हा साप टिफ्लॉपिडी या सर्पकुलातील आहे. या कुलातील साप लहान, कृमिसदृश व बिळे करणारे असून जगाच्या उष्ण आणि किंचित उष्ण प्रदेशांत आढळतात.
कुकरी साप : या सापांचा कोल्युब्रिडी सर्पकुलात समावेश होतो. यांच्या एकूण ४० जातींपैकी सु. १३ भारतातील आहेत. यांतील काही जाती भारतात सर्वत्र सापडतात आणि बाकीच्या निरनिराळ्या भागांतच दिसून येतात.
गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे.
धामण हा भारतात सर्वत्र आढळणारा बिनविषारी साप असून तो कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात मोडतो. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस आहे. हा साप दक्षिण व आग्नेय आशियातील अफगाणिस्तान, पाकिस्तानातील सिंध, तिबेट, नेपाळ, श्रीलंका, बांगला देश, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, तैवान, थायलंड, दक्षिण चीन इत्यादी प्रदेशांत आढळतो.
हा दांडगा आणि भीती उत्पन्न करणारा साप आहे. याची लांबी २·२५ ते २·५० मी. किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त असून घेर सु. १० सेंमी. असतो. शेपूट लांबीच्या एकचतुर्थांश असून टोकदार असते.
सरीसृप वर्गाच्या इलॅपिडी कुलातील फणा असलेल्या विषारी सापांना सामान्यपणे नाग म्हणतात. आफ्रिका आणि दक्षिण व आग्नेय आशिया (फिलिपीन्ससह) या सर्व प्रदेशांत नाग आढळतात. ते वेगवेगळ्या अधिवासांत राहतात मात्र झाडांवर ते क्वचितच आढळतात. त्यांच्यापैकी काही मानवीवस्ती जवळही आढळतात. भारतात सर्वत्र आढळणाऱ्या नागाचे शास्त्रीय नाव नाजा नाजा आहे.
वृक्षसर्पांपैकी एक निमविषारी साप. हा कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या डिप्सॅडोमॉर्फिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव डेन्ड्रेलॅफिस ट्रिस्टिस आहे. भारतात हा समुद्रसपाटीपासून सु.२,००० मी.पर्यंत आढळतो. महाराष्ट्रात याला काही भागात लाल धामण असेही म्हणतात. या सापाची शेपटी लांब आणि निमुळती असल्याने इंग्रजीत त्याला व्हिप स्नेक असेही म्हणतात.
पट्टेरी मण्यार : हा कैरात प्रकारचा साप असल्यामुळे कैरातांची बहुतेक लक्षणे यात आढळतात. हा साप आणि ⟶ मण्यार एकाच बंगारस वंशातील आहेत; पण ते भिन्न जातींचे आहेत. पट्टेरी मण्यारीचे प्राणिशास्त्रीय नाव बंगारस फॅसिएटस आहे.
भारतात अगदी सर्वत्र आणि सहज दिसणाऱ्या सापांपैकी हा एक साप. गोड्या पाण्यात रहाणारा हा साप नद्या, तलाव आणि मोठ्या पाणथळीच्या जागी दिसतो.
फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत.
बांबूसाप : व्हायपरिडी या सर्पकुलाच्या क्रोटॅलिनी उपकुलातील हा साप आहे. या उपकुलातील सापांचे मुख्य लक्षण म्हणजे नाक आणि डोळा यांच्यामध्ये एक लहान खळगा असतो; म्हणूनच यांना ‘सरंध्र मंडली’ अथवा ‘पिट व्हायपर’म्हणतात.
बिळे करणारे साप : सगळ्या सर्पकुलांपैकी मुख्यतः टिफ्लॉपिडी, ग्लॉकोनिडी, इलिसायडी आणि युरोपेल्टिडी या चार कुलांतील साप बिळे करणारे असल्याचे दिसुन येते. टिफ्लॉपिडी कुलातील ⇨आंधळा साप सामान्यतः जगभर आढळतो.
हा एक नेहमी आढळणारा बिनविषारी साप आहे.
अमेरिकेत आढळणारा हा एक विषारी सरंध्र मंडली सर्प आहे. याच्या सिस्ट्रुरस आणि क्रोटॅलस अशा दोन प्रजाती आहेत.
वालुसर्प : कोल्युब्रिडी कुलातील डिप्सॅडोमॉर्फिनी या उपकुलात सगळ्या वालुसर्पाचा समावेश होतो. भारतात यांच्या चार जाती आढळतात व त्या सगळ्या सॅमॉफिस प्रजातीतील आहेत. सॅमॉफिस काँडॅरॅनस ही जाती भारताच्या बहुतेक भागांत (महाराष्ट्रातदेखील) आढळते. वालुसर्प विषारी नाहीत.
सोनेरी वृक्षसर्प हा उडणारा साप म्हणूनही ओळखला जातो.
काही वर्षापूर्वी मी मित्राच्या गावावरून येत होतो. एका तांडयापाशी रस्त्याच्याकडेला अनेक लोक जमले होते. त्यांच्या हातात. दगड, काठया अशी अयुधे होती. काय चालले आहे. याचे कुतूहल निर्माण झाले. म्हणून जवळ जावून पाहिले.
सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.