राखी तूरी. एक गृहिणी. बोलपूरमध्ये राहणारी. ती भोलापूकूर बचत गटाचीही सभासद. तिचा नवरा बिकाश तूरी हा रिक्षा चालवतो. त्याचे मासिक उत्पन सोळाशे पन्नास-1650, जे त्यांच्या पाच जणांच्या कुटुंबासाठी खूपच तुटपूंजे होते. अनुसूचित जातीचे हे कुटुंब दारिद्रय रेषेखालीही येते. राखी कामाच्या शोधात होती, पण तिला काम असे मिळालेच नाही.
या प्रकल्पात पाच गटांना, ज्यामध्ये प्रत्येकी पाच महिला असतील अशांना सामावून घेण्यात आले. या गटांना बोलपूर आणि आजुबाजूच्या परिसरातील भाजीपाल्याचे टाकाऊ भाग गोळा करून, त्यापासून गांडूळ खत बनवण्याचे व्यावसायीक काम दिले जाणार होते. या भोलापुकूरच्या महिला गटापैकी एकाने गांडूळ खतासाठीचे पिटस बांधण्यासाठी जाम्बुंनी येथील सपोर्ट या संघटनेची जमीन घेतली. महिला सदस्यांना गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. या महिलांच्या कुटुंबातील पुरूषांनीही मग बाजारातील भाजीपाल्याच्या कचऱ्याचे टाकाऊ भाग गोळा करण्याच्या कामात मदत करण्यासाठीही पुढाकार घेतला. महिलांनी पालोपाचाळा आणि गायीचे शेण आदी गोळा करणे सुरु केले. या गांडूळ खतासाठी उच्चप्रतीच्या गांडूळांपासून खत तयार करणे सुरु झाले. यासाठी त्याने त्यांच्या या गांडूळ खतासाठी वसुंधरा व्हर्मी कंपोस्ट असे नावही दिले. पहिल्याच महिन्यात दोन व्हॅटस पासून त्यांना चारशे किलोग्रॅम खत मिळाले. खतासाठी किलोला दहा रुपये दर ठरवण्यात आला. विक्रीनंतर एक हजार रुपयांचा राखीव निधी बँकेत ठेवण्यात येऊ लागला. ज्यामधून पिट म्हणजे गांडूळ खतांचे खड्डे घेणे, देखभाल करणे सोपे जाणार होते. बाकीची सगळी रक्कम सर्व महिला सदस्यांमध्ये समान पद्धतीने वाटण्यात आली.
सुरवातीला राखी तूरी नेहमीच्या कामातून वेळ काढून यात दिवसाला एक ते दोन तास वेळ देत असे. पहिल्याच महिन्यात तिला यामधून दोनशे रुपये मिळाले. तिच्या नवऱ्यालाही कचरा आणि इतर गोष्टींच्या वाहतूकी पोटी, खतांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठीही अधिकची अशी कमाई झाली. राखी आता खूप समाधानी आहे. तिला आता आणखी कमाई करण्याचा विश्वास मिळाला आहे. अधिक वेळ दिल्यास आणखी काही रुपये मिळवता येईल, अशी तिला खात्री झाली आहे. त्यातूनच हा व्यवसाय आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्याची उर्मीही आता या सगळ्या महिलामध्ये निर्माण झाली आहे.
स्त्रोत: डिआरसीएससी, वृत्तपत्रिका, खंड-6
अंतिम सुधारित : 8/3/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...