पुरवठ्याची वेळ GST कर दायित्व उद्भवण्याची वेळ निश्चित करते. पुरवठा पूर्ण झाला आहे हे कधी मानले जाईल हे निर्देशित करते. CGST/SGST अधिनियमांत वस्तू/माल पुरवठ्यासाठी आणि सेवा पुरवठ्यासाठी भिन्न वेळेची (separate time of supply) तरतूद केलेली आहे.
CGST/SGST अधिनियम कलम 12 आणि कलम 13 मध्ये वस्तू/मालाच्या पुरवठ्याच्या वेळेसंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. वस्तू/मालाच्या पुरवठ्याची वेळ, निम्ननिर्देशित घटनांमध्ये जी सर्वात अगोदर घडेल ती असेल. तीे म्हणजे .....
(i) पुरवठाकर्त्याने बीजक (invoice) निर्गमित केल्याची तारीख किंवा कलम 28 अंतर्गत त्याने पुरवठ्याच्या संबंधित बीजक निर्गमित करणे आवश्यक असल्याची अंतिम तारीख किंवा (ii) पुरवठ्याच्या संबंधित पुरवठाकर्त्याला ज्या तारखेस अधिदान (payment) प्राप्त होते ती तारीख.
वस्तू/माल आणि सेवांच्या बाबत प्रमाणकाच्या पुरवठ्याची वेळ असेल ...
(क) प्रमाणक निर्गमित केल्याची तारीख, जर त्या क्षणी पुरवठा अभिज्ञात होत असेल तर (identifiable); किंवा
(ख) इतर सर्व प्रकरणांत प्रमाणकाच्या विमोचनाची (redemption) तारीख.
कलम 12(5) तसेच कलम 13(5) मधील अवशिष्ट नोंदी (Residual entry) असे नमूद करतात की जर नियतकालिक विवरण दाखल करावयाचे असेल तर सदर नियतकालिक विवरण दाखल करण्याची योग्य तारीख, पुरवठ्याची वेळ असेल. इतर बाबतीत, ज्या तारखेस CGST / SGST / IGST प्रत्यक्ष अदा केला, ती तारीख असेल.
पुरवठाकर्त्याच्या लेखापुस्तकात रक्कम प्राप्त झाल्याच्या नोंदीची तारीख किंवा प्राप्त रक्कम त्याच्या बँक खाती जमा केल्याची तारीख, यापैकी जी सर्वात अगोदरची असेल ती "रक्कम प्राप्त झाल्याची तारीख" असेल.
नाही. बीजकात समावेश असलेल्या मर्यादेत किंवा अंशत: अदा केलेल्या रकमेच्या मर्यादेत पुरवठा केल्याचे मानण्यात येईल.
पुरवठ्याची वेळ खालील पैकी जी सर्वात अगोदरची असेल ती तारीख असेल .....
(क) वस्तू/माल प्राप्त झाल्याची तारीख; किंवा
(ख) देय रक्कम अदा केल्याची तारीख; किंवा
(ग) पुरवठाकर्त्याने बीजक निर्गमित केलेल्या तारखेपासून पुढील 30 दिवसानंतर तात्काळ येणारी तारीख.
पुरवठ्याची वेळ खालील पैकी जी सर्वात अगोदरची असेल ती तारीख असेल .....
(क) देय रक्कम अदा केल्याची तारीख;
(ख) पुरवठाकर्त्याने बीजक निर्गमित केलेल्या तारखेपासून पुढील 60 दिवसानंतर तात्काळ येणारी तारीख.
व्याज, विलंब शुल्क किंवा दंड किंवा लाभाचे कोणतेही विलंबित अधिदान यामुळे मूल्यात वाढ झालेल्या बाबतीत, ज्या तारखेस पुरवठाकर्ताला सदर अधिक लाभ प्राप्त होतो, ती तारीख पुरवठयाची वेळ असेल.
होय. कलम 14 मधील तरतूदी अशा प्रकरणांत लागू होतील.
अशा प्रकरणांत पुरवठ्याची वेळ असेल .....
अशा प्रकरणांत पुरवठ्याची वेळ असेल ....
सेवांचा पुरवठा 1.6.2017 पूर्वी झालेला असल्याने 18% हा जुना कर दर लागू होईल.
दिनांक 1.6.2017 नंतर वस्तू/मालाचा पुरवठा केला आणि बीजकनिर्गमित केले, म्हणून 20% हा नवीन कर दर लागू होईल.
CGST/SGST अधिनियम कलम 28 अनुसार, नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने वस्तू/मालाचे वर्णन, परिमाण/संख्या आणि वस्तूंची किंमत/मूल्य, त्यावर आकारलेला कर आणि इतर विहित तपशील नमूद केलेले बीजक निर्गमित केले पाहिजे, अगोदर किंवा त्या वेळी......
(क) प्राप्तकर्त्याला पुरवठा करण्यासाठी वस्तू/माल बाहेर काढला जातो, जेथे पुरवठयात वस्तू/मालाच्या हालचालीचा समावेश आहे, किंवा
(ख) इतर बाबतीत, वस्तू/मालाची पोचवणी (delivery) किंवा त्यायोगे प्राप्तकर्त्यास माल उपलब्ध करून दिल्यावर.
CGST/SGST अधिनियम कलम 28 अनुसार, नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने, सेवेचा पुरवठा करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर, याबाबत विहित केलेल्या कालावधीत, सेवेचे वर्णन, किंमत/मूल्य, त्यावरील देय कर आणि इतर विहित तपशील नमूद केलेले बीजक निर्गमित केले पाहिजे.
वस्तू/मालाच्या निरंतर पुरवठ्याच्या बाबतीत, जेव्हा सलग लेखा विवरणे किंवा सलग अधिदानांचा (payments) समावेश असतो, तेव्हा प्रत्येक सदर लेखा विवरण निर्गमित करण्यात येते किंवा वस्तुस्थितीनुसार, प्रत्येक सदर अधिदान प्राप्त होते, त्या अगोदर किंवा त्यावेळी बीजक निर्गमित,केले पाहिजे.
सेवांच्या निरंतर पुरवठ्याबाबतीत...
(क) जेथे कराराव्दारे अधिदानाची देय तारीख निश्चित करता येते, प्राप्तकर्त्याकडून अधिदान (payment) देयता निश्चित असते, त्या अगोदर किंवा त्यानंतर, परंतु याबाबत विहित केलेल्या कालावधीच्या आत बीजक निर्गमित केले पाहिजे, सेवेच्या पुरवठाकर्त्यास अधिदान प्राप्त झालेले असेल किंवा नसेल.
(ख) जेथे कराराव्दारे अधिदानाची देय तारीख निश्चित करता येत नाही, जेव्हा सेवेच्या पुरवठाकर्त्यास अधिदान प्राप्त होते त्या प्रत्येक वेळी अगोदर किंवा नंतर, परंतु याबाबत विहित कालावधीच्या आत, बीजक निर्गमित,केले पाहिजे.
(ग) जेथे अधिदान व्यवहारपूर्तीशी जोडलेले आहे, त्या व्यवहारपूर्तीच्या वेळेच्या अगोदर किंवा नंतर, परंतु याबाबत विहित कालावधीच्या आत, बीजक निर्गमित केले पाहिजे.
स्वीकृतीच्या आधारे वस्तू/माल विक्रीसाठी किंवा फायद्यासाठी (return) पाठविला जातो किंवा घेतला जातो, पुरवठ्याच्या वेळेच्या अगोदर किंवा त्यानंतर किंवा स्वीकृतीच्या तारखेपासून सहा महिन्यात, यापैकी जे अगोदर असेल, तेव्हा बीजक निर्गमित केले पाहिजे.
अंतिम सुधारित : 1/30/2020
अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्त तडजोड ...
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स (e-commerce) म्हणजे काय तसेच...
अंतरीम तरतूदी (Transitional Provisions) विषयी असले...
इनपूट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आणि या विषयी असले...