1) जास्त अंडे उत्पादनासाठी कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात कार्बोदके दिली जातात. त्या मानाने पिंजऱ्यातील कोंबड्यांची हालचाल ही खूप कमी असते, त्यामुळेही कार्बोदकांचे चरबीत रूपांतर होऊन ती यकृतामध्ये साठून राहते.
2) असंतुलित खाद्य मिश्रण.
3) वातावरणातील उष्णता.
4) यकृतामधील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक पदार्थांची कमतरता.
5) तणाव, जास्त अंडी उत्पादन.
6) बायोटिनची कमतरता.
1) चांगली शरीरयष्टी असणाऱ्या व जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्यांत या आजाराचे प्रमाण जास्त आढळते.
2) अंड्यांचे उत्पादन अचानक कमी होते.
3) कोंबड्यांचा तुरा पांढरट पडतो. त्यांचे वजन हे 20 ते 25 टक्क्यांनी वाढते.
4) मरतुकीचे प्रमाण हे 2 ते 10 टक्के एवढे असते. उष्ण हवामान, तणाव यामध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते.
1) पोटाच्या पोकळीत रक्त साठलेले असते. तसेच यकृतावर रक्ताच्या गुठळ्या आढळून येतात.
2) यकृत हे पिवळसर रंगाचे, आकाराने बरेच मोठे व ठिसूळ असते.
3) कोंबड्यांमध्ये चरबीचे प्रमाण वाढते. कोंबड्यांमध्ये साधारणतः 20-25 टक्के चरबी असते; पण या आजारात ती 70 टक्क्यांपर्यंत पोचते. यकृत फुटून होणाऱ्या रक्तस्रावामुळे कोंबड्यांची मरतूक होते.
1) योग्य प्रमाणात खाद्य मिश्रण.
2) ई जीवनसत्त्व, ब-12 जीवनसत्त्वे आणि इनोसिटोल यांचे खाद्यामध्ये मिश्रण द्यावे.
1) कोंबड्यांमधील रिकेट म्हणजे हाडांमध्ये क्षारांच्या म्हणजेच कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या असंतुलित प्रमाणामुळे उद्भवणारा आजार.
2) या आजारामध्ये हाडांच्या आकारात आणि रचनेत बदल होतो. हाडांची लवचिकता आणि विद्रुपता वाढते. त्यामुळे कोंबडी लंगडते.
3) हा आजार साधारणतः जलदगतीने वाढणाऱ्या तरुण कोंबड्यांमध्ये दिसून येतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील कोंबड्यांना होत असला तरी चार आठवड्यांखालील पक्षी हे जास्त संवेदनाक्षम असतात.
कारणे
1) कॅल्शिअम, फॉस्फरस आणि "ड' जीवनसत्त्व यांची कमतरता किंवा असंतुलितता.
2) चुकीचे खाद्य मिश्रण.
3) इतर काही आजार ज्यामध्ये हाडांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि "ड' जीवनसत्त्व यांच्यावर होणारा परिणाम.
लक्षणे
1) या आजारात कोंबड्यांची वाढ खुंटते, स्नायू कमकुवत होतात आणि चालताना अडथळा येतो.
2) पायाचे सांधे सुजतात. तरुण कोंबड्यांमध्ये चोच आणि हाडे मऊ आणि लवचिक होतात.
3) जसजसा आजार वाढत जातो तसे कोंबड्यांची पिसे खडबडीत व खराब होतात.
4) या आजारात लवकर उपचार न केल्यास मरतुकीचे प्रमाण हे 10 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
1) हाडे मऊ व लवचिक झाल्याने पायाचे हाड किंवा चोच मोडताना ती वाकतात, आवाज येत नाही.
2) तीव्र आजारात पायाची हाडे वाकतात.
3) छातीची हाडे (रिब्स) मणक्याला जिथे जोडलेली असतात त्या जागी सूज किंवा गाठी येतात.
4) लांब हाडांची टोकेसुद्धा मोठी होतात.
उपचार -
1) जीवनसत्त्व "ड' 2 ते 3 वेळा पाण्यातून शिफारशीनुसार द्यावे.
2) खाद्य मिश्रणात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कॅल्शिअम आणि फॉस्फरस (2ः1 प्रमाण) योग्य प्रमाणात मिसळावे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...