ग्रामीण भागातील ऊर्जेच्या गरजे संबंधीच्या प्रक्रियांचा महिला स्वाभाविक हिस्सा आहेत. घरासाठी सुरक्षित व पुरेसे पाणी मिळवून ते भरून ठेवणे, गुरांसाठी चारा आणणे, शेतीकामात मदत करणे ही आणि अशी इतर अनेक महत्वाची कामे महिला दररोज करीत असतात. महिला आणि ऊर्जेचे फार घनिष्ठ नाते आहे कारण ऊर्जा मिळवणे आणि तिचा वापर करणे ह्यासाठी त्या अधिक काम करतात.
साधे जळणासाठी सरपण गोळा करण्याचे उदाहरण घ्या. ऊर्जेची ही अगदी प्राथमिक गरज भागवण्यासाठी देखील महिला व मुलांना अनुत्पादक ढोर मेहनत करावी लागते. सरपणाची उपलब्धता कमी असल्यास त्यानुसार त्या कुटुंबास आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात व ह्याचा परिणाम थेट त्यांना मिळणार्या पोषणमूल्यावर होऊ शकतो. महिलांचा दररोज सरासरी ६ तास वेळ घरकामामध्ये व लहान मुलांना सांभाळण्यात जातो. जुन्या पद्धतीच्या चुलींमध्ये जैववस्तूंचे (बायोमास) प्रमाण कमी असतेच शिवाय वायुवीजनाच्या (वेंटिलेशन) अपुर्या सोयींमुळे महिलांचे, विशेषतः लहान मुलींचे आरोग्य बिघडते.
ऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर करणार्या व धूरविरहित चुली तसेच सौरऊर्जा व बायोगॅससारख्या अधिक स्वच्छ इंधनांचा जास्तीत जास्त वापर करणे हाच मार्ग आहे.
अंतिम सुधारित : 6/18/2020
घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्य...
एलपीजी हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त...
कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिव...
कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिव...