कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे जुन्या पद्धतीच्या पिवळ्या दिव्यांच्या तुलनेमध्ये फक्त 1/3 ऊर्जा वापरूनदेखूल तेवढाच प्रकाश देतात. अशारीतीने वीजवापर 75 टक्क्यांनी कमी होऊदेखील आपणांस पिवळ्या दिव्याप्रमाणेच सौम्य व मृदु प्रकाश मिळतो.
सीएफ्एलची किंमत पहिल्यांदा जास्त वाटली तरीही त्यांमध्ये पैसे गुंतवणे अखेर फायदेशीर ठरते कारण ते आकाराने छोटे असतात, त्यांचा प्रकाश तेजस्वी व अधिक चांगल्या रंगाचा असतो. साधारणतः 90 अथवा 100 वॅटच्या जुन्या पद्धतीच्या दिव्याच्या जागी आपण 23 वॅटचा सीएफ्एल बसवू शकता.
ज्याठिकाणचे दिवे साधारणपणे दरदिवशी 4 तासांपेक्षा अधिक काळ सुरू असतात अशा जागी सीएफ्एलचा वापर करा. दरदिवशी 4 तासांपेक्षा जास्त काळ चालणारे 75 वॅटचे दोन जरी जुने दिवे बदलून आपण त्याजागी प्रत्येकी 15 वॅटचे सीएफ्एल बसवल्यास दरवर्षी 18 किलोवॅट-तासांची बचत होऊ शकते.
अंतिम सुधारित : 1/30/2020
पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे घरांच्या छपरांवर प...
पाणी तापवण्याच्या सौर हीटर्समुळे वीजेची तसेच पैशां...
घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्य...
एलपीजी हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त...