भाजीपाल्यावर प्रक्रिया करून त्यांचा साठवणुकीचा कालावधी वाढवून त्यांचे मूल्यवर्धन करता येते. प्रक्रिया उद्योगाला व्यावसायिक स्वरूप देऊन त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते.
स्थानिक पातळीवर शेतकरी गट तसेच महिला बचत गटांना भाजीपाला प्रक्रिया व मूल्यवर्धन उद्योगास संधी आहे. भाजीपाला आणि फळांपासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात.
टोमॅटो - गर, केचप, सॉस, प्युरी, पेस्ट, सूप, चटणी.
केचप व सॉस तयार करण्यासाठी पूर्ण पक्व झालेली लाल रंगाची फळे निवडावीत.
बटाटा - वेफर्स, चिप्स, फ्रेंचफ्राईज, पीठ, पापड, चकल्या, किस.
वेफर्स तयार करण्यासाठी पूर्ण वाढलेली ताजे बटाटे निवडावीत.
कांदा, लसूण - सुकलेल्या पाकळ्या, पावडर, तेल, रस.
गाजर - हवाबंद डब्यात पॅकिंग, रस सरबत, कॅंडी, मोरावळा, हलवा, जाम, टुटीफ्रुटी, पावडर, टॉफी.
रताळी - वेफर्स, पीठ, स्टार्च, अल्कोहोल.
वाटाणा, घेवडा - हवाबंद डब्यात पॅकिंग, सुकविणे, गोठविणे.
मिरची - अर्क, सुकविणे, भुकटी.
कोबी, फ्लॉवर - लोणचे, गोठविणे.
दुधी भोपळा - टुटीफ्रुटी, पावडर, रस.
भेंडी - सुकविणे, हवाबंद डब्यात पॅकिंग.
कारली - रस, सुकविणे, वेफर्स, लोणची.
पालक, शेपू, मेथी, चुका - सुकविणे, पावडर.
कलिंगड, खरबूज - सरबत, शेक.
अळिंबी - सुकविणे, हवाबंद डब्यात पॅकिंग, केचप, लोणचे.
आंबा - पल्प, सबत, स्क्वॅश, सिरप, जाम, जेली, काप, टॉफी, पोळी, मुरंबा लोणची, आमसूल.
केळी - पल्प, टॉफी, चिप्स, अर्क, पावडर, पीठ, जाम, प्युरी.
पेरू - पल्प, जाम, जेली, टॉफी, नेक्टर, रस, अर्क, स्क्वॅश, पेक्टीन.
सीताफळ - पल्प, जाम, टॉफी, सरबत, आइस्क्रीम.
आवळा - कॅंडी, रस, स्क्वॅश, लोणची, सुपारी, मोरावळा, च्यवनप्राश.
पपई - जेली, लोणची, जाम, कॅंडी, प्युरी, नेक्टर, पावडर, टॉफी, टुटीफ्रुटी, पेपेन.
जांभूळ - गर, सरबत, स्क्वॅश, वाईन, अर्क.
डाळिंब - रस, सरबत, सिरप, अर्क, अनारदाना, अनाररब, सालाची पावडर.
चिकू - पल्प, सरबत, शेक, टॉफी, जाम, कॅंडी, पावडर.
अंजीर - सुके अंजीर, टॉफी, जाम, पल्प.
लिंबू - रस, स्क्वॅश, सायट्रिक आम्ल.
मोसंबी - रस, स्क्वॅश, सिरप, जाम, जेली.
संत्रा - रस, स्क्वॅश, सिरप, जाम, जेली, मर्मालेड.
चिंच - गर, पावडर, सरबत, टॉफी
कवठ - जेली, सरबत, टॉफी, पावडर.
करवंद - गर, जाम, जेली, सरबत, लोणची, नेक्टर.
संपर्क - 02427- 255525
(लेखक कृषी विज्ञान केंद्र दहीगाव, ता. शेवगाव, जि. नगर येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...