१. आपत्तीच्या वेळी लोकप्रतिनिधींने शासकीय यंत्रणा व लोकांशी सकारात्मक समन्वय साधावा / ठेवावा.
२. बाधित लोकांना व त्यांचे नातेवाईकांना धीर द्यावा. त्यांचे सांत्वन करावे.
३. स्थानिक संसाधनाचा वापर करून आपत्तीची तीव्रता कमी करावी.
१. ग्रामपंचायतीने गटारे / नाली स्वच्छ करून ठेवणे.
२. नदीच्या काठावरील अतिक्रमणे / अडथळे काढणे.
३. स्वस्त धान्य दुकानदार यांना शासनामार्फत पुरविण्यात येणारे धान्य व केरोसीनचा पर्याप्त साठा उपलब्ध करून देणे.
४. गावातील ग्रामपंचायतीमध्ये जनतेची सभा घेऊन मुले, महिला व पुरुष यांना पूर प्रतिबंधक परस्थितीशी सामना करण्याबाबत माहिती देणे.
५. प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून ठेवणे.
६. सर्व गावांना टीसीएल उपलब्ध करून देणे.
७. ग्रामसेवक, तलाठी, कृषि अधिकारी यांनी गावातील पूल, रस्ते, बांध, बंधारे कमकुवत किंवा नादुरुस्त असल्यास त्याची माहिती संबधित विभागास देणे.
८. पूर परस्थिती उदभवल्यास जनतेला सुक्षित स्थळी हलविणेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे. उदा. शाळा, शासकीय इमारत सुस्थितीत करून ठेवणे.
९. आजूबाजूच्या गावातील व्यक्तींची माहिती उपलब्ध करून ठेवणे.
१०. पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत ठेवणे.
११. सर्व अधिकारी / कर्मचारी यांना मान्सून कालावधीत उपस्थित मुख्यालयी राहण्याबाबत सूचना देणे.
१२. ध्वनीक्षेपक यंत्र सुरक्षित ठेवणे.
माहिती संकलन: बाळू भांगरे
माहिती स्रोत: आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली
अंतिम सुधारित : 8/21/2020
आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी.
आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदार...
आपत्तीच्या काळात आरोग्य विभागाची जबाबदारी
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल...