पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे काय ?
पावसाचे पाणी जमा करणे आणि त्याचा नंतर योग्य वेळी वापरासाठी साठा करणे अशी पावसाच्या पाण्याच्या साठवणीची (RainwaterHarvesting) व्याख्या करता येईल. सोप्या शब्दांत, पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे घरांच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी जमा करणे, साठवणे, आणि त्याचे शुद्धीकरण करून ते वापरणे.
पावसाच्या पाण्याची साठवण का करायची?
आज पिण्याच्या पाण्याचा तुटवडा हा चिंतेचा विषय झाला आहे; आणि पावसाचे पाणी मात्र स्वच्छ, शुद्ध असूनही उपयोगात न येता वाहून जात आहे. म्हणून पावसाच्या पाण्याच्या साठवणीची आवश्यकता आहे.
पावसाच्या पाण्याच्या साठवणीचे फायदे
- भू-जल आणि नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा ह्यांना पूरक ठरू शकते.
- पाण्याचा इतर पुरवठा नसेल अशा ठिकाणीही बांधकाम किंवा शेती करता येऊ शकते.
- उच्च दर्जाचे पाणी – शुद्ध, रासायनिक द्रव्यांशिवाय
- पाणी पुरवठ्याचा खर्च अगदी कमी
- पूर आणि जमिनीचा वरचा स्तर वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
पावसाच्या पाण्याची साठवण सर्वात जास्त योग्य ठरते जेव्हा ...
- भू-जलाचे प्रमाण अत्यल्प असेल
- भू-जल दूषित असेल
- भू-भाग खडकाळ, डोंगराळ असेल
- नेहमी भूकंप किंवा पूर येत असतील
- पाण्याच्या स्रोतात खारे पाणी शिरण्याचा धोका असेल
- लोकसंख्या विरळ असेल
- वीज आणि पाणी ह्यांची किंमत वाढत असेल
- पाणी खूप जड आणि खनिजांनी युक्त असेल
पावसाच्या पाण्याचा उपयोग खालील गोष्टींसाठी करता येतो
- पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, आंघोळीसाठी(साठवलेले पाणी)
- संडासामध्ये
- कपडे धुण्यासाठी
- सिंचनासाठी
- पशुधनाच्या गरजांसाठी
पावसाच्या पाण्याची साठवण कशी करावी ...
कुठल्याही पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या पद्धतीचे तीन घटक असतात : पाणलोट क्षेत्र, वाहक, साठा. पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या पद्धतीच्या दोन श्रेणी आहेत :
- अशा पद्धती, ज्यात छपरावरून वाहणारे पाणी घरगुती वापरासाठी गोळा केले जाते. अशा पद्धती, ज्या शेतात किंवा जवळच्या पाणलोट क्षेत्रात वापरल्या जातात आणि शेतीला पूरक पाणीपुरवठा केला जातो.
पाण्याची साठवण करण्याच्या पद्धतीचे सहा मूलभूत घटक म्हणजे:
- पाणलोट क्षेत्र : पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी छत
- वाहक : छतापासून पाणलोट क्षेत्रापर्यंत किंवा साठ्यापर्यंत नाल्या किंवा पाईप्स
- छत धुणे : दूषितके गाळण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी ‘फर्स्ट फ्लश’डायव्हर्टर पद्धत
- साठा : पाण्याच्या टाक्या, ज्यामध्ये जमा केलेले पावसाचे पाणी सुरक्षितपणे साठवता येईल- उदा. किड्यांपासून सुरक्षित
- शुद्धीकरण : ह्यात गाळणे, ओझोन किंवा अतीनील किरणांद्वारा शुद्ध करून घरगुती वापरासाठी योग्य करणे ह्यांचा समावेश होतो
- वितरण : छोटा पंप आणि प्रेशर टॅंक ह्यांच्या मदतीने पावसाच्या पाण्याचे, वितरण केले जाते
ग्रामीण भागात पावासाच्या पाण्याची साठवण :
खेड्यात काही ठिकाणी सामुदायिक विहिरी बांधाव्यात. विहिरीजवळ, 10-20 फुटांवर बोअर वेल बनवून तिला हातपंप बसवावा. विहीर आणि हातपंपाभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्यास गावाक-यांना शिकवावे- तिथे आंघोळी करणे, वाहने, गुरेढोरे, कपडे धुणे इ. किंवा शौच विसर्जन करू नये. खेड्यात पाण्याच्या टाक्या असतील तर दर तीन वर्षांनी त्यातील गाळ काढून त्या स्वच्छ कराव्यात. लहान नद्या किंवा ओढे असतील तर त्यांच्यावर आडवे बंधारे बांधावे म्हणजे पावसाचे पाणी रोखता येईल आणि पाऊस गेल्यानंतर वापरता येईल. छतावरील पाणी साठवण्याची पद्धत सुरू करावी
ग्रामीण शाळांमधे छतावरील पाणी साठवण्याची पद्धत
छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत अतिशय कमी खर्चाची असून भारतातील वाळवंटी भागात गेली कित्येक शतके तिचा वापर केला जातो. दोन दशकांपासून, बेअरफूट कॉलेज ने, 15 राज्यातल्या दुर्गम भागातील शाळांना, 32 लाख लोकांना, शाळांच्या छतांवरील पावासाचे पाणी जमिनीखालील टाक्यांमध्ये जमा करून , पिण्याचे पाणी पुरविले आहे..
दुर्गम भागातील खेड्यांमघ्ये, जिथे पिण्याच्या पाण्यापर्यंत पोचणे ही मोठी समस्या आहे, तिथे, पावसाचे पाणी साठवण्याच्या पद्धतीने दोन उद्दिष्टे साध्य होतात :
- कोरड्या मोसमात पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत(4- 5 महिने)
- वर्षभर पाणी उपलब्ध असल्याने सार्जनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेत सुधारणा
शाळेसाठी पावसाच्या पाण्याची साठवण ( RWH) करण्याचा प्रकल्प
पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या यंत्रणेचे बांधकाम
पाण्याची साठवण करण्याच्या यंत्रणेचे बांधकाम करण्याआधी जिथे पाण्याचा तुटवडा असतो अशा शाळांची माहिती गोळा करणे आवश्यक आहे. तसेच, सध्याचे पाण्याचे स्त्रोत, छताचे उपलब्ध क्षेत्रफळ, आणि जमिनीचा प्रकार ह्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
पावसाच्या पाण्याची साठवण करण्याची टाकी जमिनीखालीच का बांधली जातात?
- चुन्याचा किंवा उपलब्ध स्थानिक सामग्रीचा वापर करून जमिनीखाली बांधलेल्या टाक्यात साठवलेले पाणीच पुढल्या पावासाळ्यापर्यंत ताजे राहू शकते.
- हे एक नैसर्गिक साठवणीचे साधन आहे जे, हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड पाणी पुरवू शकते..
- जमिनीवरील टाक्यांपेक्षा जमिनीखालील टाक्या जास्त टिकावू असतात. त्यांना फारशी दुरूस्ती लागत नाही.
टाकीची जागा
- टाकीची जागा मुख्य इमारतीजवळ असावी जिथे शाळेतील विद्यार्थ्यांना सहज पोचता येईल.
- इमारतीपासून टाकीचे अंतर, टणक जमीन असेल तर 3 ते 5 फूट आणि नरम असेल तर 10 फूट असावे.
- अवरोध कमी करण्यासाठी पाईपची लांबी कमीतकमी ठेवावी. छताला टाकीशी जोडण्यासाठी जास्त व्यासाचा (कमीतकमी 4 इंच) पाईप वापरावा.
- जर पृष्ठभाग कडक असेल तर फार खोल खड्डा करण्याची गरज नाही. टाकीचा 1/3 भाग जमिनीवर आणि 2/3 जमिनीखाली ठेवला जाऊ शकतो.
बांधकामासाठी सामग्री
- स्थानिक बांधकाम साहित्य (विटा/ दगड)
- चुना/सिमेंट
- पाणी अवरोधक पावडर (जिप्सम)
- जाड वाळू
- छत तयार करण्याची सामग्री (फेरो सिमेंट/सॅंडस्टोन फरशी) परिसराप्रमाणे.
टाकीचा आकार
टाकीचा आकार जमिनीच्या प्रकारावर अवलंबून राहील. मूळ पारंपरिक आकार चौकोनी किंवा गोल असतो.कठीण, खडकाळ भागात चौकोनी टाकी चांगली.बांधकामाचे तंत्र सोपे आहे: चौकोनी खड्डा तयार करून त्याला दगडांनी झाकून टाकायचे. ह्याचा वापर हिवाळ्यात वर्ग घेण्यासाठी किंवा शाळेचा रंगमंच म्हणूनही करता येतो.
गोल आकार वाळवंटी प्रदेशात जास्त उपयुक्त आहे. अशा टाक्या बांधण्याच्या पारंपरिक आणि किफायतशीर पद्धतीचे ज्ञान, थर वाळवंटातील ग्रामीण समुदायांना आहे. विश्वास ठेवायाला कठीण वाटेल, पण तिथले स्थानिक कारागीर, उपलब्ध सामग्रीचा वापर करून 100 मि. खोल टाक्या आणि विहिरी बांधतात हे सत्य आहे. अशा टाक्या बांधणे हे प्रशिक्षित तंत्रज्ञांसाठीही आव्हान असते.
भू-जल स्त्रोतांसंबंधी तथ्ये :
- विहीर पाणी साठवण्यासाठी नाही. विहीर हा पृष्ठभागाला जमिनीखालील पाण्याच्या स्त्रोताशी जोडणारा दुवा आहे. पावसाळ्यातील पाण्याच्या प्रमाणानुसार विहीरीतील पाण्याची पातळी कमीजास्त होते.
- पावसाळा संपल्यानंतरही बराच काळ जमिनीखालील स्त्रोतांमघून पाझरणारे पाणी विहिरीत जमा होते.
- बोअरवेलद्वारे मिळणारे पाणी हे, जमिनीतून खडकाळ पृष्ठभागातून झिरपून आलेले पावसाचे पाणीच असते.
- प्रत्येक बोअरवेल कमी अधिक काळानंतर कोरडी होते.
- बोअरवेलचा उलट दिशेने वापर करावा. वर झिरपणारा खड्डा तयार करून कोरड्या बोअर वेलचा वापर जमिनीखालील पाण्याच्या स्त्रोताला पुन्हा भरण्यासाठी करता येतो.