অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपला सोलर कुकर स्वतःच बनवा

आपला सोलर कुकर स्वतःच बनवा

 

 

घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्या मदतीने सोलर कुकर बनविता येतो. स्वहस्ते बनवलेल्या आपल्या सोलर कुकरमध्ये तुम्ही आगपेटीही न पेटवता चविष्ट जेवण बनवू शकता.

आवश्यक असलेली सामग्री

Solar Cooker

  • साधारण मोठ्या आकाराचे पुठ्ठयाचे दोन खोके - बॉक्सचा आकार असा हवा की ज्यामध्ये दोन मोठी भांडी ठेवून देखील थोडीशी जागा उरली पाहिजे. एक बॉक्स दुसर्‍या बॉक्स मध्ये मावायला पाहिजे.
  • पेंढा/जुनी वर्तमानपत्रे - काही जुनी वर्तमानपत्रे गोळा करा व चुरगळून टाका, जर पेंढा मिळाला तर त्याहून चांगले. ह्यांचा वापर रोधनासाठी करतात.
  • बॉक्सच्या वरच्या बाजूच्या मापांप्रमाणे कापलेली पारदर्शक काच - ह्याचा वापर आतल्या बाजूच्या बॉक्सचे झाकण म्हणून करतात.
  • अॅल्युमिनियम फॉइल
  • काळा ऍक्रेलिक पेन्ट रंग
  • पॅकिंग टेप
  • कात्री
  • काच
  • धातूचे झाकण असलेली अॅल्युमिनियमची दोन पातेली
  • अर्धे पातेले तांदूळ आवडीप्रमाणे भाज्या  व मसाले

पध्दत


आतला बॉक्स : खोका चांगला स्वच्छ करा आणि वरची बाजू सोडून बाकी सर्व बाजूंना टेपने चिकटवून टाका. खोका चांगला बळकट असल्या्ची खात्री करून घ्या. एका धारदार कात्रीने आतल्या खोक्याच्या वरच्या बाजूच्या सर्व फ्लॅप्स् (आत वळलेले पुठ्ठे) कापून टाका. ह्या खडबडीत कडांना टेप लावून टाका. आता, खोक्याच्या आतल्या बाजूला अत्यंत गडद काळा रंग, शक्यतो ऍक्रेलिक पेन्ट लावा. खोका वाळायला ठेवा.

बाहेरील खोका: खोका चांगला स्वच्छ करा आणि वरची बाजू सोडून बाकी सर्व बाजूंना टेपने चिकटवून टाका. खोका चांगला बळकट असल्या्ची खात्री करून घ्या. कात्रीने अॅल्युमिनियम फॉइलचे मोठे तुकडे कापून घ्या- आपण खाद्यपदार्थ गुंडाळायला करतो त्या प्रकारे. खोक्याच्या वरच्या फ्लॅपच्या आंतील बाजूस हे तुकडे चिकटवून टाका. आता खोका वाळायला ठेवा.

रोधन: उष्णतेचे चांगले वाहक नसलेल्यार सामग्रीचा वापर करा - गुंडाळलेली वर्तमानपत्रे, पेंढा, भूसा इत्यादी. ह्या सामग्रीचा एक थर मोठ्या खोक्याच्या तळाशी ठेवा आणि मग लहान खोका त्याच्याचवर ठेवा. त्या नंतर, रोधन सामग्रीचा वापर करून खोक्यांच्या चारी बाजूंना असलेली मोकळी जागा चांगली ठासून भरून टाका. एकदा हे झाले म्हणजे दोन्ही खोक्यांचे एक उपकरण/युनिट तयार होईल.

काचेचा टॉप : आतल्या खोक्याच्या वरच्या भागावर हा काचेचा टॉप ठेवा.

जेवण / खाद्यपदार्थ : झाकणे असलेली दोन अपरावर्तक पातेली घ्या. एका पातेल्यामध्येी अर्धा कप धुतलेले तांदूळ आणि दोन कप पाणी घाला. दुसर्‍या बाउलमध्येा तुमचया आवडीच्या भाज्यांमध्ये एक चमचा तेल, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हळद आणि हिरव्या् मिरच्या घाला. दोन्ही पातेली काळजीपूर्वक तुमच्या सोलर कुकरमध्येर ठेवा आणि कुकर उन्हांत ठेवा. दोन तास वाट पहा, आणि निसर्गाच्या शुध्दतेसह बनविलेले चविष्ट जेवण तयार!!

स्त्रोत : अक्षय उर्जा, खंड 4, अंक 4

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate