অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अटल पेन्शन योजनेची तपशीलवार माहिती

अटल पेन्शन योजनेची तपशीलवार माहिती

  1. परिचय
  2. अटल पेन्शन योजनेचे फायदे
  3. अटल पेन्शन योजना साठी पात्रता
  4. यात सामील होण्याचे वय आणि वर्गणीचा काळ
  5. अटल पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश
  6. यात सहभागी होणे आणि वर्गणी देणे
  7. योजनेत प्रवेश  सहभाग देणाऱ्या एजन्सी
  8. अटल पेन्शन योजनेची कार्य करण्याची रूपरेषा
  9. अटल पेन्शन योजनेला निधी
  10. आताच्या स्वावलंबन योजनेत सहभागी झालेल्या वर्गणीदारांनाअटल पेन्शन योजनेत सहभागी करून घेणे
  11. उशिरा वर्गणी जमा केल्यास दंड
  12. उशिरा भरलेल्या भरण्याबाबत अतिरिक्त रक्कम घेणे
  13. यातील गुंतवणूक कुणी व कशी करावी याचा तपशील
  14. वर्गणीदाराला सतत माहितीचे अलर्ट पुरविणे
  15. योजनेतून बाहेर पडणे किंवा पेन्शन घेणे
  16. योजनेत सहभागी होण्याचे वय, वर्गणीचे स्थर, ठराविक मासिक पेन्शन आणि एकत्रित जमा राशीचा वर्गणीदाराच्या वारसाला परत करणे.
  17. अटलपेन्शन योजना ग्राहक नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
  18. अटल पेन्शन योजना संबधी प्रश्न आणि त्यांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा (FAQ )
  19. अटल निवृत्ती वेतन योजना चार्ट (वयानुसार) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

परिचय

  1. भारत सरकारला गरीब लोकांच्या वृद्धापकाळातील उत्पन्ना च्या बाबतीतील चिंता वाटते. म्हणूनच त्यांना राष्ट्रीय पेन्शन पद्धती (NPS) सहभाग घेण्यास उद्युक्त करत आहोत. असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांच्या दीर्घायुषी आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून या असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृतीनंतर च्या आयुष्यासाठी बचत करण्यासाठी उद्युक्त करायचे आहे. २०११- १२ च्या NSSO च्या ६६ व्या फेरीत असे निष्पन्न झाले आहे कि असंघटीत कार्यशेत्रातील कामगार हा संपूर्ण कामगारांच्या ८८ % आहे म्हणजे ४७.२९ करोड आहे आणि त्यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.  सरकारने २०११ मध्ये स्वावलंबन योजना काढली होती.  तरीही हि योजना अपूर्ण आहे कारण यात वय वर्ष ६० नंतर पेन्शन ची सुविधा नव्हती.
  2. २०१५-१६ च्या वार्षिक अर्थसंकल्पात, सरकारने सर्वाना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन सर्व भारतीयांसाठी जाहीर केली आहे. अटल पेन्शन योजना ज्यात सर्वाना काळ आणि त्यांची वर्गणी नुसार पेन्शन मिळणार आहे. अटल पेन्शन या योजने अंतर्गत असंघटीत क्षेत्रातील सर्व नागरिकांना पेन्शन देण्याचा भर असेल. राष्ट्रीय पेन्शन पद्धती (NPS) द्वारे.  pension Fund Regulatory and development uthority (PFRD) द्वारा संचालित हि योजना असेल. अटल पेन्शन योजना यात वर्गणी दाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात १००० रुपये.  २००० रुपये. ३००० रुपये, ४००० रुपये. ५००० रुपये ची कायम स्वरूपी वयाच्या ६० व्या वर्षापासून पेन्शन मिळेल, वर्गणी हि अटल पेन्शन योजनेत सामील होण्याच्या वयावर अवलंबून असेल. या योजनेत सामील होण्याचे कमीत कमी वय १८ वर्ष आणि जास्तीत  जास्त वय हे ४० वर्ष असेल. वर्गनिदाराने कमीतकमी वीस वर्ष  या योजनेत रुपये भरले पाहिजेत. ठराविक रकमेच्या पेन्शन ची हमी सरकारने घेतली आहे. अटल पेन्शन योजना हि १ जून २०१५  पासून कार्यान्वित आहे.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

  1. जे वर्गणीदार १८ ते ४० या वयोगटात पासून वर्गणी भरत आहे.  त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायम स्वरूपी १००० ते ५००० रुपये प्रती माह पेन्शन वर्गणीदारांना मिळेल. जेवढा वर्गणीदार लवकर योजनेत  सामील होईल त्याची वर्गणी कमी राहील आणि वर्गणी कमी राहील आणि वर्गणी वयानुसार वाढत जाईल.

अटल पेन्शन योजना साठी पात्रता

  1. अटल पेन्शन योजना : हि सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे. केंद्र सरकार कमीत कमी १००० रुपये किंवा वार्षिक वर्गणी ५०% आपल्या कडून खात्यात जमा करेल. जे कमी असेल ते भरेल. हि रक्कम सरकार २०१५-१६ ते २०१९ -२० या आर्थिक वर्षात खात्यावर जमा करेल. हि रक्कम सरकार फक्त अ श्रेणी वर्गणी दारांना देईल जे कर भरत नाहीत. जे इतर कोणत्याहि सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत सामील नाहीत. हि योजना कायम चालू राहील परंतू पाच वर्षा नंतर सरकार कोणतीही रक्कम जमा करणार नाही.
  2. सरकारी वर्गणी हि फक्त पात्र PRN धारकांना दिला जाईल जो PFRD द्वारे दिला जाईल केंद्र सरकार केंद्रीय रेकॉर्ड कीपिंग एजन्सी कडून त्याची शहानिशा करून घेईल.

यात सामील होण्याचे वय आणि वर्गणीचा काळ

  1. अटल पेन्शन योजना : योजनेत सामील होण्याचे कमीत कमी वय हे १८ वर्ष असून जास्तीत जास्त वय हे ४० वर्ष असून ६० वर्षी पेन्शन घेता येईल. यावरून वर्गणीचा कमीत कमी काळ हा २० वर्षाचा असेल. किंवा त्याहून अधिक हि असू शकतो.

अटल पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश

  1. प्रामुख्याने असंघटीत क्षेत्रातले कामगार

यात सहभागी होणे आणि वर्गणी देणे

सर्व पात्र  व्यक्ती ज्यांचे कोणत्या न कोणत्या बँकेत खाते आहेत त्या अटल पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत बँकेतून परस्पर रक्कम काढून घेण्याच्या सुविधेने त्यांची वर्गणी योजनेत जमा होऊ शकते.  ज्याने वर्गणी जमा करण्याचा खर्च कमी होईल. वर्गानिदाराने ठराविक दिनानाकाला हर महिन्याला विशिष्ट शिल्लक खात्यावर ठेवावी म्हणजे उशिरा पैसे भरण्याचा दंड त्यांना लागणार नाही. पहिल्या वर्गणी भरावयाच्या दिनांकावरून  दरमाहा वर्गणी काढण्याची तारीख निश्चित होते. जर विशिष्ठ तारखेला वर्गणी जमा होत नसेल तर ते खाते आगावू  बंद केले जाऊन. वर्गणीदाराला त्या खात्यावरील रक्कम परत मिळत नाही. जर या योजनेची सुविधा प्राप्त करण्यासाठी सरकारला द्यायची माहिती हि खोटी आहे, असे आढळून आल्यास सरकारने दिलेली वर्गणी आणि त्यावरील व्याज हे हिरावून घेण्यात येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी आधारला मुलभूत KYC दस्तावेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. त्याद्वारेच पती पत्नी आणि नामांकित व्यक्ती ओळखण्याचे काम होईल त्याने दीर्घकालीन तंटे होणार नाहीत. वर्गणी दाराने पेन्शनची रक्कम १००० ते ५००० अशी ठरवावी आणि मगच त्यानुसार नियमितपणे वर्गणी भरावी.  वर्गणीदार  हा पेन्शनची रक्कम १००० ते ५००० रुपये जमा काळात वाढवू किंवा कमी शकतो. अशी बदल करण्याची संधी वर्षातून फक्त एकदाच एप्रिल महिन्यात मिळेल.  प्रत्येक वर्गनिदाराला तो योजनेत सहभागी झाल्यावर.  अनुज्ञेय पावती दिली जाईल. ज्यात पेन्शन ची रक्कम,   वर्गणी ची शेवट ची तारीख आणि PRN असा उल्लेख असेल.

योजनेत प्रवेश  सहभाग देणाऱ्या एजन्सी

  1. स्वावलंबन योजनेच्या सेवादात्यांना आणि वर्गणी जमा कर्त्याना NPS द्वारे प्रवेश सहभाग देणाऱ्या एजन्सी म्हणून घेण्यात येईल. बँक हि प्रवेश सहभाग देणाऱ्या एजन्सी किंवा वर्गणी जमा कर्ता म्हणून BCs आणि सद्द बँक वर्गणी जमाकर्ता, सूक्ष्म विमा एजंट mutual fund agent यांद्वारे कार्य करून घेवू शकते.  बँक त्यांना सरकार आणि प्फ्र्द PFRD द्वारे दिलेला कमिशन देऊ शकते.

अटल पेन्शन योजनेची कार्य करण्याची रूपरेषा

  1. हि भारत सरकारची योजना असून. त्याला पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरण द्वारे नियमित केले जाते. NPS या योजनेच्या संस्थागत रूप रेषेचा अटल पेन्शन योजनेसाठी वापर केला जाईल. अटल पेन्शन योजनेची सर्व माहिती पेन्शन निधी विनिमय आणि विकस प्रधीकरण द्वारे तयार केलेली आहे.

अटल पेन्शन योजनेला निधी

भारत सरकार द्वारे

  1. सर्व वर्गनिदारांना ठराविक रक्कम पेन्शन ची हमी दिली जाईल.
  2. भारत सरकार रुपये १००० किंवा पूर्ण वर्गणीच्या ५०%या पैकी जी रक्कम जास्त असेल ती खात्यावर जमा करेल.
  3. अटल पेन्शन योजने वर येन्मार खर्च जसे वर्गणी जमा करण्यासाठी आणि लोकांनी या योजनेत सहभागी वाहावे म्हणून दिलेली प्रलोभन वैगेरे आणि इतर खर्च सरकार सोसले.

आताच्या स्वावलंबन योजनेत सहभागी झालेल्या वर्गणीदारांनाअटल पेन्शन योजनेत सहभागी करून घेणे

  1. पात्र असे स्वावलंबन योजनेचे सभासद अपोआपच अटल पेन्शन योजनेत जोडले जातील. यात बाहेर पडण्याचा पर्याय हि असेल. तरीही अटल पेन्शन योजनेत सामील झाल्यावर पाच वर्ष सरकार तर्फे देण्यात येणारा लाभ फक्त ५ वर्षच दिला जाईल. याचा अर्थ ज्या स्वावलंबन सदस्याला एक वर्ष सरकारी लाभ मिळाला आहे. त्यांना अजून ४ वर्षे लाभ मिळेल म्हणजे एकूण ५ वर्षे फक्त. ज्यांना अटल पेन्शन योजनेतून बाहेर पडायचे आहे त्यांना सरकार फक्त २०१६-१७ पर्यंतच लाभ देईल. जर त्यांनी खाते चालू ठेवले तर त्यांच्या निवृत्तीच्या वयापर्यंत हे खाते (NPS) चालू राहील.
  2. आताचे पात्र १८-४० वयोगटातील स्वावलंबन सहभागी हे आपोआपच अटल पेन्शन योजनेत सामील केले जातील. निर्विघ्न हस्तांतरण प्रक्रियेसाठी वर्गणी जमाकर्ते हे सदस्यांना अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी मदत करतील. अश्रया सदस्यांनी जवळच्या बँक शाखेशी संपर्क करावा. ह्या कामासाठी त्यांनी आपले PRN तपशील बँकेत द्यावेत.
  3. ४० वर्षे या वयापेक्षा जास्त असणाऱ्या स्वावलंबन सदस्य जे या योजनेत सहभागी होण्यास उत्सुक नाहीत त्यांना जमा रक्कम एकाच वेळी काढता येईल किंवा ६० व्या वर्षानंतर वार्षिक पेन्शन द्वारे त्यांना ती रक्कम मिळू शकते.

उशिरा वर्गणी जमा केल्यास दंड

अटल पेन्शन योजनेत सदस्यांना त्यांची वर्गणी मासिक हफ्त्यात भरण्याची सुविधा राहील. बँकांना वर्गणी जमा करण्यास उशीर झाल्यास दंड घेण्यासाठीचा  अधिकार राहील. ही रक्कम १ रुपया ते १० रुपये प्रती महिना असू शकते.

  • एक रुपया प्रति महिना १०० रुपये मासिक वर्गणी साठी
  • दोन रुपया प्रति महिना १०१ ते ५०० रुपये मासिक वर्गणी साठी
  • पाच रुपये प्रति महिना ५०१ ते १००० रुपये मासिक वर्गणी साठी
  • दहा रुपये प्रति महिना १००१ किंवा त्यावरील रुपये मासिक वर्गणी साठी

अशा प्रकारे बेरीज केलेली ठराविक रक्कम / दंडाची रक्कम एकत्रित जमा रकमेतून वजा केली जाईल.

वर्गणी जमा करण्याचे बंद झाल्यावर खालील पैकी एक होऊ शकते.

  • सहा महिन्यानंतर खाते गोठवण्यात येईल.
  • बारा महिन्यानंतर खाते निष्क्रिय करण्यात येईल.
  • चोवीस महिन्यानंतर खाते बंद होईल.

उशिरा भरलेल्या भरण्याबाबत अतिरिक्त रक्कम घेणे

  1. अटल पेन्शन योजनेची कार्य पद्धती ठराविक दिनांकाला खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी करेल जो पर्यंत वर्गणीदारा कडून त्याच्या खात्यात ती रक्कम जमा होत नाही तो पर्यंत.
  2. वर्गणीदाराकडून वर्गणी जमा करण्याची अंतिम तारीख ही महिन्याची पहिली तारीख असेल बँक त्या महिन्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत वर्गणी वर्गणीदाराच्या खात्यावर जमा करू शकते. वर्गणी दराने जेव्हा पैसा येईल तेव्हा, वर्गणी त्या महिन्यात कोणत्याही तारखेस भारता येईल.
  3. मासिक वर्गणी हि प्रथम जो येईल तो या तत्वावर घेण्यात येईल. जसे प्रथम आताची वर्गणी आणि नंतर मागील थकीत मासिक हफ्ता आणि त्यावरील दंड जसे वर तपशीलवार पणे सांगण्यात आले आहे.
  4. वर्गणीदाराकडे निधी उपलब्ध असेल तर त्याच्या कडून एका पेक्षा जास्त मासिक वर्गणी जमा करून घेता येईल. वर्गणी बरोबरच ठराविक मासिक दंडाची रक्कम ही वसूल करण्यात यावी ही बँकेची अंतर्गत बाब आहे. निधी उपलब्ध असल्यास वर्गणी जमा करून घ्यावी.

यातील गुंतवणूक कुणी व कशी करावी याचा तपशील

अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची योजना असून, त्याला पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरण द्वारे नियमित केले जाते. पेन्शन निधी आणि त्याची गुंतवणूक ह्यावर वर्गणी दराचे काहीही नियंत्रण नसेल.

वर्गणीदाराला सतत माहितीचे अलर्ट पुरविणे

  1. खात्यावरील शिल्लक आणि त्यात जमा केलेला निधी याची वेळोवेळी माहिती डचड द्वारे अटल पेन्शन योजनेच्या वर्गणी दाराला सतत देण्यात येईल. वर्गणी दाराला नामांकन, त्याचे नाव, पत्ता फोन नंबर आदि गैर आर्थिक बाबी बदलण्याचा अधिकार राहील.
  2. अटल पेन्शन योजना वर्गणीदार बँकेशी मोबाईल द्वारे जोडलेले असतील, म्हणजे त्यांना वेळोवेळी माहिती डचड द्वारे खात्यावरील शिल्लक आणि त्यात जमा केलेला निधी अटल पेन्शन योजनेच्या वर्गणी दाराला सतत देण्यात येईल.

योजनेतून बाहेर पडणे किंवा पेन्शन घेणे

  1. वयाच्या ६० व्या वर्षी, वर्गणीदार संबंधित बँकेला निवृत्ती वेतनाची मागणी करू शकतो.
  2. या योजनेतून ६० वर्षाच्या आत बाहेर पडणे अशक्यच आहे. फक्त काही अपवादात्मक परिस्थितीत हे शक्य होईल. जसे लाभार्थीचा आकस्मिक मृत्यू वा आजाराने मृत्यू.

योजनेत सहभागी होण्याचे वय, वर्गणीचे स्थर, ठराविक मासिक पेन्शन आणि एकत्रित जमा राशीचा वर्गणीदाराच्या वारसाला परत करणे.

  1. वर्गणीदाराने भरावयाच्या वर्गणीचा तक्ता, वर्गणी दाराला आणि त्याच्या पत्नीला ठराविक निवृत्ती वेतन, त्याच्या वारसदारांना जमा राशी प्रदान करणे. उदाहरणार्थ वर्गणी दाराला १००० रुपये ते ५००० रुपये निवृत्ती वेतन मिळण्यासाठी जर तो वयाच्या १८ व्या वर्षी योजनेत सहभागी झाला तर, दर महिन्याला ४२ ते २१० रुपये वर्गणी द्यावी लागेल. तेवढेच निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी वयाच्या ४० व्या वर्षी त्याला २९१ ते १४५४ रुपये वर्गणी दाखल भरावे लागतील.

वर्गणीदाराने भरावयाच्या वर्गणीचा तक्ता, वर्गणी दाराला आणि त्याच्या पत्नीला ठराविक निवृत्ती वेतन, त्याच्या वारसदारांना जमा राशी प्रदान करणे जर निवृत्ती वेतन १००० रुपये हवे असेल तर

योजनेत सहभागी होण्याचे वय

वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष

मासिक वर्गणी रुपयात

वर्गणीदार किंवा त्याच्या पत्नीला मिळणारे निवृत्ती वेतन रुपयात

वर्गणीदाराच्या वारसास मिळणारी जमा राशी रुपयात

१८

४२

४२

१०००

१.७ लाख रुपये

२०

४०

५०

१०००

१.७ लाख रुपये

२५

३५

७६

१०००

१.७ लाख रुपये

३०

३०

११६

१०००

१.७ लाख रुपये

३५

२५

१८१

१०००

१.७ लाख रुपये

४०

२०

२९१

१०००

१.७ लाख रुपये

वर्गणीदाराने भरावयाच्या वर्गणीचा तक्ता, वर्गणी दाराला आणि त्याच्या पत्नीला ठराविक निवृत्ती वेतन, त्याच्या वारसदारांना जमा राशी प्रदान करणे जर निवृत्ती वेतन २००० रुपये हवे असेल तर

योजनेत सहभागी होण्याचे वय

वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष

मासिक वर्गणी रुपयात

वर्गणीदार किंवा त्याच्या पत्नीला मिळणारे निवृत्ती वेतन रुपयात

वर्गणीदाराच्या वारसास मिळणारी जमा राशी रुपयात

१८

४२

८४

२०००

३.४ लाख रुपये

२०

४०

१००

२०००

३.४ लाख रुपये

२५

३५

१५१

२०००

३.४ लाख रुपये

३०

३०

२३१

२०००

३.४ लाख रुपये

३५

२५

३६२

२०००

३.४ लाख रुपये

४०

२०

५८२

२०००

३.४ लाख रुपये

 

वर्गणीदाराने भरावयाच्या वर्गणीचा तक्ता, वर्गणी दाराला आणि त्याच्या पत्नीला ठराविक निवृत्ती वेतन, त्याच्या वारसदारांना जमा राशी प्रदान करणे जर निवृत्ती वेतन ३००० रुपये हवे असेल तर

योजनेत सहभागी होण्याचे वय

वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष

मासिक वर्गणी रुपयात

वर्गणीदार किंवा त्याच्या पत्नीला मिळणारे निवृत्ती वेतन रुपयात

वर्गणीदाराच्या वारसास मिळणारी जमा राशी रुपयात

१८

४२

१२६

३०००

५.१ लाख रुपये

२०

४०

१५०

३०००

५.१ लाख रुपये

२५

३५

२२६

३०००

५.१ लाख रुपये

३०

३०

३४७

३०००

५.१ लाख रुपये

३५

२५

५४३

३०००

५.१ लाख रुपये

४०

२०

८७३

३०००

५.१ लाख रुपये

 

वर्गणीदाराने भरावयाच्या वर्गणीचा तक्ता, वर्गणी दाराला आणि त्याच्या पत्नीला ठराविक निवृत्ती वेतन, त्याच्या वारसदारांना जमा राशी प्रदान करणे जर निवृत्ती वेतन ४००० रुपये हवे असेल तर

योजनेत सहभागी होण्याचे वय

वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष

मासिक वर्गणी रुपयात

वर्गणीदार किंवा त्याच्या पत्नीला मिळणारे निवृत्ती वेतन रुपयात

वर्गणीदाराच्या वारसास मिळणारी जमा राशी रुपयात

१८

४२

१६८

४०००

६.८ लाख रुपये

२०

४०

१९८

४०००

६.८ लाख रुपये

२५

३५

३०१

४०००

६.८ लाख रुपये

३०

३०

४६२

४०००

६.८ लाख रुपये

३५

२५

७२२

४०००

६.८ लाख रुपये

४०

२०

११६४

४०००

६.८ लाख रुपये

वर्गणीदाराने भरावयाच्या वर्गणीचा तक्ता, वर्गणी दाराला आणि त्याच्या पत्नीला ठराविक निवृत्ती वेतन, त्याच्या वारसदारांना जमा राशी प्रदान करणे जर निवृत्ती वेतन ५००० रुपये हवे असेल तर

योजनेत सहभागी होण्याचे वय

वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष

मासिक वर्गणी रुपयात

वर्गणीदार किंवा त्याच्या पत्नीला मिळणारे निवृत्ती वेतन रुपयात

वर्गणीदाराच्या वारसास मिळणारी जमा राशी रुपयात

१८

४२

२१०

५०००

८.५ लाख रुपये

२०

४०

२४८

५०००

८.५ लाख रुपये

२५

३५

३७६

५०००

८.५ लाख रुपये

३०

३०

५७७

५०००

८.५ लाख रुपये

३५

२५

९०२

५०००

८.५ लाख रुपये

४०

२०

१४५४

५०००

८.५ लाख रुपये

 

अटलपेन्शन योजना ग्राहक नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अटल पेन्शन योजना संबधी प्रश्न आणि त्यांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा (FAQ )

अटल निवृत्ती वेतन योजना चार्ट (वयानुसार) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

आपण याची माहिती टोल फ्री क्रमांकाद्वारे हि मिळवू शकता प्रत्येक राज्यानुसार टोल फ्री क्रमांक दिले आहेत. तसेच एक राष्ट्रीय टोल फ्री नंबर देखील आहे:
महाराष्ट्रासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे : महाराष्ट्र बँक - १८००-१०२-२६३६
राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक : १८००-१८०-११११ /१८००-११०-००१

स्त्रोत :जन धन से जन सुरक्षा, आर्थिक सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार,

अंतिम सुधारित : 8/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate