त्र, खाद्य देण्याची पद्धत आणि वातावरणीय परिस्थिती यांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. ब्रूडस्टॉकसाठी ट्युबिफेक्स वर्म्स, मोईना आणि गांडुळ यासारखे जिवंत किडे खाद्य म्हणून द्यावे लागतात. तर लार्वांना सुरूवातीच्या टप्प्यात इन्फुसोरिया, आर्टेमिया नॉप्ली, रोटिफेर्ससारखे प्लँक्टन्स आणि लहान डॅफनिया द्यावे लागतात. त्यामुळे केंद्राच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी सतत जिवंत किडे निर्माण करण्यासाठी एक केंद्र असणे आवश्यक आहे. बहुतेक प्रकरणांत प्रजनन सोपे असते परंतु लार्व्हा संगोपन करताना विशेष काळजी घ्यावी लागते. पुरवणी खाद्य म्हणून शेतकरी जागेवरच स्थानिक शेतकी उत्पादने वापरून पेलेटेड खाद्य बनवू शकतो. आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी बायोफिल्टर्स लावून पाण्याची योग्य गुणवत्ता राखणे आवश्यक आहे. शोभेच्या माशांचे प्रजनन वर्षात वेगवेगळ्या कालावधीत करता येते.
1) पाणी आणि वीज यांचा स्थिर पुरवठा असणार्या ठिकाणी प्रजनन आणि संगोपन केंद्र उभारले पाहिजे. नदीकाठावर केंद्र असल्यास अतिउत्तम कारण त्यामुळे केंद्राला सहज पाणीपुरवठा होऊ शकतो आणि संगोपन केंद्र प्रवाही देखील करता येऊ शकते.
2) तेलाची मळी, तांदुळाची साले, गव्हाचा कोंडा आणि प्राण्यांमधील प्रथिने जसे की माशांचे, कोळंबीच्या डोक्यांचे मांस यांसारख्या शेतकी अतिरिक्त उत्पादनांची स्थिर उपलब्धता माशांसाठी पेलेटेड खाद्य बनवण्यास मदत करेल. प्रजननासाठी निवडलेला माशांचा समुदाय उच्च दर्जाचा असावा जेणेकरून त्यांच्यापासून विकण्यायोग्य उच्च दर्जाचे मासे मिळू शकतील. लहान पिलांना ते प्रौढ होईपर्यंत वाढवणे योग्य. त्यामुळे मासे हाताळण्याचा अनुभवसुध्दा मिळतो आणि नियंत्रित निवडीसही मदत होते.
3) प्रजनन व संगोपन केंद्र प्रामुख्याने विमानतळ/रेल्वे स्टेशनच्या जवळ असावे म्हणजे जिवंत मासा विक्रीसाठी बाजारात/बाहेरगावी नेण्यास सोपे जाईल.
4) व्यवस्थापकीय मानकांच्या योग्य हाताळण्यासाठी संगोपनकर्ता बाजारात मागणी असणार्या एकाच प्रजातीवरही लक्ष केंद्रित करू शकतो.
5) बाजारमागणी, ग्राहकांचा कल, वैयक्तिक ओळखी व जनसंपर्क यांच्याद्वारे बाजारातील प्रक्रिया कशा चालतात याचे योग्य ज्ञान असणे उपयुक्त असते.
6) या क्षेत्रात शुभारंभ करणार्या आणि तज्ञ असणार्या केंद्रांनी नेहमी एकमेकांच्या संपर्कात रहावे म्हणजे बाजारातील तसेच संशोधनातील या क्षेत्राशी निगडित ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यास, प्रशिक्षणाद्वारे मदत होईल.
अनु.क्र. |
विषयवस्तु |
किंमत (रुपयांमध्ये) |
I. |
खर्च |
|
A. |
स्थिर भांडवल |
|
1. |
300 चौ.फु.ची स्वस्तातील शेड (बांबूची चौकट आणि झावळ्याचे आवरण) |
10,000 |
2. |
प्रजनन टाकी (6’ x 3’ x 1’6”, सिमेंटची, 4 नग) |
10,000 |
3. |
पालन टाकी (6’ x 4’ x 2’, सिमेंटची, 2 नग) |
5,600 |
4. |
ब्रूड स्टॉक टाकी (6’ x 4’ x 2’, सिमेंटची, 2 नग) |
5,600 |
5. |
लार्व्हांची टाकी (4’ x 1’6” x 1’, सिमेंटची, 8 नग) |
9,600 |
6. |
1 एचपी पंपासह बोअरवेल |
8,000 |
7. |
प्राणवायू (ऑक्सीजन) सिलेंडर त्याच्या साधनांसह (1 नग) |
5,000 |
|
एकूण खर्च |
53,800 |
B. |
अस्थिर किंमत |
|
1. |
800 माद्या, 200 नर (रु. 2.50/नग; गप्पी, मॉली, स्वॉर्डटेल आणि प्लॅटीसाठी) |
2,500 |
2. |
खाद्य (150 किलो/वर्ष, रु. 20/किलो दराने) |
3,000 |
3. |
वेगवेगळ्या आकाराची जाळी |
1,500 |
4. |
वीज/इंधन (रु. 250/महिना) |
3,000 |
5. |
सच्छिद्र प्लास्टिक प्रजनन बास्केट (20 नग रु. 30 दराने) |
600 |
6. |
पगार (रु. 1000/महिना) |
12,000 |
7. |
इतर खर्च |
2,000 |
|
एकूण |
24,600 |
C. |
एकूण किंमत |
|
1. |
अस्थिर किंमत |
24,600 |
2. |
स्थिर भांडवलावर व्याज (15% प्रतिवर्ष) |
8,070 |
3. |
अस्थिर किंमतीवर व्याज (15% दर सहा महिन्याने) |
1,845 |
4 |
घसारा (स्थिर किंमतीच्या 20% ) |
10,780 |
|
सर्व बेरीज |
45,295 |
II. |
निव्वळ उत्पन्न |
|
|
एक महिना वाढविलेल्या 76800 नग माशांची रु. 1 दराने विक्री (40 नग/मादी/चक्र दराने 3 चक्र/वर्ष आणि जगण्याचा दर 80%) |
76,800 |
III. |
एकूण उत्पन्न (निव्वळ उत्पन्न- एकूण किंमत) |
31,505 |
स्त्रोत: सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर, ओरिसा
अंतिम सुधारित : 10/7/2020
भारतात आणि इतरत्र मोत्यांची मागणी वाढत असूनसुध्दा...
व्यावसायिक तत्वावर ह्या खेकड्याची जोपासना करण्याचे...
गोड्या पाण्यातील कोळंबी ही दुसर्या क्रमांकाची सर्...
गोड्या पाण्यात मत्स्य व्यवसाय करायचा असेल तर भारती...