सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना
प्रस्तावना
फक्त एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेणा-या दारिद्रय रेषेखालील जोडप्यांसाठी ही योजना १ एप्रिल २००७ पासून सुधारित स्वरुपात लागू करण्यात आली आहे.
अटी व शर्ती
१. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कुटूंबातील असावा
२. मुलगा नसताना एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेली असावी
३. नोंदणीकृत व अधिकृत ठिकाणी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी
लाभाचे स्वरूप
- जोडप्यास एक मुलगी असल्यास व कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेतली असल्यास सदरच्या व्यक्तीस रुपये २०००/- रोख व रुपये ८०००/- मुलीच्या नावे राष्ट्रीय बचत प्रमाणपञाच्या स्वरुपात देण्यात येतात
- जोडप्यास दोन मुली असल्यास व कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेतली असल्यास सदरच्या व्यक्तीस रुपये २०००/- रोख व रुपये ४०००/- प्रत्येक मुलीच्या नावे (एकूण रुपये ८०००/-) राष्ट्रीय बचत प्रमाणपञाच्या स्वरुपात देण्यात येतात
संदर्भ : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/20/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.