অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेंद्री

मेंद्री

(तिपन, तिपिन; लॅ. ॲलोफायलस कोबे; कुल–सॅपिडेसी). हा लहान वृक्ष भारतात कारवार, कोकण, महाबळेश्वर, आसाम येथे आढळतो. याची एकांतरित (एकाआड एक) व लोंबती, त्रिदली पाने फांद्यांच्या टोकांस येतात; दले लवदार; फुले लहान, पांढरी, मंजऱ्यांवर मे–ऑगस्टमध्ये येतात. फळे पिकल्यावर लाल, गोल, गुळगुळीत व वाटाण्याएवढी असून खाद्य आहेत. फुलांची रचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨ सॅपिंडेसी अथवा अरिष्ट कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. मेंद्रीच्या प्रजातीत (ॲलोफायलसमध्ये) एकूण १९० जाती असून त्यांपैकी भारतात सु. ८ आहेत.

तिपनी

सेरॅटस ही जाती कंबोडिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, मलाया येथे आणि आसाम, पूर्व व पश्चिम भारतात सापडते. हा लहान वृक्ष किंवा आधारावर चढणारे झुडूप असून पाने त्रिदली व फुले लहान व पांढरी असतात. याचे मूळ अतिसारावर उपयुक्त आहे. फळे खाद्य असतात. ॲ. झेलॅनिकस या हिमालयी जातीची फळेही खाद्य आहेत.

 

 

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate