(भोकर गण). या फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨बोरॅजिनेसी, पोलेमोनिएसी व हायड्रोफायलेसी ही तीन कुले अंतर्भूत आहेत. सोलॅनेलीझ गणाशी याचे बरेच साम्य व आप्तभाव असून पर्सोनेलीझ व सोलॅनेलीझ या दोन गणांना सांधणारा हा दुवा मानतात. जे. हचिन्सन यांनी बोरॅजिनेलीझ गणात फक्त बोरॅजिनेसी कुलाचा अंतर्भाव करून पोलेमोनिएसी, हायड्रोफायलेसी या कुस्क्युटेसी या तीन कुलांचा पोलेमोनिएलीझ असा स्वतंत्र नवीन गण केला आहे व या दोन गणांचा निकट संबंध ⇨जिरॅनिएलीझ गणाशी जोडला आहे. येथे बोरॅजिनेलीझ म्हणजेच पोलेमोनिएलीझ या विचारसरणीचा स्वीकार केला आहे. बोरॅजिनेलीझ गणातील वनस्पति ओषधी [⟶ ओषधि], क्षुपे (झुडपे) व वृक्ष असून त्यांना एकाआड एक किंवा समोरासमोर पाने असतात.
फुले नियमित, क्वचित साधारण एकसमात्र, द्विलिंगी व अवकिंज असतात. पुष्पमुकुट द्व्योष्ठक (दोन ओठ असलेला) बहुधा बद्धओष्ठी (मिटलेल्या तोंडासारखा); संवर्त दीर्घस्थायी (दीर्घकाल टिकणारा); केसरदले ४, कधी २ व तळाशी पाकळ्यांस चिकटलेली; किंजदले २, किंजपुट ऊर्ध्वस्थ आणि त्यात दोन किंवा एकच कप्पा असतो [⟶ फूल].
लेखक - सी. ना. गाडगीळ
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/15/2019
ज्येष्ठमध : (ज्येष्ठमध, ज्येष्ठीमध; हिं. मुल्हट्टी...
गुंज : वेल भारतात सर्वत्र आढळते.
दुधात शिजवून चर्मरोगांवर लावतात
टेलँथीरा फायकॉइडिया : (कुल-ॲमरँटेसी). ही लहान, सरळ...