नोंदणीकृत व्यक्ती, संयुक्त योजनेंतर्गत कर अदा करण्याचा पर्याय निवडलेल्या व्यक्ती खेरीज, CGST/SGST अधिनियम कलम 140 (1) मध्ये नमूद करण्यात आलेल्या अटींच्या अधीन राहून नियत दिवसापूर्वी मागील कालावधीच्या विवरणात पुढे नेलेले CENVAT क्रेडिटची (किंवा व्हॅट क्रेडिट) रक्कम त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये क्रेडिट म्हणून घेण्यास पात्र असेल.
अटी खालीलप्रमाणे आहेत -
(i) या अधिनियमांतर्गत क्रेडिटची कथित रक्कम इनपूट टॅक्स क्रेडिट म्हणून ग्राह्य असेल;
(ii) नोंदणीकृत व्यक्तीने अस्तित्वात असलेल्या कायद्यां तर्गत (म्हणजेच Central Excise and VAT) नियत दिनांकापूर्वी तात्काळ सहा महिन्याच्या कालावधीची सर्व विवरणे सादर केलेली आहेत;
(iii) कथित क्रेडिट रकमेचा अधिसूचना क्रमांक ............. अंतर्गत विक्री केलेल्या वस्तू/मालाशी संबंध नाही आणि त्यावर अदा केलेल्या VATच्या परताव्याचा दावा केलेला नाही. SGST कायद्यां तर्गत खालीलप्रमाणे आणखी एक अट असेल :-
(i) कथित क्रेडिटची जी रक्कम , केंद्रीय विक्री कर अधिनियम,1956 कलम 3, कलम 5 (3), कलम 6, कलम 6(अे), किंवा कलम 8 (8) संबंधित कोणत्याही दाव्याशी संबंधित आहे, सदर दावा Central Sales Tax (Registration and Turnover) Rules, 1957 च्या नियम 12 मध्ये विहित केलेल्या पद्धतीने आणि कालावधीत सिद्ध झालेला नसेल तर, सदर रक्कम इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये जमा करण्यास पात्र होणार नाही. तथापि, Central Sales Tax (Registration and Turnover) Rules, 1957 च्या नियम 12 मध्ये विहित केलेल्या पद्धतीने जेव्हा सदर दावे सिद्ध होतील, तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यां तर्गत उपरोक्त निर्देशित क्रेडिटच्या समप्रमाणात रक्कम परत केली जाईल.
होय, सदर व्यक्ती 2017-18 मध्ये क्रेडिटसाठी पात्र असेल जर सदर क्रेडिट अस्तित्वात असलेल्या कायद्यात CENVAT क्रेडिट म्हणून ग्राह्य होते आणि CGST अधिनियम कलम 140(2) अंतर्गत CGSTचे क्रेडिट म्हणूनही ग्राह्य आहे.
त्या व्यक्तीला लाभ मिळण्याचा हक्क असेल जेव्हा अशा प्रकारच्या वस्तू/मालावर अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत इनपूट टॅक्स क्रेडिट ग्राह्य आहे आणि आता GST मध्येही ग्राह्य आहे. या दोन बाबींवर (एक्स आणि वाय) अस्तित्वात असलेल्या कायद्यां तर्गत लाभ (ITC) ग्राह्य नसल्याने, सदर व्यक्तीला उपरोक्त लाभाची (ITC) GST मध्ये मागणी करता येणार नाही. (SGST अधिनियम कलम 140(2) मधील अटी व शर्तीनुसार).
चुकीच्या पद्धतीने उपभोगलेल्या आयटीसी बाबतची वसुली जर अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत केलेली नसेल तर GST अंतर्गत कराची थकबाकी म्हणून वसुली केली जाईल.
रु..60 लाख उलाढाल असलेला एक उत्पादक, अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत एसएसआयच्या (SSI) सूटीचा लाभ घेत आहे, परंतु सदर उलाढाल GST मध्ये विहित करण्यात आलेल्या रु..20 लाख सीमित मर्यादेपक्षा जास्त असल्याने, त्या उत्पादकाला GST अधिनियमांतर्गत नोंदणी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे (कलम 22).
एक व्यापारी ज्याची उलाढाल VAT मधील विहित मर्यादेपेक्षा कमी आहे आणि सदर व्यापारी ई-कॉमर्स चालकामार्फत विक्री करीत असल्यास, त्याला GST अधिनियमांतर्गत नोंदणी प्राप्त करून घ्यावी लागेल. अशा व्यक्तींसाठी सीमित मर्यादा नाही.(कलम 24).
होय, कलम 140(3) मधील तरतुदींनुसार ताब्यात असलेल्या कच्च्या मालाच्या साठ्यावरील ITC च्या लाभास सेवा पुरवठादार पात्र असेल.
नाही. नोंदणीकृत व्यक्तीने संयुक्त कर योजनेचा (composition scheme) पर्याय निवडलेला असल्यास, नोंदणीकृत व्यक्तीला VATचे जादा इनपूट टॅक्स क्रेडिट GST मध्ये पुढे नेता येणार नाही. (कलम 140 (1))
जेथे अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत (या प्रकरणात CST) नियत दिवसापूर्वी सहा महिन्यापेक्षा अगोदर नसलेल्या विक्रीच्या वेळी कोणत्याही वस्तू/मालावर कर अदा केलेला आहे, आणि सदर वस्तू/माल खरीददाराने नियत दिवसानंतर परत केला, तर GST मध्ये परत करण्यात आलेला विक्रीमाल सदर खरीददाराचा पुरवठा मानला जाईल आणि अशा पुरवठ्यावर कर अदा करावा लागेल, जर --
(i) वस्तू/माल GST कायद्यांतर्गत करयोग्य आहेत; आणि
(ii) GST कायद्यांतर्गत खरीददार नोंदणीकृत आहे. तथापि विक्रेता अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत (या प्रकरणात CST) अदा करण्यात आलेल्या अशा कराच्या परताव्यासाठी पात्र असतो, जर उपरोक्त खरीददार GST अंतर्गत नोंदणीकृत नसलेली व्यक्ती असेल आणि नियत दिवसापासून वस्तू/माल सहा महिन्याच्या आत परत केलेला असेल (किंवा कमाल दोन महिन्याच्या वाढीव कालावधीच्या आत) आणि वस्तू/मालाची ओळख पटली असेल. (कलम 142(1))
खालील परिस्थिती अंतर्गत उत्पादक किंवा जॉब वर्कर या दोघांनाही कर अदा करावा लागणार नाही :-
(i) अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या तरतुदींनुसार नियत दिवसापूर्वी कच्चा माल/अर्ध-तयार माल जॉब वर्करकडे पाठविण्यात आला आहे;
(ii) नियत दिवसापासून 60 दिवसाच्या आंत जॉब वर्करने माल परत केला आहे (किंवा कमाल 2 महिन्याच्या वाढीव कालावधीत);
(iii) नियत दिवशी उत्पादक आणि जॉब वर्कर या दोघांनीही साठ्या/stock मध्ये असलेल्या कच्च्या मालाचे (inputs) विहित नमुन्यात तपशील जाहीर केले आहेत. (संबंधित कलम 141(1), 141(2), आणि 141(4) आहेत.) तथापि जर कथित कच्चा माल/अर्ध-तयार माल सहा महिन्याच्या आत परत केलेला नसेल (किंवा कमाल दोन महिन्याच्या वाढीव कालावधीच्या आत), उपभोगलेले इनपूट टॅक्स क्रेडिट वसुलीस पात्र होईल.
नियत दिवसापासून सहा महिन्याच्या आत (किंवा कमाल दोन महिन्याच्या वाढीव कालावधीच्या आत) सदर वस्तू/माल उत्पादकाच्या व्यवसाय स्थानी परत केले नाही तर जॉब वर्करला सदर वस्तू/मालावर कर अदा करावा लागेल. (कलम 141(1), 141(2))
होय, अन्य नोंदणीकृत व्यक्तीच्या जागेत तपासणीसाठी पाठविलेला तयार वस्तू/मालाचे उत्पादकाला भारतात कर अदा करून किंवा निर्यातीसाठी कर अदा न करता, सहा महिन्याच्या आत (किंवा कमाल दोन महिन्याच्या वाढीव कालावधीच्या आत) हस्तांतरण करता येते. (कलम 141 (3))
जर काही विशिष्ट प्रक्रिया करण्याकरिता तयार माल कारखा-यातून नियत दिवसापूर्वी अन्य कोणत्याही जागेत हलविण्यात आल्यास, आणि तपासणी किंवा प्रक्रिया केल्यानंतर सदर कारखा-यात नियत दिवसापासून सहा महिन्याच्या आत (किंवा कमाल दोन महिन्याच्या वाढीव कालावधीच्या आत) परत पाठविण्यात आला, तर GST अंतर्गत कर अदा करावा लागणार नाही. (कलम 141(3))
अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत नियत दिवसापूर्वी जॉब वर्करकडे तपासणीसाठी किंवा जे उत्पादन मानले जात नाही अशा अन्य प्रक्रियेसाठी पाठविण्यात आलेल्या उत्पादित वस्तू/मालावर, जर सदर वस्तू/माल उत्पादकाकडे नियत दिवसापासून सहा महिन्याच्या आत परत केला गेला नाही तर (किंवा कमाल दोन महिन्याच्या वाढीव कालावधीच्या आत), GST अंतर्गत कर अदा करावा लागेल. तसेच उपरोक्त माल नियत दिवसापासून सहा महिन्याच्या आत परत केला गेला नाही तर, उत्पादकाने उपभोगलेल्या इनपूट टॅक्स क्रेडिटची वसूली करण्यात येईल. ( कलम 141(3))
नाही, ही तरतूद/सवलत आपोआप लागू होत नाही. फक्त पुरेशी कारणे सादर केल्यावर आयुक्तांव्दारे कालावधीत वाढ केली जाते.
किंमती पुनरिक्षित केल्यानंतर 30 दिवसाच्या आत करपात्र व्यक्तीला डेबिट नोट/क्रेडिट नोट किंवा पुरवणी बीजक निर्गमित करता येईल. जेथे किंमती कमी करून पुनरिक्षित करण्यात आलेल्या आहेत, तेथे करपात्र व्यक्तीला त्याचे कर दायित्व कमी करण्याची अनुमती मिळते, जर बीजक किंवा क्रेडिट नोट प्राप्तकर्त्याने कर दायित्वामध्ये झालेल्या घटीच्या अनुषंगाने त्याचा ITC कमी केला तरच. (कलम 142(2)).
अस्तित्वात असलेल्या कायद्यांतील तरतुदींनुसार प्रलंबित असलेले कर किंवा व्याज यांचे परतावे निकालात काढण्यात येतील. (कलम 142 (3))
अपील, पुनरिक्षण (revision), पुनर्विलोकन (review) यांची प्रत्येक कार्यवाही किंवा CENVAT/इनपूट टॅक्स क्रेडिटच्या दाव्याशी संबंधित संदर्भ किंवा कोणतेही उत्पादन कर दायित्व, नियत दिवसापूर्वी, नियत दिवशी, किंवा नियत दिवसानंतर सुरू झालेले असल्यास अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार निकाली काक्ले जाईल आणि CENVATच्या लाभाची रक्कम /इनपूट टॅक्स क्रेडिट किंवा उत्पादनावरील कर परताव्यासाठी ग्राह्य असतील तर अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत परत केले जातील. तथापि कोणतीही रक्कम,222 वसुलीयोग्य झाल्यास, GST कायद्यांतर्गत सदर रक्कम कराची थकबाकी म्हणून वसूल केली जाईल. (कलम 142(6)/142(7))
अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या तरतुदींनुसारच परतावा देण्यात येईल. जर एखादी वसुली करावी लागल्यास, अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत वसुली केलेली नसल्यास, सदर रक्कमेची "कराची थकबाकी" म्हणून GST अंतर्गत वसुली करण्यात येईल. (कलम 142(6) आणि १४२ (7))
अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत कोणतीही रक्कम कोणत्याही विवरणाच्या पुनरिक्षणाच्या परिणामस्वरूप परत मिळण्यासयोग्य असल्याचे नियत दिवसानंतर समजल्यास, अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या तरतुदींनुसार सदर रक्कम रोख स्वरूपात (in cash) परत केली जाईल. (कलम 142(9)(बी))
अशाप्रकारच्या पुरवठ्यांवर GST अदा करावा लागेल. (CGST अधिनियम कलम 142 (10))
अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत कर आकारण्यायोग्य असलेल्या मर्यादेपर्यंत, वस्तू/सेवांच्या सदर पुरवठ्यांवर GST अंतर्गत कर अदा करावा लागणार नाही. (कलम 142 (11))
अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत सदर रकमेचा परतावा रोख स्वरूपात दिला जाणार नाही. (CGST अधिनियम कलम 142 (8)(बी))
होय, ह्या सेवांच्या संबंधीत असलेली बीजके नियत दिवशी किंवा त्यानंतर मिळाली याचा विचार न करता, त्यासंबंधीत इनपूट टॅक्स क्रेडिट GST करप्रणालीत वितरित करण्यात येईल. (CGST अधिनियम कलम 140(7))
नाही, अशा प्रकरणात GST अंतर्गत स्त्रोतातून कराची वजात केली जाणार नाही.
होय. सदर माल GST अंतर्गत करपात्र असल्यास आणि ज्या व्यक्तीने तो माल नाकारला किंवा नामंजूर केला आहे, त्या व्यक्तीने सदर माल नियत दिवसापासून सहा महिन्यानंतर (किंवा कमाल दोन महिन्याच्या वाढीव कालावधीनंतर) परत केला आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीने वस्तू/माल मान्यतेसाठी पाठविला होता, त्या व्यक्तीला देखील कर अदा करावा लागेल. (कलम 142 (12)
अंतिम सुधारित : 8/29/2020
अग्रिम अधिनिर्णय (Advance Ruling) विषयी असलेले प्र...
इनपूट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आणि या विषयी असले...
कर आकारणी आणि कर सवलत अर्थात Levy of & Exemption ...
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स (e-commerce) म्हणजे काय तसेच...