जागतिक बाजारपेठेतील शोभिवंत माशांची मागणी लक्षात घेऊन केरळमधील मत्स्य उत्पादका ंनी शोभिवंत माशांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत देशाचा विचार करता केरळ शोभिवंत माशांच्या निर्यातीमध्ये आघाडी घेईल अशी शक्यता मत्स्योद्योग मंत्री एस. शर्मा यांनी व्यक्त केली.
केरळमधील अलुवा येथे मत्स्य उद्योग समूहाची सुरवात करण्यात आली. या वेळी श्री. शर्मा बोलत होते. ते म्हणाले, की भारतातून जपान, इटाली आणि फ्रान्सला निर्यात होते; परंतु जाग तिक पातळीवर भारताचा शोभिवंत निर्यातीमधील वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. श्रीलंकेचा वाटा जवळपास आठ टक्के आहे. येत्या काळात जागतिक बाजारपेठेत मत्स्य निर्यात वाढीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने मत्स्योद्योगाला चालना देण्यात येणार आहे. त्यात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीबरोबरीने शोभिवंत मत्स्यपालनासाठी विशेष योजना राबविली जाणार आहे.
जगात शोभिवंत माशांच्या सुमारे सहाशे जाती अस्तित्वात असून, त्यातील 100 जाती आपल्या देशात सापडतात. या शिवाय परदेशातील सुमारे 100 जातींचे शोभिवंत मासे भारतात प्रजननाकरिता वापरतात. शोभिवंत माशांमध्ये गप्पी, मोली, स्वोर्ड टेल, प्लॅटी, कार्पस, गोल्ड फिश, बार्ब, डॅनिओ, टेटा, गोरामी, सिकलीड या जाती महत्त्वाच्या आहेत.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्यतो गुरे ख...
आजकाल आर्थिक स्थिती चांगली असणारया मॉडर्न घरात इतर...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कृषी माल ...
युरोपीय देशांना द्राक्ष निर्यातीकरिता बागायतदारांन...