(हिं. हिमलचेरी; क. नैकुटी; इं. चायनीज लॉरील, बिग्ने; लॅ. अँटिडेस्मा बुनियस; कुल-यूफोर्बिएसी). हा लहान सदापर्णी वृक्ष नेपाळ ते आसाम, खासी टेकड्या, बिहार, सह्याद्री, कोकण व उ. कारवार, तसेच श्रीलंका, चीन, ब्रह्मदेश, दक्षिणेस सिंगापूरपर्यंत इ. ठिकाणी आढळतो. साल कठीण, भुरकट-तपकिरी, कोवळे भाग केसाळ; पाने विविधरूपी (७·५०-१८×३·१-६·३ सेंमी.), लांबट व दोन्हीकडे निमुळती, वरील बाजूस गुळगुळीत व चकचकीत; फुले एकलिंगी, असंख्य, लालसर व कणिशावर [पुष्पबंध] मे-जूनमध्ये येतात. पुं-कणिशे बहुधा संयुक्त व स्त्री-कणिशे साधी. अठळीयुक्त फळे सुमारे ०·९ सेंमी. व्यासाची गोलसर, लांबट, प्रथम लाल व गुळगुळीत पण नंतर काळी, ऑगस्ट-सप्टेंबरात येतात. पाने व फळे खाद्य; फळे आंबट-गोड व चवदार; कोवळी पाने उकळून उपदंशामुळे बिघडलेल्या पचनशक्तीवर देतात. सालीपासून दोर करतात. ती विषारी असते. लाकूड लाल व कठीण असून सामान्य उपयोगाचे असते.
लेखक : शं. आ.परांडेकर
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/3/2020
मूळ अतिसारावर उपयुक्त आहे
लाकूड कातीव कामास उपयुक्त असते
केसाळ ओषधी असून तिला निळी फुले येतात
या लहान वृक्षाचा प्रसार पश्चिम भारतातील (कोकण, उत...