वस्तू/माल आणि सेवांच्या करयोग्य पुरवठयाचे मूल्य सर्वसाधारणपणे "व्यवहार मूल्य" असेल, जी प्रत्यक्ष अदा केलेली किंवा देय किंमत असते, जेव्हा व्यापारी मंडळी (Parties) संबंधित नसतात आणि "किंमत" हा एकमेव निर्णायक घटक असतो. CGST/SGSTअधिनियम कलम 15 मध्ये व्यवहार मूल्याच्या कक्षेत समावेश करण्यात आलेल्या आणि वगळण्यात आलेल्या विविध बाबींची तपशीलवार चर्चा करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ, व्यवहार मूल्यामध्ये, परतफेड करावी लागणारी ठेव, काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून अगोदर देण्यात आलेली किंवा पुरवठ्याच्या वेळी देण्यात आलेली सूट इत्यादींचा समावेश नसेल.
व्यवहार मूल्य म्हणजे वस्तू/मालाच्या आणि/किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी प्रत्यक्षात अदा केलेली किंमत किंवा देय किंमत, जेव्हा पुरवठाकर्ता आणि प्राप्तकर्ता (ग्राहक) यांचा संबंध नसतो आणि पुरवठ्याकरिता "किंमत" हाच एकमेव निर्णायक घटक असतो. जी कोणतीही रक्कम पुरवठाकर्ता अदा करण्यास जबाबदार असतो, परंतु पुरवठा प्राप्तकर्त्याने सदर रकमेची जबाबदारी (incurred) स्वीकारली आहे अशा कोणत्याही रकमेचा त्यामध्ये समावेश असतो.
नाही. कलम 15 सर्व तीन करांसाठी सामाईक आहे आणि वस्तू/माल व सेवांसाठीही समान आहे.
करार किंमतीचा अधिकतर विशेषत्वाने "व्यवहार मूल्य" असा उल्लेख केला जातो आणि या आधारे कर परिगणित करण्यात येतो. परंतु जेव्हा किंमतीवर कांही घटकांचा प्रभाव असतो, उदाहरणार्थ, व्यवहारात सहभागी असलेले व्यापारी/व्यक्ती यांचे संबंध किंवा जेथे कांही विशिष्ट व्यवहार ज्यांना पुरवठा असे मानले जाते, परंतु ज्यामध्ये किंमत दर्शविलेली नसते, अशा वेळी GST मूल्यांकन नियम (GST Valuation Rules) अनुसार मूल्य निश्चित केले पाहिजे.
नाही. कलम 15 उपकलम (1) अंतर्गत जेव्हा मूल्याची निश्चिती करता येत नाही, केवळ त्या प्रकरणांत GST मूल्यांकन नियमांचा संदर्भ घेणे आवश्यक असते.
होय. कलम 15 (2) मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या बाबींचे परीक्षण केल्यानंतर त्या आधारे स्वीकृत करता येईल. या व्यतिरिक्त जेथे पुरवठाकर्ता आणि प्राप्तकर्ता एकमेकांशी संबंधीत असले तरी त्या संबंधामुळे किंमत प्रभावित झालेली नसली तर व्यवहार मूल्य स्वीकृत करता येईल.
होय. जेथे पुरवठ्यानंतर देण्यात आलेली सूट करारानुसार प्रस्थापित झाली आहे आणि पुरवठ्याच्या वेळी किंवा आधी याबाबत माहिती आहे आणि सदर सूट विशिष्टपणे संबंधित बीजकाशी संबध्द आहे आणि प्राप्तकर्त्याने सदर सूटीशी संबंधित इनपूट टॅक्स क्रेडिट परत फिरविलेले आहे, तेव्हा मॉडेल GST कायदा कलम 15 अंतर्गत "ग्राह्य वजात" (admissible deduction) म्हणून सदर सूट मान्य करण्यात येते.
नाही. परंतू या अटीवर की सर्वसाधारण व्यापार पध्दतींनुसार सूट देण्याची अनुमती आहे आणि बीजकात सूटीची योग्य नोंद घेण्यात आली आहे.
मूल्यांकनाचे नियम लागू होतात जेव्हा (1) मोबदला पूर्णत: किंवा अंशत: पैशाच्या स्वरूपात नसतो; (2) व्यापारी/पार्टी एकमेकांशी संबंधित असतात किंवा विशिष्ट प्रवर्गातील पुरवठाकर्त्याव्दारे पुरवठा करण्यात आलेला आहे; आणि (3) घोषित केलेले व्यवहार मूल्य विश्वासार्ह नाही.
कलम 15 (2) मध्ये विहित केलेल्या समावेशयोग्य बाबी, ज्या व्यवहार मूल्यामध्ये समाविष्ट करता येतील, त्या खालीलप्रमाणे आहेत :-
(क) SGST/CGST अधिनियम व वस्तू आणि सेवाकर ( Compensation to States for Loss of Revenue) अधिनियम,2016 या खेरीज, पुरवठाकर्त्याने स्वतंत्रपणे प्राप्तकर्त्याला आकारलेले असल्यास, कोणत्याही कायद्यांतर्गत आकारले जाणारे कोणतेही कर, जकात (duties), उपकर, शुल्क आणि आकार;
(ख) अशा पुरवठ्याबाबत जी कोणतीही रक्कम पुरवठाकर्ता अदा करण्यास जबाबदार असतो, परंतु पुरवठा प्राप्तकर्त्याने सदर रकमेची जबाबदारी (incurred) स्वीकारली आहे, आणि वस्तू/माल आणि/किंवा सेवांच्या प्रत्यक्ष अदा केलेल्या किंवा देय किंमतीत समावेश नसलेली सदर रक्कम ;
(ग) आनुषंगिक खर्च (Incidental expenses), उदाहरणार्थ दलाली आणि बांधणी (packing) इत्यादी पुरवठाकर्त्याने पुरवठा प्राप्तकर्त्याकडून आकारलेले आहे, यात अंतर्भूत जी कोणतीही रक्कम पुरवठाकर्त्याने वस्तू/माल आणि/किंवा सेवांचा पुरवठा करतेवेळी किंवा वस्तूंची पोचवणी करण्यापूर्वी किंवा परिस्थितीनुरूप सेवांचा पुरवठा करतेवेळी किंवा पोचवणी करण्यापूर्वी आकारलेली आहे;
(घ) कोणत्याही पुरवठ्यासाठी, कोणत्याही लाभाच्या विलंबित अधिदानासाठी आकारण्यात आलेले व्याज किंवा विलंब शुल्क किंवा दंडाची रक्कम ;
(ङ) केंद्र आणि राज्य सरकार/शासन यांनी दिलेले अनुदान (subsidy) वगळून, किंमतीशी थेट जोडलेले अनुदान.
अंतिम सुधारित : 1/30/2020
अग्रिम अधिनिर्णय (Advance Ruling) विषयी असलेले प्र...
इनपूट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आणि या विषयी असले...
अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्त तडजोड ...
अंतरीम तरतूदी (Transitional Provisions) विषयी असले...