অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिरचीवरील चुरडामुरडा व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये मिरचीचे पीक घेतले जाते. वाळलेल्या व हिरव्या मिरच्यासाठी साधारणतः जून ते मार्च या कालावधीत मिरचीचे पीक घेतले जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून मिरचीवरील बोकड्या/बुरहामुरडा (लिफ कल) हा रोग व पांढ-या माशीमुळे बहुतांश शैतक-यांचे पीक हातचे गेले.

मोठ्या प्रमाणात फवारण्या करुनही चुरहामुरहा रोगाचे व पांढऱ्या माशीचे नियंत्रण होऊ शकले नाहीं मिरची पिकावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या कोड/ रोगांचा प्रादुर्भाव पूर्वी कधी दिसून आला नव्हता. यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. युरहामुरद्दा या विषाणूजन्य रोगामुळे शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसतात. रोगग्रस्त झाडाला फुले कमी लागतात किंवा फुले लागणेसुद्धा बंद होते.

फळे लागली तरी ती कमी आकाराची असतात. झाडाची वाढ खुटते. या रोगाची सुरुवात काहीवेळा रोपवाटिकेत पांढ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होते. प्रादुर्भाव झालेली रोपे निरोगी रोपासारखीच दिसतात. अशी रोगग्रस्त रोपें जेंव्हा आपण शैतात लावतो तेव्हा या रोपावर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा फुले व फळे यायला लागतात, त्यावेळी झाडाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि रोगाची लक्षणे दिसू लागतात. रस शोषण करणाया किडींमुळे हा रोग पसरत जातो व त्यात महत्वाची भूमिका बजावतात त्या पांढ-या माशा.

अलिकड़व्या काळामाये मिरचीवरील चुरड़ामुरहा रोगाचें प्रमाण का वाढले आहे. हे समजून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एकात्मिक कीड़ व्यवस्थापन संशोधन केंट्राने मध्यप्रदेश व महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण केले. या दोन राज्यातील मिरची लागवड क्षेत्रामध्ये नोव्हेंबर 20१४, ऑगस्ट, नोव्हेंबर 20१५ व जानेवारी 20१६ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान शाश्वज्ञांनी या प्रश्नाविषयी शेतक-यांशी चर्चा केली.

शेतक-यांचे म्हणणे असे होते की, मिरचीवरील चुरहामुरहा रोगाचा प्रादुर्भाव प्रथम रोपवाटिकेतन होती ही रोपे शेतात पुनलगिवड केल्यानंतर १o ते १५ दिवसात म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये प्रादुर्भावास सुरुवात होते व ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये हा रोग शेतभर पसरतो. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने व त्यांचे नियंत्रण होत नसल्याने अनेक शेतक-यांना पीक सोडून द्यावे लागले. काहीं जणनी मिरव्या उपटून दुसरे पीक घेतले चुरहामुरहा रोगाबरोबरल मिरचीवर पांढ-या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे शेतक-यांनी शाश्वज्ञांना सांगितले. रोग वाढण्यामागची कारणे

सर्वेक्षणादरम्यान शास्त्रज्ञांनी शेतक-यांशी चर्चा केली असता पुढील बाबी निदर्शनास आल्या

  1. कीटकनाशक विक्रेत्यांच्या सल्ल्यावरुन शेतक-यांनी ह्युमिकअॅसिड.
  2. जीब्रोलिकअॅसिड इत्यादीसारखी वाढ़संवधके व रासायनिक किंटकनाशकांचे विविध प्रमाणातील मिश्रण मिरचीवर अनेकवेळा फवारले आहे.
  3. अनेक शेतक-यांनी अशा प्रकारची फवारणी प्रत्येक ३ ते ५ दिवसानंतर घेतली आहे.
  4. गरज नसताना अनेक शेतक-यांनी रासायनिक बुरशींनाशकांची पण फवारणी घेतली होती.
  5. रासायनिक किटकनाशकांच्या अति वापरामुळे तुरळक मित्रकेिडी दिसून आल्या.
  6. अनेक शैतामध्ये शास्त्रज्ञांना पांढ-या माशीची संख्या मोठ्या प्रमाणात (५0-100 प्रति झाड़) देिसून आली.
  7. याचबरोबर नत्र्युक्त खतांच्या मात्रा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या होत्या. यामुळे मिरचीची शाखीय वाढ जास्तप्रमाणात झाली व त्यामुळे पांढ-या माशांची संख्या वाढण्यास मदत झाली. मिरचीवर वाढ संप्रेरके वापरल्यामुळे मिरचीचे झाड अधिक लुसलुशीत हिरवेगार झाले आणि त्यामुळे पांढ-या माशा त्याकडे जास्तप्रमाणात आकर्षण झाल्या आणि त्याचे प्रजोत्पादनपण वाढत गेले.

शास्त्रज्ञांना निदर्षनास आलेल्या इतर बाबी

  1. सर्वेक्षण केलेल्या  ठिकाणी बेगोमो  विषाणूमुळं उद्भवणा-या चुरडामुरडा  रोगाची  लागण मिरचीवर  झालेली आहे.  सर्वेक्षण केलेल्या  बहुतांशशेतामध्ये या रोगाची लागवड ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे दिसून आले.
  2. मिरचीवरील चुरडामुरडा रोगास  प्रतिकार करणारा वाण / संकरिंत वाण शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळं खाजगी कंपन्याकडं उपलब्ध  असलेल्या  वाणातून त्याचा शोध घेणे उचित ठरतं.
  3. रासायनिक किटकनाशकांचा अतिरेकी  वापर केल्यामुळ  पांढ-या माशी मध्ये नियंत्रण मिळवता आले नाही .  त्यामुळं किटकनाशकांचा  योग्य वापर होणे गरजेचे आहे.
  4. चुकाद्यपुढची लागण झाल्यानंतर पांढ-या पाशीष्ट्रारं त्याचा प्रसार होता. त्यामुळं पांढ-या पार्शच नियंत्रण आवश्यक ठरतं.
  5. हिंवाळ्याचा कमी  कालावधी  आणि उन्हाळ्यामध्ये  पडलेल्या पावसामुळे पांढ-या माशांची  संख्या  वाढण्यास मदत  झाली.
  6. बियानाद्वारे  चुरडामुरडा रोगाचा प्रसार झाला असण्याची शक्यताहि  नाकारता येत  नाही.
  7. चुरडामुरडा रोग  व पांढऱ्या  माशीच  व्यवस्थापन करण्यासाठी पुनरलागवडीनंतर ४५ दिवसापर्यंत  काळजी घेतली पाहिजे.

ताण व पर्यायीं यजमान पेिकांचे व्यवस्थापन

पांढरी माशी  ही ववेलवर्गीय पिके , वांगी , भेंडी , सोयाबीन , भुईमुग  रताळे , विविध तणे इत्यादी यजमान   पिकांवर ( वनस्पतींवर आपला जीवनक्रण (अंडी , पिले, कोष व प्रौढ ) पूर्ण करत असतं. या पिकाची  लागवड वर्षभर कुठ ना कुठ होत असल्याने पांढऱ्या माशीला खाद्य मिळत जाते.त्यामुळे पांढऱ्या माशीच्या यजमान वनस्पती कोणत्या आहे व त्यांची संख्या कमी कशी करायची याचे ज्ञान शेतकर्यांना असायला हवे. पांढरी माशी आपला जीवनक्रम ३० दिवसात पूर्ण करत असत पांढऱ्या माशीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात . तसेच पांढऱ्या माशीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या पारदर्शक चिकट द्रव्यावर काळी बुरशी वाढत असते. हि कीड पर्णगुछ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते . यजमान वनस्पतीवर पांढरी माशी आपली अंडी घालत असते, त्यामुळे ते नष्ट करणे आवश्यक ठरते

रोग व किंडींचे व्यवस्थापन

  1. रोपे  तयार करतानारोपवाटिकेच्या  चारी बाजूने नेट/कपडा बांधावा .यामुळे बाहेरील रस शोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये घुसण्यास मज्जाव होतो.
  2. रोगग्रस्त झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत . कारण रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडांना विषाणूची लागण होते. किडीमार्फत होणारा प्रसार रोखणे हाच एक उपाय आहे.
  3. पांढ-या माशीच्या  नियंत्रणासाठी प्रति एकी ३५ पिवळे चिकट सापळे लावावेत .
  4. फुलकीडीच्या  नियंत्रणासाठी प्रतेि एकी ३५ निळे चिकट सापळे लावावेत .
  5. शेताच्या चोहोबाजूंनी तीन ओळीमध्ये मका , चावली व झेंडू लावावा . हा मका वाढल्यानंतर शेतीभोवती कुंपण तयार होते. यामुळे बाहेरील कीड आत येण्यास मज्जाव होतो. मका फुलातील प्रग खाण्यासाठी मित्रकीटक उदा.क्रायसोपा , लेडीबर्ड बीटल,कोळी , ट्रायकोड्रामा इत्यादी येतात . हे कीटक मक्यावर आलेल्या किडींना खातात . या सजीव कुंपणामुळे मित्रकीटकांचे संवर्धन होऊन रसशोषक किडींच्या नियंत्रणास मदत होते.
  6. व्हर्टीसिलियम लेक्यानि किंवा मेटारायझिम अॅनोसोपली या जैविक कीटकनाशकाची  ५ मी.ली. प्रती लिटर पाण्यामधून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.
  7. पांढरा, पिवळा ,कला,किंवा निळ्या रंगाच्या प्लास्टिक मल्चिंगने पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते
  8. बीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (दोन * एक मीटर ) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत फोरेट दाणेदार २० ग्रॅम टाकावे किंवा रोपे उगवल्यानंतर डायमिथोएट १० मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे
  9. लागवडीवेळी इमिडाकलोप्रीड १ मी.ली.+कार्बेंडझिम १ ग्रॅम + ट्रायकोडमा ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे बुडवून नंतर लागवड करावी.
  10. पुनर्रलागवडीनंतर पहिली फवारणी सायपरमेथ्रीन  ४ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून करावी . त्यानंतर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात . फवारणीसाठी कीटकनाशके आलटून पालटून वापरावीत.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate