शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पदार्थाचे गुणवत्ता नियंत्रण. आज देशामध्ये अनेक छोटे-मोठे अन्नपदार्थ प्रक्रिया कारखाने आहेत. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसाठी हसेप, आयएसओ-22000, आयएसओ-9000 या प्रकारची गुणवत्ता प्रमाणपत्रे महत्त्वाची आहेत. आजच्या लेखामध्ये हसेप ही कार्यपद्धत म्हणजे काय व ती कशी अमलात आणली जाते, याची माहिती घेत आहोत.
शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये जागतिक स्तरावर भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये भारताचा जगात 15 वा क्रमांक लागतो. बदलत्या जागतिकीकरणामुळे आपणास शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये अजून सुधारणा करण्यास वाव आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये दूध प्रक्रिया, खाद्यान्न प्रक्रिया, फळे व भाजीपाला प्रक्रिया, मांस व मांसजन्य पदार्थ प्रक्रिया इत्यादी असे वेगवेगळे विभाग आहेत.
शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पदार्थाचे गुणवत्ता नियंत्रण. आज भारतामध्ये अनेक छोटे-मोठे अन्नपदार्थ प्रक्रिया कारखाने आहेत; परंतु खूप कमी कारखान्यांकडे गुणवत्ता प्रमाणपत्रे आहेत.
जगातील महत्त्वाच्या खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगांनी हसेप या कार्यप्रणालीचा वापर करून खाद्यपदार्थ प्रक्रियेमध्ये ग्राहकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य धोक्यांचे परिणाम टाळले आहेत.
हसेप (करूरीव अपरश्रूीळी अपव उीळींळलरश्र उेपीीेंश्र झेळपीं (कअउउझ)) कार्यप्रणाली म्हणजे खाद्यपदार्थ उत्पादनापासून ते ग्राहकांकडे पोचेपर्यंत होणाऱ्या संभाव्य धोक्यांचे शास्त्रीय साचेबद्ध व मुद्देसूद पद्धतीने निरसन करणे व ग्राहकाच्या आरोग्यावर होणारा संभाव्य धोका टाळणे, जसे दूध उत्पादनापासून ते बंदिस्त पिशवीद्वारे ग्राहकाकडे पोहोचवेपर्यंत होणारे संभाव्य धोके टाळणे.
हसेप प्रमाणपत्राद्वारे आपण आपल्या खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगाचे गुणवत्ता धोरणच फक्त ठरवत नाही, तर ग्राहकांचा आपल्या खाद्यपदार्थाविषयीचा असणारा आत्मविश्वासही जिंकतो. आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यपदार्थांची मोठी मागणी आहे. या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगांना आपले स्थान टिकवायचे असेल, तर हसेप प्रमाणपत्राद्वारे आपल्या उद्योगाचे गुणनियंत्रण व गुणवत्ता धोरण ठरवावे लागेल. खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगांना जर आयएसओ-9000 किंवा आयएसओ-22000 यासारखी गुणवत्ता धोरणे अमलात आणायची असतील, तर "हसेप' कार्यप्रणालीद्वारे गुणवत्ता धोरण ठरवून पाया रचणे गरजेचे आहे.
1) कार्यपद्धती लागू करण्यासाठी हसेपची कार्यकारिणी टीम तयार करावी लागेल. त्यामध्ये वेगवेगळ्या विभागांतील व्यक्तींचा समावेश असावा, त्यांना हसेप प्रणालीबद्दल प्रशिक्षण दिलेले असावे.
2) हसेप कार्यप्रणालीद्वारे जो पदार्थ उत्पादित करावयाचा आहे, त्याची संपूर्ण माहिती तयार करावी. उदा. पदार्थ बनविण्यास लागणारे घटक, तयार करण्याची प्रक्रिया.
3) जो पदार्थ या कार्यप्रणालीद्वारे तयार करायचा आहे, त्याचा शेवटी करावयाचा उपयोग, याचीही माहिती तयार करावी. जसे - सदर पदार्थ हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यासाठी आहे किंवा पदार्थ घरी सर्वसामान्यांच्या वापरासाठी आहे याचा खुलासा आवश्यक आहे.
4) पदार्थ तयार करण्याची सविस्तर मांडणी आवश्यक आहे. यामध्ये पदार्थ बनविण्याच्या प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे दर्शवावेत. तयार केलेली मांडणी हसेप प्रणालीच्या तज्ज्ञांकडून प्रत्यक्षपणे पडताळून घेणे आवश्यक आहे. यात जर काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर कराव्यात.
5) पदार्थ प्रक्रियेत येणारे धोके यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करून घ्यावे व त्यानुसार ते कमी करण्याची कार्यप्रणाली निश्चित करून ती अमलात आणावी.
1) जैविक धोके : जिवाणू (डरश्रोपशश्रश्रर, डींरहिूश्रेलेलशरश्र), विषाणू परजीवी.
2) रासायनिक धोके : औषधे, भांडी धुण्याची रसायने, संप्रेरके, विषारी पदार्थ इ.
3) भौतिक धोके : ग्लास, लाकूड, दगड, प्लॅस्टिक, लोखंडी वस्तू इ.
वरील लेखातील उदाहरणाद्वारे "सीसीपी'चे पदार्थ प्रक्रियेमधील स्थान दाखवले आहे. या सर्व ठिकाणी जर तापमानात बदल झाला, तर जिवाणूंची वाढ होऊन दुधाची गुणवत्ता टिकवता येणार नाही.
अशाप्रकारे आपण सर्व खाद्यपदार्थ प्रक्रियेमध्ये हसेप कार्यप्रणाली वापरून गुणवत्ता टिकवू शकतो व आपण आपल्या ग्राहकांचा आत्मविश्वास जिंकून मार्केटमध्ये आपला पाया भक्कम करू शकतो.
संपर्क : डॉ. आर. एन. वाघमारे
9766940954
(लेखक पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...