जून-जुलै महिन्यात पावसाने बागेचा ताण तुटतो झाडाला नवीन पालवी फुटते. या काळात वातावरणातील आर्द्रता व दमट-उष्ण हवामान कीड-रोगांच्या प्रादुर्भावास पोषक ठरते.
या किडीचा प्रादुर्भाव हा जून व नोव्हेंबर महिन्यात जास्त दिसून येतो. या किडीची पूर्ण वाढलेली अळी गर्द हिरवी असते. ही अळी कोवळी पाने खाऊन प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण पानविरहित दिसते.
1) अळी पानांच्या आतील हरितद्रव्य खाते. पानांवर पारदर्शक, नागमोडी पोखरलेले पांढरे चट्टे दिसतात. अळी आत असल्यामुळे बाहेरून दिसत नाही.
2) पाने आकाराने लहान, चुरगळलेली राहतात. तसेच पाने आखडून सुकतात, गळून पडतात.
3) झाडांची वाढ खुंटते, फूल व फळधारणेवर परिणाम होतो.
4) लहान किंवा मोठ्या झाडांवर नवीन नवतीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
ही कीड कोवळे शेंडे, पाने, देठ व कळ्यातील रस शोषून घेत असल्याने शेंडे सुकतात. कळ्या गळून पडतात.
ही कीड पानातील रस शोषते. त्याच वेळी किडीच्या शरीरातून चिकट द्रव्य स्रवतो. त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पाने, फांद्या व फळांच्या वरचा पृष्ठभाग काळा पडतो. यालाच कोळशी रोग पडला असे म्हणतात.
1) रस शोषण करणाऱ्या पतंगासोबतच एरंडीवरील पाने खाणाऱ्या अळीचा पतंगसुद्धा पक्व संत्र्याच्या फळातील रस शोषण करून फळगळ होण्यास कारणीभूत असते.
2) रस शोषण करणारे पतंग ही पक्व झालेल्या फळावरील एक प्रमुख कीड आहे. प्रौढ पतंग पक्व फळातील रस शोषण करतात. अळ्या इतर जंगली वेलवर्गीय वनस्पतीवर उपजीविका करतात.
3) सायंकाळी अंधार होते त्या वेळी प्रौढ पतंग पक्व फळाला छिद्र करून फळातील रस शोषण करतात. अशा छिद्रामधून जिवाणू आणि बुरशीचा शिरकाव होऊन फळे सडून खाली पडण्यास सुरवात होते. त्यामुळे उत्पादनात फार घट होते.
4) ओफिडेरीस मॉटर्ना या रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव संत्रा, मोसंबीवर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जास्त दिसून येतो. मराठवाड्यातील मोसंबी व विदर्भातील संत्रा पिकात यामुळे जवळजवळ 25 ते 40 टक्के फळगळ होते.
1) ही कीड कोवळ्या पानातील रस शोषण करते. त्यामुळे पाने गुंडाळली जाऊन नंतर सुकतात.
2) जास्त प्रादुर्भाव असल्यास झाडाची वाढ, फुलधारणेवर परिणाम होतो.
1) या किडीची अळी दिवसा फांद्याच्या बेचक्यात छिद्र पाडून लपून बसते. रात्रीच्या वेळी बाहेर पडून खोड, फांद्याची साल खाते.
2) साल खालेल्या जागी जाळीने झाकलेली दिसते. त्यामुळे कोवळ्या फांद्या वाळतात, झाडाची वाढ खुंटते.
1) रस शोषण करणारे पतंग, फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे फळगळ दिसून येते. नवीन फूट आल्यावर या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात सुरू होतो.
2) किडींचा प्रादुर्भाव वाढेपर्यंत थांबण्यापेक्षा नवीन पालवी आल्यानंतर डायमेथोएट 16 मि.लि. किंवा मिथेल डिमेटॉन 12 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* नवीन पालवीवर प्रामुख्याने सिट्रस सायला व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी ऍसिफेट 25 ग्रॅम किंवा डायमेथोएट 16 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* पावसाळ्यात लिंबू झाडावर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी रोगग्रस्त फांद्यांची छाटणीकरून फांद्या जाळून टाकाव्यात. झाडावर 1 ग्रॅम स्ट्रेप्टोमासयीन अधिक 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून एक महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
* बागेत गळालेली फळे एकत्रित करून ती नष्ट करावीत.
* खोडावर येणाऱ्या इंडरबेला या साल खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाची दर तीन महिन्यांनी पाहणी करून 20 मि.लि. क्लोरपायरिफॉस प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात कापसाचा बोळा बुडवून खोडावर जेथे किडीने छिद्र केले आहे तेथे बोळा बसवावा.
* खोडावर डिंक असलेला भाग खरडून काढावा. तीन ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून हा खरवडलेला भाग धूवून काढावा.
* प्रत्येक झाडास वर्षातून दोन वेळेस (पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर) 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडावर ओतावे.
* बागेमध्ये रस शोषणाऱ्या पतंगांना आकर्षित करण्यासाठी रात्री प्रकाश सापळा लावावा.
* संध्याकाळच्या वेळी 6 ते 7 दरम्यान बागेत धूर केल्यास पतंग बागेत येत नाहीत.
* किडीच्या पर्यायी खाद्य वनस्पती गुळवेल, वासनवेल, चांदवेल व एरंडी यांचा नायनाट करावा.
पावसाळ्यात बागेतील सखल जागी पाणी दीर्घकाळ साचून राहते. ही परिस्थिती झाडास अपायकारक ठरते. अशा परिस्थितीत फायटोप्थोरा बुरशीची वाढ होते.
* फायटोप्थोरा बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावसाआधी झाडांच्या बुंध्यावर बोर्डो पेस्टचा (1 किलो मोरचूद :1 एक किलो चुना :10 लिटर पाणी ) लेप लावावा.
* झाडांच्या बुंध्याजवळ पाणी साचू देऊ नये. पाणी साचत असल्यास व मोसंबी झाडांच्या दोन ओळींमध्ये उताराच्या विरुद्ध दिशेने इंग्रजी व्ही आकाराचे चर खोदावेत. जेणेकरून पाण्याचा निचरा लवकर व प्रभावीपणे होईल.
* ठिबक केले असल्यास नळ्या गुंडाळून ठेवाव्यात.
प्रा. प्रवीण देशपांडे- 9421830439
डॉ. दत्ता म्हेत्रे - 9595011502
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडी...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत रा...
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...